Marathi
comment

हे वाचल्याशिवाय भारतात घर विकत घेऊ नका

देशातले मोजकेच लोक असे आहेत जे जागे होऊन लगेच लहरीपणे घर विकत घेऊ शकतात. आपल्या उर्वरित लोकांसाठी, घर विकत घेण्यासारख्या प्रचंड मोठ्या अशा आर्थिक निर्णयासाठी, बराच विचार आणि नियोजन करावे लागते. ही मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी, आपण विचार करणे आवश्यक असलेल्या सर्वात महत्त्वाच्या बाबींची यादी आम्ही खाली केली आहे, जसे की –

Don’t Buy House in India Without Reading This
+

 

1- बजेट सेट करा

आपण आपल्या घरासाठी किती पैसे खर्च करता हे मोजण्याचा मार्ग म्हणजे,आपण किती पैसे कमवता आणि ईएमआयवर आरामात किती पैसे देऊ शकता, यावर आधारित असले पाहिजे. ईएमआयच्या प्रचंड भारामुळे तुम्हाला खूप संघर्ष करावा लागू नये किंवा आपले जगणे संकुचित करायला नको. आपल्याकडे असलेल्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत जोडून प्रारंभ करा, म्हणजेच पगार + स्वतंत्र काम + बोनस = एकूण मासिक उत्पन्न. आता या रकमेतून आपला मासिक खर्च कमी करा. जर आपल्याला वाटत असेल की आपला खर्च खूप जास्त आहे, तर आपण एखाद्या गोष्टीवर होणारा जास्तीचा खर्च कमी करू शकता. आदर्शपणे ईएमआय आपल्या निव्वळ घरपगाराच्या 20-25% पेक्षा जास्त नसावा.जर आपला ईएमआय 40-50%, किंवा त्याहूनही अधिक निव्वळ उत्पन्नावर काम करत असेल तर ईएमआय भरण्यासाठी आपण इतर उद्दीष्टांकडे दुर्लक्ष करू शकता किंवा कोणताही अनपेक्षित खर्च आला तर आपल्याला संघर्ष करावा लागू शकतो.
Read: बेंगलुरूमधे पहिल्यांदा घर घेताय? ‘खाता’बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



Don’t Buy House in India Without Reading This

 

2- आपल्या डाउन पेमेंटसाठी बचत करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नॅशनल हाउसिंग बँकेने म्हटले आहे की गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि बँकांना, मालमत्तेच्या उचित बाजार मूल्याच्या काही टक्यांपेक्षा जास्त कर्ज देण्याची परवानगी नाही. ही टक्केवारी म्हणजे कर्जाचे मूल्य (एलटीव्ही) प्रमाण आहे. जर आपण 30 लाख रुपयांच्या कर्जाची रक्कम शोधत असाल तर आपल्याला घराच्या किंमतीच्या 90% पर्यंत कर्ज मिळू शकते. 30 लाख ते 75 लाख रुपयांच्या कर्जासाठी एलटीव्ही हा 80 टक्के आहे, आणि 75 लाख रुपयांच्या पुढे तो 75 टक्के इतका आहे.

रु. 50 लाख किमतीचे घर खरेदी करण्यासाठी आपल्याकडे किमान रु. 10 लाख तयार हवेत आणि मग आपण उर्वरित कर्ज घेऊ शकता. तर, आपण किती बचत केली आहे यावर अवलंबून आपण घराचे बजेट ठरवू शकता. किंवा, आपली बचत वाढविण्यासाठी आपण मासिक एसआयपीमार्फत कर्ज योजनांमध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.

