Marathi
comment

कोविड -19 साथीच्या महामारी दरम्यान सामाजिक अंतर

आजपर्यंत, कोविड -19 च्या पुष्टी झालेल्या रुग्णांची संख्या जगभरात 2 लाखावर ओलांडली गेलेली आहे.आपण कोविड -19 कसा पसरला हे पाहिले तर आपल्याला लक्षात येईल कि,10000 पुष्टी झालेल्या प्रकरणांवर पोहोचण्यास ह्याला तीन महिन्यांचा कालावधी लागला, आणि तेव्हापासून केवळ 12 दिवसांनी 100000 पर्यंत हा आकडा पोहोचला.कोविड -19चा प्रसार कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, सामाजिक अंतर पाळणे आणि स्वत: ला एकटं करणे.

Social Distancing During the COVID-19 Pandemic
+

सामाजिक अंतर म्हणजे काय आहे?

तुम्हाला आत्तापर्यंत माहिती झाले असेलच कि कोरोनाव्हायरस (सीओव्ही) प्रामुख्याने श्वसनाच्या थेंबाने,म्हणजे खोकला आणि शिंकण्याद्वारे पसरतो.जेव्हा आपल्या सभोवताल हजारो लोक असतात, तेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंक येऊ शकते आणि त्यातून हा व्हायरस पसरु शकतो, अशा लोकांपासून दूर राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे,सामाजिक अंतराचा सराव करणे होय.

याचा अर्थ असा आहे कि, सामाजिक संपर्क, काम आणि शाळा ह्यांचा संपर्क कमीत कमी करणे, किंवा मर्यादित करणे,अगदी निरोगी दिसत असलेल्या व्यक्तींनीही.हे कोरोना वायरसचे संक्रमन होण्यास विलंब करेल आणि संक्रमित व्यक्तींच्या आणि दूषित पृष्ठभागाच्या संपर्कात येण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करेल.सार्वजनिक ठिकाणी जाणे आणि अनावश्यक सामाजिक मेळावे सक्रियपणे टाळणे ही महत्त्वाची गोष्ट आहे, त्याचबरोबर, विवाहसोहळे,जत्रा,मेळावे, बाजारपेठ, बसथांबे, लोकल ट्रेन इत्यादी मोठ्या संख्येने गर्दी करणारे कोणतीही स्थळे टाळणे खूप महत्वाचे आहे.असे केल्याने लक्षात ठेवा, कि आपण कोविड -19 आणि इतर विषाणूंचा आपल्याला संपर्क होण्याचा धोका कमी करत आहात.येथे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, जे आपण सामाजिक अंतराचा सराव करताना,काय काय करू शकता आणि काय करू शकत नाहीत,ह्याचा उलगडा करतील.
Read: सिटी पॅलेस, जयपूर


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



Social Distancing During the COVID-19 Pandemic

घरात काम करणे मदत करेल?

घरात काम करणे हे सामाजिक अंतराचा एक महत्त्वाचा भाग आहे,ह्यामुळे आपण 100 लोकांशी संवाद साधण्याची शक्यता कमी करत आहात.आपणास सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक जागा, जसे की सामान्य लिफ्ट, हँड रेलिंग्ज, कॅफेटेरियास, टॉयलेट्स आणि बर्‍याच अशा अधिक जागा वापरण्याची गरज नाही, जिथे आपल्याला ह्या वायरसच्या जंतूंचा धोका असू शकेल.

 

मुलांना शाळा, उन्हाळी शिबिरे इत्यादीपासून घरी ठेवल्याने मदत होईल?

मुलांना शाळेतून आणि इतर उपक्रमांपासून घरी ठेवण्याची सर्वात मोठी भीती ही आहे,कि ते सर्व घरी एकत्र राहून काय करतील?आपण काम करण्याचा प्रयत्न करीत असताना दिवसभर त्यांना व्यस्त ठेवणे सोपे काम नाही, परंतु ह्या संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी हे करावे लागेल.ते कोविड -19 चे वाहक असू शकतात आणि क्वचित प्रसंगी त्याद्वारे त्यांना संसर्ग होऊ शकतो आणि म्हणूनच त्यांना घरी ठेवणे महत्वाचे आहे.

प्रयत्न करा आणि त्यांच्यासाठी वेळापत्रक बनवा जेणेकरुन आपल्याला त्यांचे मनोरंजन करण्याबाबत जास्त चिंता करण्याची गरज राहणार नाही, आणि त्यांच्याकडे भरपूर काम देखील राहील.

मी बाहेर जाऊ शकतो का?

होय, आपण बाहेर जाऊ शकता. आपल्याला ताजी हवा आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहेच.आपण फिरायला, धावण्याकरिता, सायकलिंगला जाऊ शकता व आपले पाळीव प्राणी फिरून आणू शकता.तथापि, हे करताना इतर लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा (कमीतकमी 3-6 फूट) आणि बर्‍याच पृष्ठभागास स्पर्श न करण्याची खबरदारी घ्या (लिफ्ट बटणे, हाताच्या रेलिंग्ज, दरवाजाच्या कड्या इ.),जर संपर्क आलाच तर सॅनिटायझर लाऊन आपले हात ताबडतोब स्वच्छ करा. 

Social Distancing During the COVID-19 Pandemic

 

मी माझ्या मित्रांना भेटू शकतो का आणि ते मला भेटण्यास येऊ शकतात का?

ही अजिबातच चांगली कल्पना नाही, लक्षात ठेवा, आपण लोकांपासून कमीतकमी 6 फूट अंतरावर असणे आवश्यक आहे, घरी हे करणे अत्यंत कठीण आहे.आपल्यामध्ये आणि आपल्या मित्रामध्ये कोविड -19 विषाणू नसू शकतो, परंतु बरीच संक्रमित पृष्ठभाग आणि लोक आहेत ज्यांच्याबरोबर ,घराकडे जाताना आणि भेट देताना संपर्क साधू शकता, म्हणून हे करणे टाळणे चांगलेच.ह्यावर अनेक मार्ग आहेत,जसेकी ,आपण एक ‘नेटफ्लिक्स पार्टी’ करून पहा जेथे तुम्ही आणि तुमचे मित्र एकाच वेळी समान शो आणि चित्रपट पाहू शकता, एका ठराविक तारखेला आपण ‘स्काइप डिनर पार्टीज’ सारख्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग देखील करू शकतात.
Read: कोरोनाव्हायरस लॉकडाउन दरम्यान व्यवसायाच्या सातत्याचे बचाव करण्यासाठीचे तंत्रज्ञान

मी माझ्या पालकांना / आजी-आजोबांना भेटायला जाऊ शकतो?

आपल्या पालकांना आणि आजी-आजोबांना भेटणे कदाचित मोहक वाटेल, परंतु ते कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करा.बहुतेक वृद्धाश्रम आणि सेवानिवृत्ती सुविधा देणाऱ्या संस्थांनी भेटायला येणाऱ्यांना प्रत्यक्षात येण्यापासून रोखले आहे.वृद्धांना सर्वाधिक धोका असतो आणि म्हणूनच हा एक उत्तम उपक्रम आहे. आपण त्यांना मदत करण्यासाठी पुढे जाणे आवश्यक आहे,असे आपल्याला वाटत असल्यास, सावधगिरीने तसे करा.जर ते स्वतः एकटेच राहत असतील तर त्यांना किराणा सामान आणि आवश्यक वस्तू नेऊन द्या, परंतु आपण त्यांच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी निर्जंतूक होऊन स्वतः ला स्वच्छ करा.वृद्धांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या मर्यादित ठेवने महत्वाचे आहे,त्यामुळे मुलांना सोबत नेऊ नका.आपण तिथे असता तेव्हा त्यांच्यापासून अंतर राखून ठेवा आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी आपल्या संपर्कात येणारी कोणतीही वस्तू,पृष्ठभाग स्वच्छ करा.

मी व्यायामशाळेत जाऊ शकतो?

बिल्डिंग, सोसायटिंना त्यांचे जिम, पार्टी हॉल, पूल इत्यादी तात्पुरते बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.हे असे, लोकांना चांगले सामाजिक अंतर राखण्यास मदत करण्यासाठी आहे.जिमसारख्या ठिकाणी बर्‍याच पृष्ठभागांवर लोकांचा संपर्क येतो(डंबेल, ट्रेडमिलवरील हँडरेल्स इ.), आणि आपण इतर लोकांपासून आवश्यक अंतर राखू शकणार नाही.घरीच आपला व्यायाम करा, युट्यूब व्हिडिओ पहा किंवा घर न सोडता तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायामाचे अ‍ॅप्स डाउनलोड करा.
Read: फ्लॅट किंवा अपार्टमेंट घेतांना या १० वास्तूशास्त्रातील संकेतांकडे दुर्लक्ष करु नका

Social Distancing During the COVID-19 Pandemic

 

मी बाहेर खरेदी करायला जाऊ शकतो का?

जर तुम्हाला किराणा सामान आणि औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करायच्या असतील, तर होय.अनावश्यक खरेदी आपण थांबविली पाहिजे. मॉलसारखी ठिकाणे यापूर्वीच बंद केली गेली आहेत कारण ह्या अशा ठिकाणी बरीच लोक जमतात.आपण आपल्या आसपासच्या दुकानात जाऊ शकता,व जेव्हा आपण प्रवेश करता आणि बाहेर पडता तेव्हा आपण स्वच्छता केली आहे हे निश्चित करा.घाबरू नका आणि भरपूर खरेदी करून ठेऊ नका, आपल्याला किती आवश्यक आहे तेच खरेदी करण्याचे सुनिश्चित करा.शक्य असल्यास ऑनलाइन खरेदी करा जेणेकरून आपण ह्यामुळे बाहेर जाणे टाळू शकाल.

मी जेवायला बाहेर जाऊ शकतो का?

जे स्वयंपाक करू शकत नाहीत आणि ज्यांना बाहेर खाण्याचा आनंद घेणे आवडते,त्यांनी काळजी करू नका.बार, पब आणि रेस्टॉरंट्सला बंद करण्यास सांगितले गेले आहे, परंतु तरीही आपण घरी डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी अ‍ॅप्स वापरू शकता.डुन्झो, डोमिनोज इ. सारखे अ‍ॅप्स आपल्याला कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरी ऑफर करतात, बिल्डिंग / अपार्टमेंट सोसायटी मॅनेजमेंट अ‍ॅप्स,जसेकी ‘नोब्रोकरहूड’, सारखेच पर्याय देतात.हे सुरक्षिततेचा आणखी एक स्तर सुनिश्चित करते आणि आपण ज्या अनावश्यक माणसाच्या संपर्कात येणार होतात,त्या एकाला कमी करते.

जर आपल्याला अधिक मदत किंवा माहिती हवी असेल, तर खाली टिप्पणी द्या किंवा नोब्रोकरवर आमच्यापर्यंत संपर्क साधा. कोविड -19 आणीबाणीच्या वेळी खाली संपर्क साधा-
Read: नाताळ/ख्रिसमस पार्टीला खेळांसाठीच्या काही आयडिया

 

  • राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर + 91-11-23978046 किंवा 1075
  • व्हाट्सएपवर मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्क – 9013151515
  • कर्नाटक – 104
  • महाराष्ट्र – 020-26127394
  • तामिळनाडू – 044-29510500
  • दिल्ली एनसीआर – 011-22307145
  • तेलंगणा – 104
  • आंध्र प्रदेश – 0866-2410978

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask