ब्युरो ऑफ एनर्जी एफिसिएनसि (BEE) यांनी, 14 डिसेंबर हा एनर्जी एफिसिएनसि दिवस म्हणून साजरा करण्यास सुरु केलंय.ऊर्जा सौरक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणं,त्याला जास्त कार्यक्षम कसं करता येईल हे बघणं, आणि जेवढं शक्य होईल तितकं,तिचं जतन करणं, हे ह्या मागचं उद्देश्य.आपण सर्व दररोज ऊर्जेचा वापर करतो,वेग वेगळ्या स्वरूपात.नक्कीच उर्जेशिवाय ह्या जगात जगणं शक्यच नाही.तुम्हाला हे अमूल्य संसाधन वाचवण्यासाठी आम्ही काही सोप्या ऊर्जा जतन करण्यासाठीच्या टिप्स दिलेल्या आहेत.

 

1 ) बटणं बंद करा

turn off switch

turn off switch

प्रत्येकवेळी जेव्हा तुम्ही खोलीतून बाहेर पडत असाल, तेव्हा त्या खोलीतील पंख्यांचे आणि दिव्यांचे बटन बंद केलेत कि नाही,हे तपासून पहा.जर तुमच्याकडे वॉटर हीटर असेल,तर तो काम झाल्या झाल्या बंद करा.

 

2 ) सौर पॅनल बसवा

 

सौर पॅनल,सूर्याच्या उष्णतेला ऊर्जेत रूपांतरित करतात,अक्षय श्रोत असल्यामुळे ते तुम्हाला आणि पर्यावरणाला पूरक आहे.सोलर हीटर हे आजकाल सहज उपलब्ध आणि बसवण्यासही सोपे आहेत,त्यामुळे तुम्ही वीजबिलातहि बचत करू शकाल.

 

3 ) घरातील दिवे बदला

 

LED दिव्यांच्या तुलनेत जूने फिलामेंट चे दिवे स्वस्त असतात,पण जिथे ते 25000 तास जळतात तिथे फिलामेंट चे दिवे फक्त1000 तासच जळतात. तसेच सारखाच प्रकाश तयार करायला,फिलामेंट चे दिवे 5 पट अधिक वीज वापरतात LED दिव्यांपेक्षा.

READ  रीअल इस्टेट फर्म डिजिटल मोडवर स्विच करीत आहेत

 

4 ) तुमचा फ्रिज पूर्ण भरून ठेवा

 

जर तुम्ही फ्रिज आणि फ्रीजरमध्ये कमी वस्तू ठेवत असाल,तर तुम्ही खूप ऊर्जा वाया घालवत आहात.तुमचा फ्रिज आणि फ्रीजर पूर्ण भरलेला असेल, तर मग तुम्ही वीज आदर्शरीतीने वापरत आहात.

 

5 ) योग्य तापमान राहील ह्याची काळजी घ्या

 

प्रत्येक उपकरण हे उत्पादकाच्या शिफारसीनुसार वापरायला हवे, ज्यामुळे ते उपकरण चांगल्यात चांगल्या पद्धतीने वापरणं होईल आणि त्याला वीज किती लागते ह्यावरहि लक्ष ठेवता येईल.जर तुम्ही उत्पादकाच्या सुचनेपेक्षाही फ्रिज जास्त थंड ठेवला,तर तो उगाच अजून थंड होऊन ऊर्जेचा अपव्यय होईल.

 

6 ) तुमचे कपडे काळजीपूर्वक धुवा

 

वॉशिंग मशीन वापरताना,त्यात कपडे प्रमाणातच भरा. जर तुम्ही कमी कपडे धूत असाल, तर मग पाणी आणि ऊर्जा दोन्हींहि वाया घालवताय, कारण कमी कपडे असले म्हणजे कमी ऊर्जा लागेल असं नसतं.उष्ण हवामानात कपडे बाहेर उन्हातच सुकवावेत, ड्रायरचा वापर शक्यतो टाळावाच.

 

7 ) घरातील उपकरणे अद्यावत करा

 

आजकाल उपकरणे,ज्यांना जास्त ऊर्जा लागते जसेकी एअर कंडिशनर,फ्रिज,हीटर ई.आता एनर्जी स्टार रेटिंग प्रणालीने येतात.जेवढे जास्त स्टार, तेवढं जास्त ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरण पूरक ते उपकरण.शिवाय कामगिरीमध्ये कुठलीही तडजोड होत नाही.तेव्हा मग 20 वर्ष जुन्या फ्रिजला काढून टाका ,आणि त्याला नवीन, जास्त कार्यक्षम फ्रिजने बदला.

READ  आपल्याला विजेचा धक्का बसू देऊ नका! सदोष इलेक्ट्रिकल वायरिंग शोधण्याचे आणि ठीक करण्याचे सोपे मार्ग

 

8 ) स्मार्ट पॉवर स्ट्रिप वापरा

 

वापरात नसलेल्या उपकरणाची वायर जर खोसलेली असेल तरीही ते ऊर्जा वापरत असते, ह्याला फॅंटम लोड असे म्हणतात .हे ऊर्जेचं नुकसान टाळण्यासाठी, मुख्यतः ते उपकरण वापरात नसताना स्मार्ट पॉवर स्ट्रिप वापरायचा प्रयत्न करा ,त्यामध्ये विशेष असं सर्किट असते ,जे स्ट्रिपमधल्या विद्युत आउटलेटच्या उर्जेवर लक्ष्य आणि नियंत्रण दोन्ही ठेवतं.त्याने एकूणच उर्जेची कार्यक्षमता वाढते आणि ऊर्जा वाया जात नाही.

 

9 ) सूर्यप्रकाश घरात येऊ द्या

 

दिवसा घरातील पडदे,खिडक्या उघडून द्या जेणेकरून सूर्यप्रकाश आतमध्ये येईल, त्यामुळे कृत्रिम प्रकाशाचा म्हणजेच दिव्यांचा,पंख्याचा वापर कमी होईल.

 

10 ) फोन चार्जिंग

 

आपल्यापैकी बऱ्याच जणांना रात्री फोन चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते ,म्हणजे सकाळी बॅटरी फुल झालेली पाहिजे,प्रत्यक्षात ह्याने ऊर्जा वाया जाते.फोनला काही तासांचीच गरज असते पूर्ण चार्ज होण्यासाठी,म्हणून झोपण्याअगोदर फोन चार्जिंग बंद करा आणि अनमोल अशी ऊर्जा वाचवा.

काय तुम्ही ऊर्जा कार्यक्षम असं घर शोधताय किंवा वातावरण पूरक आणि निसर्गाच्या जवळ जाणारं?

तर मग आजच नोब्रोकेर.कॉम ला भेट द्या आणि आम्हाला तुमच्या गरजा कळवा,आमच्याकडे तुमच्यासाठी एक उत्तम असं घर आहे.

Found Interesting Please Share