Don’t Buy House in India Without Reading This

 

3- घर कोठे खरेदी करायचे याचा निर्णय घ्या

कुठले कुठले परिसर त्या ठिकाणी वाढत चालले आहेत,त्यावर संशोधन करा, आधीच विकसित असलेल्या ठिकानावर जाण्यापेक्षा येथे गुंतवणूक करणे कधीही चांगले. पॉश परिसर खूप महाग असतील आणि आपल्या इच्छित दराशी कदाचित प्रशंशीत करणार नाहीत. वाढणारे परिसर हे अधिक परवडणारी आणि एक चांगला पर्याय असू शकेल. शहरातील गर्दी टाळायची असेल तर उपनगरामधील पर्याय पहा. इतर शहरांमध्ये घरे खरेदी करणे मोहक असू शकते, परंतु ही चांगली कल्पना नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत,ज्यात नवीन शहर परिचित नसलेले खरेदीदार चुकीच्या प्रकल्पामध्ये अडकले जातात.

आपण ज्या क्षेत्रात गुंतवणूक करीत आहात त्या ठिकाणच्या भाड्याचे दर आणि पुनर्विक्री दरांबद्दल देखील आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. हे दर्शविते की येथे किती धोकादायक / सुरक्षित गुंतवणूक होईल.
Read: 2024 मध्ये मुंबईत राहण्यासाठी शीर्ष असे 7 स्वस्त आणि सर्वोत्तम ठिकाणे

 

4- खरेदी करण्यासाठीची सर्वोत्तम वेळ पहा

भारतात घर विकत घेण्याचा सर्वाधिक लोकप्रिय वेळ उन्हाळ्यात असतो. मुलं त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीवर असल्याने हे सोपं जाते आणि कुटुंब म्हणून नवीन जागी जाणे सोपे आहे, यामुळे मुलांच्या शालेय जीवनात बाधा येत नाही. उन्हाळा हा एक लोकप्रिय काळ असल्याने, बरेच असे बांधकाम व्यावसायिक आहेत जे विशेष सवलत आणि खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी ऑफर देतात, आपण याकडे लक्ष देऊ शकता. या ऑफर अगदी उत्सवाच्या हंगामात देखील असतात, त्यामुळे वेळ ही महत्वाची आहे.

आपण पुनर्विक्रीसाठी असलेले घर विकत घेऊ इच्छित असल्यास, धीर धरा. असे बरेच घरमालक आहेत ज्यांची संपत्ती मोठ्या चांगल्या दराने विक्री केली जाते. आपणास उत्तम करारात घर मिळू शकेल, असे गुंतवणूकदार आहेत ज्यांची काही वर्षांपूर्वी घेतलेली मालमत्ता त्यांनी आता 0% मार्जिन किंवा मोबदल्यापेक्षा कमी किंमतीत ती मालमत्ता ऑफलोड करण्याचा विचार करीत आहेत. ही घरे आपण हस्तगत करण्याची वेळ आता आली आहे.

Don’t Buy House in India Without Reading This

5- योग्य घर निवडा

आपण आपल्या वापरासाठी किंवा गुंतवणूक म्हणून एखादे घर विकत घेत असल्यास, घाई करू नका. आजूबाजूला संपर्क करा, घर निवडण्यापूर्वी शक्य तेवढे पर्याय आधी पहा. बर्‍याचशा बांधकाम व्यावसायिकांशी बोला, रहिवाशांशी बोला आणि पाहत असलेल्या पहिल्याच घरात जाऊ नका.

पुनरावलोकने पहा, नोब्रोकर सारख्या अनुभवी कार्यसंघासह कार्य करा जे आपल्याला अनेक पर्याय दाखवू शकतात, आपल्याला सर्वोत्तम सौदे देतात आणि आपल्या वतीने आपल्यासाठी बोलणी देखील करतात. येथे अधिक शोधा. गृह निरीक्षकांची नेमणूक करा आणि उत्कृष्ट वकील मिळवा, जेणेकरून आपले दस्तऐवजीकरण आणि घर योग्य असेच असेल.
Read: घर देखरेखीसाठीच्या 5 महत्त्वपूर्ण आणि सोप्या टीप्स

आपल्या घर खरेदीसाठी सर्व शुभेच्छा! आणि लक्षात ठेवा, नोब्रोकर आपल्याला प्रत्येक मार्गाने मदत करण्यासाठी येथे आहे. आम्हाला खाली एक संदेश ड्रॉप करा किंवा नोब्रोकर वर आमच्यापर्यंत पोहोचा.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask