आपल्या भाडोत्री घराला रूपांतरित करण्यासाठी,पाच  सोप्या आणि पैसे वाचविणाऱ्या टिप्स

जेव्हा तुम्ही आपल्या घरमालकाबरोबर, भाडे करारावर स्वाक्षरी करता, तेव्हा अप्रत्यक्षरीत्या तुम्ही बऱ्याच अशा , करण्याच्या आणि नाही करण्याच्या गोष्टी मान्य करता.

यामध्ये घर देखभाल खर्च,पार्किंगचे नियम, पाहुण्यांची मर्यादा,ई. गोष्टींपासून ते भिंतीवर खिळे न मारणे ,घराच्या हार्डवेअरमध्ये काही बदल न करणे,यांचा समावेश असतो. परंतु सर्वच घरमालक हे याबद्दल कटाक्ष नसतात.

असे घर मालक,ज्यांना,आपलं घर कसं पाहिजे याबद्दल खूप कायदे आणि नियम आहेत,अशांसाठी तुम्ही आपल्या घरात काय बदल करावा, जेणेकरून ते भाडोत्री घर आपलं स्वतःचं घर वाटेल?

आपले भाडोत्री घर आपल्या स्वत:च्या घरासारखे बनविण्यासाठी काही सोप्या, कमी बजेट टिप्स खाली दिलेल्या आहेत.

1 ) पडदे

yellow curtains

जर तुम्ही घरातील भिंतींचा रंग बदलू शकत नाहीत, तर मात्र घरातील पडदे बदलून,हवा तो आवडणारा किंवा तुम्हाला योग्य वाटेल तो रंग निवडून,पडद्यांमध्ये वापरू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉन्ट्रास्ट/विरुद्ध रंग वापरू शकता आणि खिडक्या अधिक मोठ्या दिसण्यासाठी पडदे देखील वापरू शकता (अर्ध्या ऐवजी पूर्ण लांबीचे पडदे वापरा),भरपूर सूर्यप्रकाश आतमध्ये येऊ देऊ शकता किंवा हवे असल्यास त्याला रोखुही  शकता.

READ  जागतिक आरोग्य दिन साजरा करणे आणि कोरोनाव्हायरस बद्दलच्या अफवा खोडून काढणे

2 ) आरसे आणि चित्रे

hall mirror

खोलीमध्ये चांगल्या प्रकारचा,जास्तीचा प्रकाश येण्यासाठी ,घरात,लटकते आरसे लावणे, हा एक उत्तम पर्याय आहे, यामुळे खोली मोठीही दिसून येते.जास्तीची जागा तयार करून आणि भरपूर प्रकाश आतमध्ये येऊ दिल्यामुळे ,तुमचे भाडोत्री घर, अमुलाग्र असे बदलले जाईल. घरात विविध चित्रे लावणे ,हेदेखील आपले व्यक्तिमत्त्व दर्शविण्याचा चांगला मार्ग आहे. परंतु हे करण्यासाठी तुम्हाला घरमालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे, कारण त्यासाठी तुम्हाला भिंतीत खिळे ठोकण्याची गरज भासणार आहे .जर भिंतीत आधीच खिळे असतील ,तर मग  चिंतेची काही गोष्ट नाही.

दुसरा पर्याय म्हणजे पोस्टर चिटकवणे हा आहे.याला केवळ काही ब्लू टॅक आवश्यक आहेत आणि यामुळे घराच्या भिंतींचे कोणतेही नुकसान होणार नाही.

3 ) स्टेटमेंट फर्निचर

blue couch

जर आपले भाड्याने घेतलेले घर ,पूर्ण फर्निश्ड किंवा सेमी फर्निश्ड असेल, तर मग तुम्हाला तुमच्या फर्निचरसह स्वत:ला व्यक्त करणे थोडं अवघड जाईल. कारण त्यासाठी तुम्हाला जागाच राहणार नाही. अशावेळेस घरात फर्निचरचे काही स्टेटमेंट पिस ठेवा,निदान एकतरी,जेणेकरून ती जागा तुमची स्वतः ची वाटेल.

ह्यासाठी तुम्ही मोठ्या रंगीत आराम खुर्चीचा किंवा ओव्हर स्टफ्ड काउच ई.चा विचार करू शकता.

READ  सुरक्षित रहा आणि संपर्कात रहा, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान 'नोब्रोकरहुड' चा वापर करुन संवाद साधा

4 ) प्रकाशयोजना

arco lamp

कठोर पांढरा प्रकाश बदलून पिवळा प्रकाश जर घरात वापरला गेला, तर हा सोपा बदल आपल्या भाडोत्री घरामध्ये उबदारपणा आणू शकतो आणि त्यात स्वतःच्या घरासारखी भावना तयार होते. प्रकाश योजना बदलण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे खोल्यांमध्ये झुंबर आणि स्कॉन्सस ऐवजी जास्त टेबल दिवे आणि फ्लोरचे दिवे वापरणे. हे दिवे पिअर गिअकोमो आणि ऍशील कॅस्तीगलिओनीच्या ,अर्को दिव्यांसारखे असू शकतात किंवा OKA द्वारे निर्मित IKAT दिव्यांसारख्या रंगीबेरंगी आणि स्वस्त वस्तू.दिवे हे खोल्यांचे चांगले रूप दर्शवतात आणि कोणत्याही खोलीत उबदारपणा आणि त्या खोलीचे व्यक्तिमत्व वाढवू शकतात.

5 ) रग आणि कालीन

blue rugs

सर्वच भाड्याने घेतलेले अपार्टमेंट संगमरवरी फरशी किंवा लाकडी फ्लोरिंगसह येत नाहीत.जर भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटची फरशी भयंकर खराब असेल, तर मग तुम्ही काय करू शकता? ती फरशी तर तुम्ही बदलू शकत नाहीत, तुम्ही तिला घासून/पॉलिश करून चकाकी देऊ शकता, परंतु हे ,तुम्ही शोधत असलेला आश्चर्यकारक परिणाम देणार नाहीत. या प्रकरणात, आपण रग अंथरून फरशी झाकून टाकण्याचा प्रयत्न करू शकता ,यामुळे खोलीला वेगळा रंग मिळतो,डाग झाकले जातात आणि घराला एक व्यक्तिमत्त्व लाभतं.तुम्ही खोली विभाजित करण्यासाठी आणि राहण्याची वेगळी जागा तयार करण्यासाठीहि, रग/कालीन वापरू शकता.

READ  आपल्या घरामध्ये हवा शुद्ध करू शकतील अशा सर्वोत्कृष्ट 15 घरातील वनस्पती

आम्हाला आशा आहे की ह्या काही सोप्या टिप्स, तुम्हाला तुमच्या भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्येहि, घरी असल्याची जाणीव अधिक करून देतील. आपल्याला आपल्या घरमालकाच्या आदेशांचे पालन न करण्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण ह्या टिप्स तुमच्या भाडोत्री घराला काहीही इजा पोहचवणार नाहीत. तर मग पुढे जा आणि आपल्या घराला रूपांतरित करण्यास सुरुवात करा.

आपण केलेले बदल आपल्याला मदत करत नसल्याचे आपल्याला वाटत असेल, तर मग नोब्रोकेर च्या तज्ञांना कळवा आणि त्यांना तुम्हाला हवे असलेले एक घर शोधुद्या,जिथे स्वतः च्या घरी असल्यासारखी भावना येईल.

Found Interesting Please Share