whatsapp sharing button 4
Marathi
comment

आपल्या घरामध्ये हवा शुद्ध करू शकतील अशा सर्वोत्कृष्ट 15 घरातील वनस्पती

हे अगदी बरोबर म्हटले गेले आहे की झाडे हे मनुष्यांचे सर्वात चांगले मित्र आहेत. ते मानवाचे मूक सहकारी आहेत, जे त्यांच्या फायद्यांसाठी त्यांची अनेक प्रकारे सेवा करतात. आपल्याला ताजी हवा मिळत असल्यामुळे,बर्‍याच झाडे व हिरव्यागार सभोवतालच्या क्षेत्रात राहणे आरामदायक आणि शांत वाटते, हिरवळ आपल्या डोळ्यांनादेखील शांत करते.

15 indoors plants that can purify the air inside your house
+

पण आजची जीवनशैली खूप बदलली आहे. एकल घरांऐवजी लोक आता मल्टीस्टोरिड अपार्टमेंटमध्ये राहत आहेत जेथे निसर्गाशी संपर्क साधला जात नाही. या प्रकरणात, येथे काही स्वतंत्र घरातील वनस्पती आहेत ज्याचा वापर आपण आपल्या घरामध्ये हवा ताजी ठेवण्यासाठी करू शकता.

हवा शुद्ध करणारी झाडे घरात ठेवून आपण घराच्या आतमध्ये हवा प्रदूषणमुक्त ठेवू शकता आणि थकलेल्या दिवसानंतर आपल्याला मोकळा श्वास घेणे सोपे होईल. आपण नेहमीच अशी झाडे आपल्या बेडरूममध्ये,लिव्हिंग रूममध्ये किंवा बाल्कनीमध्ये ठेवू शकता. स्वच्छ हवेची आपली सेवा देताना ते आपल्या खोल्यांचे आतील भागाची शोभा देखील वाढवतील. आपल्या घरामध्ये ठेवता येतील अशा भारतातील सर्वोत्तम हवा शुद्ध करणाऱ्या, घरातील वनस्पतींची यादी येथे आहे. हे बघा.

  1. स्पायडर प्लांट

सर्वोत्कृष्ट घरातील वनस्पतींबद्दल बोलताना आपण नेहमी स्पायडर प्लांट वनस्पतीचा विचार करतो. आपण नवीन अनुभव घेत असल्यास, स्पायडर प्लांट वनस्पती खरेदी करू शकता कारण ती वाढण्यास सुलभ आहे. या रोपाच्या देखभालीसाठी आपल्याला जास्त वेळ घालण्याची गरज नाही.
Read: लॉकडाऊन दरम्यान स्व-काळजीचे महत्त्व


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



ही वनस्पती आपण आपल्या घराच्या उज्ज्वल भागात ठेवा, परंतु थेट सूर्यप्रकाशाच्या खाली नाही. आपल्याला रोपाला पाणी देण्याबद्दल घाबरण्याची गरज नाही. जर आपण त्यास काही दिवस पाणी देण्यास विसरलात, तरीही ही वनस्पती खूप चांगले जगू शकते. जसजसे वनस्पती वेगाने वाढत जाईल, तसतसे काही दिवसातच छोटे छोटे झाडाची शूट्स तयार होईल.

spider plant

  1. इंग्लिश आयव्ही

बर्‍याच काळापासून, या झाडाचा उपयोग ग्राउंड कव्हर म्हणून व आपले घर सुशोभित करण्यासाठी केला जात आहे. हे आपले घर मोहक बनवते आणि आपल्या घराच्या हवेतील हानिकारक रसायने आणि धूळ कण काढून टाकण्यासाठी ही वनस्पती आश्चर्यकारकपणे काम करते.

तो वेल वर्गीय आहे, म्हणून आपण त्याला आपल्या इच्छेनुसार आकार देऊ शकतो. आपण एखाद्या अपार्टमेंटमध्ये रहात असल्यास,आपल्या खोल्या सुंदर दिसण्यासाठी आपण इंग्लिश आयव्हीने खिडक्या सजवू शकता. इंग्लिश आयव्ही वाढविणे हे अवघड नाही, कारण ते संपूर्ण सावलीत किंवा पूर्ण उन्हातदेखील वाढू शकते. योग्य काळजी घेतल्यास ही वनस्पती बरीच वर्षे जगेल.

english ivy

  1. लॅव्हेंडर

आपल्या सुगंधित फुलांनी,आपल्या संवेदनांना पुन्हा उभारी देणारी वनस्पती घरात असण्याबद्दल आपले काय मत आहे? होय, लॅव्हेंडर हे त्या वनस्पतींपैकी आहे जे आपण आल्या घरामध्ये ,आपल्या बेडरूममध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये देखील वापरू शकता.

थकलेल्या दिवसानंतर एकदा आपण आपल्या घरात प्रवेश केल्यानंतर,लॅव्हेंडरच्या फुलांच्या सुगंधाने पुन्हा प्रफुल्लित होऊ शकता. लॅव्हेंडर वनस्पतीची कुंडी, तेजस्वी आणि थेट सूर्यप्रकाशाखाली ठेवा. आपण दक्षिण-दिशेच्या खिडकीतदेखील ही वनस्पती ठेवू शकता.ह्याला जास्त पाणी घालू नका कारण ते रोपाची मुळे सडवू शकते. आपण एखाद्याला वाढदिवस किंवा वर्धापन दिनानिमित्त, लॅव्हेंडर देखील गिफ्ट करू शकता. ही उत्कृष्ट अशी भेट असेल.

lavender

  1. कोरफड

ही एक सूर्य-प्रेमी आणि वाढण्यास सुलभ अशी वनस्पती आहे, आणि ह्यापासून बरेच फायदेही मिळतात. आपण स्वयंपाकघरातील खिडकीमध्ये कोरफडीचे भांडे ठेवू शकता. हे आपल्या घराची हवा स्वच्छ करू शकते. जर आपल्या घराच्या हवेमध्ये फॉर्मलडिहाइड असेल,तर ते काढून टाकण्यासाठी कोरफड ही सर्वात चांगली वनस्पती आहे. त्याखेरीज एलोवेरा जेलचे इतर बरेच फायदे आहेत.
Read: 2024 मध्ये चेन्नईत राहण्यासाठी सर्वोत्तम आणि परवडणारी ठिकाणे

जेल त्वचेसाठी चांगले आहे कारण ते आपल्या त्वचेचे कापलेले आणि भाजलेले बरे करते. ही वनस्पती वाढविणे सोपे आहे. कोरफडीला जास्त पाणी लागत नाही म्हणून आपण या वनस्पतीस पाणी घालतेवेळी काळजी घ्यावी. तसेच, आपण कोरफडीच्या भांड्याभोवती मोठे खडे ठेवू शकता,जेणेकरून भांड्यातील ओलावा जास्त काळ टिकून राहील.

aloe vera

  1. फर्न

आपल्याकडे पाळीव प्राणी असल्यास, घरातील वनस्पतीची रोपे घेण्याबाबत आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. आपल्याकडे कायम फर्न असू शकतो, कारण हा विषारी नसतो आणि ह्यापासून पाळीव प्राण्यांना कोणताही धोका नसतो. ही वनस्पती घराच्या आतल्या हवेतून फॉर्मलडिहाइड काढून टाकण्यासाठी देखील सक्रिय आहे.

त्याशिवाय, हे घरांमधील लहान धूळ कण काढून टाकू शकते आणि हवा शुद्ध करू शकते,जी सर्वांसाठी श्वास घेण्यास उपयुक्त असेल, अगदी मुलांसाठीही. आपण ही वनस्पती, ज्या ठिकाणी अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळेल, त्या ठिकाणी ठेवत असल्याचे सुनिश्चित करा. मातीला मॉइश्चराइज्ड ठेवा, परंतु त्यास कधीही ओव्हरवॉटर करू नका.

Fern

  1. बेबी रबर प्लांट

होय, रबर वनस्पती प्रचंड मोठे असतात. परंतु आपण घरातील वनस्पती शोधत असताना,आपण लहानशा रबरच्या वनस्पतींबरोबर जाऊ शकता. आपल्या बेडरूममध्ये किंवा मुलाच्या बेडरूममध्ये,हवा योग्यरित्या शुद्ध करण्यासाठी हा वनस्पती असणे एक चांगली कल्पना आहे.
Read: तुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स

ही वनस्पती भरपूर प्रमाणात ऑक्सिजन उत्सर्जित करते, जे आपल्यासाठी चांगली आहे,आणि हवेतून रसायने काढून टाकण्यास देखील हे प्रभावी आहे.बेबी रबरच्या रोपाला दररोज पाणी देऊ नका कारण त्याला कमी पाणी लागते. तसेच, चांगली वाढ होण्यासाठी ह्याला अप्रत्यक्ष प्रकाश व चांगली माती आवश्यक आहे.

