Loved what you read? Share it with others!
नाताळ/ख्रिसमस पार्टीला खेळांसाठीच्या काही आयडिया
Picture Courtesy- swncdn[/caption]
कोणत्याही वयोगटातील मुलांना खेळण्यासाठी हा एक चांगला खेळ आहे.यामध्ये तुम्हाला पाहुण्यांच्या टीम करायच्या आहेत, आणि कुठली कॅरोल आहे हे ओळखायचं .त्यासाठी तुम्ही ख्रिसमसचे कॅरोल वाजवू शकता किंवा त्या गाण्यांमधील काही ओळी कागदावर लिहून दाखवू शकता. बरोबर उत्तर देण्यासाठी एका टीम मधील लोक विचार विनिमय करून उत्तर ठरवू शकतात.
हा कधीहि खेळता येण्यासारखा खेळ आहे आणि याला जास्त तयारीही लागत नाही.
3 ) ‘स्पून अँड ओर्नामेंट’ शर्यत
[caption id="attachment_3650" align="aligncenter" width="2122"]
Picture Courtesy - thespruce[/caption]
जर तुमच्याकडे थोडी जागा असेल, तर मग तिथे काही अडथळ्यांची वाट करा,एकदम अगदी लिंबू चमचा या खेळासारखं. एक आभूषण चमचा मध्ये ठेवायचं,एक व्यक्ती हा चमचा तोंडामध्ये पकडून त्या अडथळ्यांच्या वाटेतून मार्ग काढत काढत पुढे जाईल, चमचा मधील आभूषण खाली न पाडता. जर ते चमचामधून खाली पडलं ,तर पुन्हा पहिल्यापासून सुरु करायचं .हा खेळ अजुन आव्हानात्मक करायचा असेल तर,तुम्ही तो टीम करून खेळू शकता किंवा रिले करून.
4 ) ‘ओळखा पाहू’ खेळ
जेव्हा पाहुणे निवांत बसलेली असतील तेव्हा त्यांच्याकडे छोटे कागद सरकवा,आणि ख्रिसमस च्या झाडावरती कोण कोणती आणि किती आभूषणे लावलेली आहेत, याचा अंदाज करायला सांगा .जो व्यक्ती बरोबर आकडा सांगेल किंवा असलेल्या आभूषणांच्या आकड्या जवळ येईल, तो या खेळाचा विजेता ठरेल. हा खेळ खेळण्याचा दुसरा एक मार्ग आहे,तो म्हणजे ख्रिसमस थीम शी संबंधित खाद्यपदार्थ, आभूषणे इ. त्यांच्या समोर ठेवून, नंतर त्यांना किती आठवतात हे त्यांना लिहून देण्यास सांगणे,तेही एका मिनिटाच्या आत.
5 ) ‘पिन द नोस ऑफ रेनडीअर’
[caption id="attachment_3651" align="aligncenter" width="1500"]
Picture Courtesy - christmastwist[/caption]
हा आणखी एक मजेशीर असा खेळ आहे,जो घरातील मोठे आणि मुले दोघेही खेळू शकतात. गाढवाला शेपुट लावणे,हा अगदी तसाच खेळ आहे. यामध्ये तुम्हाला, डोळ्याला बांधण्यासाठी पट्टी आणि कागदाचा कापलेलं एक नाक बनवावं लागेल. हे नाक, खेळणाऱ्याने ,डोळे बंद करून, भिंतीवरील रेनडियर ला चिकटवायचं आहे ,डिंकाच्या किंवा पिनच्या मदतीने.जो हे अचूकपणे करील तो या खेळाचा विजेता होईल.
6 ) ‘गिफ्ट रॅपिंग’ शर्यत
हा एक साधा आणि सोपा खेळ आहे ,ज्यामध्ये आपल्याला भेटवस्तूंचे रिकामे खोके ,कात्री ,चिकट टेप, सजवण्यासाठीचा कागद,किंवा वृत्तपत्रे इ. सामान लागेल. पाहुण्यांना ठराविक जागा दिली जाईल,तिथे त्यांनी हे मोकळे खोके,भेटवस्तूंच्या सजवण्यासाठीच्या कागदांनी सजवायचे आहेत.जे लोक चांगले आणि लवकर हे रिकामे खोके सजवतील,ते हा खेळ जिंकतिल.
हा खेळ अजुन किचकट करण्यासाठी तुम्ही चित्रविचित्र आकाराच्या वस्तू वापरू शकता,आणि हे सजवण्यासाठी लागणारी खेळणाऱ्याची कला आणि मज्जा दोन्हीही पाहू शकता.
7 ) भेटवस्तू शोधणे
[caption id="attachment_3652" align="aligncenter" width="683"]
Picture Courtesy - mycrazygoodlife[/caption]
हा खेळ 2 प्रकारे खेळता येतो,एकतर प्रत्येक पाहुन्याला त्याची भेटवस्तू शोधावी लागते,तुम्ही त्यांना दिलेल्या काही क्लूच्या मदतीने, किंवा तुम्ही तुमच्या पाहुण्यांना टीममध्ये वाटून भेटवस्तू शोधण्याचा कामाला लावू शकता.ह्यामध्ये सगळ्यांना मजा येते,आणि तुम्हाला निवांत बसून मजा बघायला मिळते.जरका लहान मुले हा खेळ खेळत असतील तर क्लू थोडे सोपे द्या आणि त्यांना घरातच किंवा गार्डन मध्ये भेटवस्तू शोधायला लावा.मोठ्या माणसांकरिता तुम्ही हा खेळ अवघड करू शकता आणि क्लू शहरामध्ये कुठेही देऊन, लपवून ठेवलेली भेटवस्तू शोधण्यासाठी एक दिवसापर्यंत गाडीने फिरून योग्य क्लू शोधन्यास लावू शकता.
आम्ही आशा करतो कि हे काही खेळ तुमचा नाताळ/ख्रिसमस आनंदी करू शकतात.तुम्ही हेही तपासून बघु शकता कि काही स्वतः करण्यासारखे नाताळ/ख्रिसमस च्या सजावटीच्या काही आयडिया वर तूम्हाला काही काम करता येऊ शकतं का.
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19973+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
16228+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10439+ views
Home Loan Process in India: Step-by-Step Procedure
October 27, 2023
8318+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7428+ views
Loved what you read? Share it with others!
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!