बेंगलुरूमधे पहिल्यांदा घर घेताय? ‘खाता’बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

तर मग, बंगलोरमध्ये घर/मालमत्ता घेण्याचं तुमचं ठरलंय,

परंतु करार पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांबद्दल तुम्ही अजून अस्पष्ट आहात? काळजी करू नका.काही शब्द/संकल्पना सामान्यतः आपल्याला घाबरवतात,परंतु घाबरायचं काहीएक कारण नसते.आम्ही ते आपल्यासाठी सोपे करून,ह्या काही संकल्पना सोप्या भाषेमध्ये समजावून देणार आहोत, जेणेकरून आपण आपला व्यवहार आणि इतर संबंधित प्रक्रिया अगदी सहजपणे करू शकाल.

 

‘खाता’ म्हणजे काय?

what is khata in bangalore

Picture Courtesy – relakhs Khatha certificate

बंगलोरमध्ये घर/मालमत्ता खरेदी करताना ‘खाता’ हे एक महत्त्वाचा कागदपत्र आहे.’खाता’ या शब्दाचा भाषांतरित केलेला शब्द म्हणजे अकाउंट/खाते.खाता,मूळत: एक कागदपत्र आहे जे सिद्ध करते की मालमत्तेची खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडे, करपात्र हेतूसाठी नगरपालिकेमध्ये खाते आहे.यावरून ती व्यक्ती ,कर भरण्याकरिता पात्र आहे की नाही, हे ओळखले जाते. होय,भारता मध्ये तुमचे स्वागत आहे! मालकाच्या खात्यामध्ये ,मालमत्तेचा आकार, मालमत्तेचे स्थान, अंगभूत क्षेत्र इत्यादीसारख्या तपशीलांचा समावेश असतो,मालकांच्या कर दायित्वाचा अंदाज यावरून लावला जातो.

 

एखाद्या व्यक्तीला ‘खाता’ची गरज काय?

 

READ  सामाजिक अंतराचा सराव करताना घरी आपल्या मुलांना आनंदी ठेवणे आणि त्यांचे मनोरंजन करणे

कर दायित्वाची गणना आणि पूर्तता करण्याव्यतिरिक्त, बँक कर्जासाठी देखील ‘खाता’ची गरज लागते.पाणी आणि वीज जोडणीसाठी अर्ज करतानाही, आपल्याला ‘खाता’ची गरज असते.

 

‘खाता’ साठी कसा अर्ज कराल?

what is khata in bangalore

Picture Courtesy- relakhs khata regesteration

ऐकायला जटिल वाटत असले तरी,खाता साठी अर्ज करणे खूप सोपे आहे.हयासाठी काय करण्याची गरज असते,तर ती म्हणजे आधी बीबीएमपीकडून एक अर्ज विकत घेणे आवश्यक आहे.नवीनतम भरलेल्या मालमत्ता पावत्यासह ,आपल्या मालमत्तेशी संबंधित आवश्यक तपशील भरा आणि सादर करा.हा अर्ज ,आपली मालमत्ता असलेल्या ठिकाणच्या ,सहाय्यक महसूल अधिकारी यांना सादर करणे आवश्यक आहे.’खाता’ अकाउंट मिळविण्यासाठी अंदाजे एक महिन्याचा कालावधी लागतो.

 

‘अ’ खाता आणि ‘ब’ खाता

 

आत्ताच आपण सोप्या शब्दात समजावून घेतले कि ‘खाता’ काय आहे आणि ‘खाता’ अकाउंट कसे मिळवायचे.आता आपण, ‘अ’ खाता आणि ‘ब’ खाता, ह्यांची माहिती घेऊयात.

बीबीएमपी अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत येणारी मालमत्ता, ‘अ’ खाताखाली येते, तर स्थानिक अधिकार क्षेत्राखाली असलेली मालमत्ता ‘ब’ खातामध्ये मोडते. ‘ब’ खाताच्या सूचीमधील मालमत्ता ही ‘अ’ खाताच्या सूचीमध्ये हस्तांतरित केली जाऊ शकतेे,त्यासाठी काही पैसे भरावे लागतात, ज्याला “सुधारणा शुल्क” म्हणून ओळखले जाते. ‘अ’ खाताखालील सूचिमधे मालमत्ता नमूद करण्याचे अनेक फायदे आहेत,आणि म्हणूनच ते करण्याचा सल्ला दिला जातो. ‘अ’ खाता मालमत्तेचा मालक, बँक कर्जासाठी सहजपणे अर्ज करू शकतो.

READ  आपल्याला हिवाळी सॉलस्टीसबद्दल ही माहिती असणे आवश्यक आहे!!

 

‘खाता’ संबंधित काही गैरसमज

 

एक सामान्य गैरसमज म्हणजे,खाता आणि शीर्षकलेख ही एकच गोष्ट आहे.

शिर्षकलेख म्हणजे, मालमत्ता हस्तांतरणाच्या दरम्यान खरेदीदार आणि विक्रेता यांच्यातील लिखित करार आणि दुसरं काहीही नाही.शिर्षकलेख म्हणजे मालमत्तेची मालकी सिद्ध करणे होय, तर खाताचा वापर कर भरण्याच्या उद्देशाने केलेल्या नोंदी ठेवण्यासाठी,मालमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी केला जातो.

काय तुम्हाला रिअल इस्टेटचं जग समजून घेण्यासाठी आणखी मदत हवी आहे? तर मग आमच्या ब्लॉगचे अनुसरण करा, किंवा,आपण काय जाणून घेऊ इच्छिता, त्याची आम्हाला एक कमेंट करा.आमचे नोब्रोकेर मधील तज्ज्ञ तुम्हाला मदत करण्यास कायम तत्पर आहेत.

 

Found Interesting Please Share