Baby Rubber Plant

  1. बांबू पाम

जर आपण घरातील सर्वोत्तम वनस्पती शोधत असाल, तर आपण बांबूच्या पामसोबत जाऊ शकता कारण ते सुंदर दिसतात आणि आपल्या घरामधील हवा शुद्ध करतात. हे घरगुती वनस्पती, आपल्या घराच्या आतल्या हवेतून फॉर्मलडिहाइड आणि बेंझिन सहजपणे काढून टाकू शकते आणि श्वास घेण्यास सुखदायक बनवते.

हवा शुद्ध करण्याव्यतिरिक्त, बांबू पाम नैसर्गिक आर्द्रता वाढवणारा म्हणूनदेखील काम करते, कारण ही वनस्पती आपल्या खोल्यांमधील ओलावा काढून हवा कोरडी ठेवू शकते, विशेषत: पावसाळ्याच्या दिवसात. ही वनस्पती योग्यरीत्या वाढविण्यासाठी,ओलसर माती आणि अप्रत्यक्ष प्रकाश आवश्यक आहे.

Bamboo Palm

  1. चायनिस एव्हरग्रीन

आपल्याला हवेचे शुद्धीकरण करणारा आणि मोहक दिसणारा एखादा घरगुती वनस्पती हवा असल्यास, हा वनस्पती योग्य आहे.ह्याची लाल आणि हिरवी पाने अद्भुत दिसतात. या वनस्पतीस कमी ते मध्यम उज्ज्वल प्रकाशाची आवश्यकता आहे आणि त्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही.

परंतु आपल्या घरात पाळीव प्राणी असल्यास, ही वनस्पती घेणे टाळा. यात एक ‘इरिटन्ट’ असतो जो आपल्या पाळीव प्राण्यांसाठी विषारी असू शकतो. हवेचे प्रदूषक काढून टाकण्यास आणि श्वास घेण्यास हवा निरोगी बनविण्यासाठी, ही वनस्पती योग्य निवड असू शकते.

Chinese Evergreen

  1. लेडी पाम

आपल्या घरात लावण्यासाठी पाल्म्स ही एक अद्भुत निवड आहे.ह्या वनस्पती बर्‍याच प्रकारांमध्ये येतात आणि आपल्या घरासाठी, ह्यातील कुठलाही प्रकार आपण मिळवू शकता.लेडी पाम तिच्या असणाऱ्या पंख्यासारख्या  पानांमुळे मोहक दिसते.
Read: आपल्या फर्निचरची काळजी घेण्याचे 5 सोपे मार्ग

हवा शुद्ध करण्यासाठी, लेडी पाम नेहमीच उत्कृष्ट कार्य करते. यासाठी चांगली माती, अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश आणि योग्य प्रमाणात पाणी, ह्यासारखी फारच कमी देखभाल आवश्यक आहे. जर आपण बर्‍यापैकी स्टाईलिश आणि सुंदर असाल, तर आपल्या घरात असलेलं एक लेडी पाम, आपल्या विशिष्ट चविबद्दल काहीतरी नक्कीच सांगेल.

Lady Palm

  1. जर्बेरा डेझी

एक घरातील वनस्पती जी सुंदर फुले देखील देते,अशी घरात असण्याबद्दल आपले काय मत आहे?ह्यासाठी आपण जर्बेरा डेझी ची निवड करू शकता. ट्रायक्लोरोइथिलीन काढून टाकण्यासाठी ही वनस्पती प्रभावी आहे,तर ह्याची लाल फुलं आपल्या खोलीला टुमदार दिसण्यास मदत करते.

फक्त इतकेच नाही तर ही वनस्पती आपल्या खोल्यांमधून बेंझिन देखील काढू शकते, जी सहसा शाईने येतात. ह्या वनस्पतीला आपल्या बेडरूममध्ये ठेवा,जिथे त्याला पुरेसा प्रकाश मिळू शकेल. तसेच या रोपाच्या योग्य वाढीसाठी, तुम्हाला चांगली निचरा होणारी माती लागेल.

Gerbera Daisy

  1. ब्रोमेलीएड

ब्रोमेलीएड, हे घरासाठी त्या सर्वोत्कृष्ट वनस्पतींपैकी एक आहे, जे आपल्या घराला सुंदर रंग जोडू शकते. हे आपल्या घरामधील हवेतील प्रदूषक, धूळ कण आणि रसायने काढून टाकण्याचे काम करते.

एका अभ्यासानुसार ब्रोमेलीएड्स, बेंझिन आणि एसीटोनसह सहा प्रकारचे वायु प्रदूषक,हवेतून काढून टाकू शकतात. ब्रोमेलीएड्स 12 तासांच्या आत आपल्या खोल्यांमधून सुमारे 80% प्रदूषक काढून टाकू शकतात. रंगीबेरंगी फुले आपल्या डोळ्यांना शांत करण्यासाठी तिरिक्त फायदे आहेत.

Bromeliad

  1. फायकस

जरी लोक कुंडीमध्ये लहान घरगुती रोपे खरेदी करण्यास प्राधान्य देतात, परंतु आपण घरातील उंच रोपासाठी देखील जाऊ शकता. फायकस हे घरातील त्या रोपांपैकी एक आहे, जे आपण ठेवत असलेल्या भांड्यावर अवलंबून, 2 ते 10 फूट उंच वाढू शकते. हा वनस्पती आपल्या घरात राहू शकणारा सर्वोत्कृष्ट असा मोहक व हवा शुद्ध करणारा आहे. आपल्याला त्यास अधूनमधून पाणी देणे आणि ते अप्रत्यक्ष प्रकाशाखाली ठेवणे आवश्यक आहे. आपण शहरी भागात रहात असल्यास आपल्या घरात हा वनस्पती, आपल्याला पुरेशी हिरवीगार पालवी देईल.

Ficus

  1. पीस लिली

ह्याची फुले सुंदर आहेत! फक्त इतकेच नाही, तर या वनस्पती देखील बर्‍यापैकी कठोर आहेत आणि जास्त काळ जगतात. हे घरातील अशा वनस्पतींपैकी एक आहे जे घरातील बुरशीजन्य बीजांसह,अनेक घरगुती रसायने प्रभावीपणे काढू शकतात.

आपण या वनस्पतीस बाथरूम, कपडे धुण्यासाठीची खोली किंवा स्वयंपाकघरात ठेवू शकता, जेणेकरून ते हवेतील अतिरिक्त ओलावा काढून टाकू शकतील आणि अशा भागात मूस आणि बुरशी होण्यापासून टाळतील. पीस लिलीसाठी उज्ज्वल परंतु अप्रत्यक्ष प्रकाश आणि जास्त पाणी आवश्यक आहे.

Peace Lily

  1. ड्रॅगन ट्री

नावाला घाबरू नका, कारण ही वनस्पती ड्रॅगन प्रमाणे अजिबात प्राणघातक नाही. त्याऐवजी ही मनुष्यांसाठी अनुकूल आहे, कारण ते आपल्या खोल्यांमधील हवायुक्त रसायने आणि धूळ कण काढून टाकते आणि श्वास घेण्यास हवा स्वच्छ करते.

ह्याची पाने हिरव्या ते जांभळ्या रंगाची असू शकतात, ज्यामुळे ही वनस्पती आणखी सुंदर दिसते. जसे की हा वनस्पती कमी प्रकाश सहन करू शकतो, आपण आपल्या ऑफिसच्या खोलीत देखील ह्याला ठेवू शकता.

Dragon Tree

  1. स्नेक प्लांट

हवा शुद्ध करणार्‍या घरातील विविध प्रकारच्या वनस्पतींच्या यादीमध्ये, आणखी एक उल्लेख करणे आवश्यक आहे. या वनस्पतीस, “सासूची जीभ” म्हणूनही ओळखले जाते.

टॉयलेट क्लीनर, टिश्यू, टॉयलेट पेपरद्वारे आपल्या घरात प्रवेश करणारा फॉर्मलॅहाइड स्वच्छ करण्यासाठी, आपण ही वनस्पती घेऊ शकता. सहसा, लोक ही वनस्पती बाथरूममध्ये ठेवणे पसंत करतात.

Snake Plant

येथे आपण घरातील हवा शुद्धीकरणासाठी वापरू शकणाऱ्या, घरातील सर्वोत्कृष्ट वनस्पतींची सूची बघितली आहे. शहरातील राखाडीपणा आपले डोळे थकवतो, आणि दूषित हवा आपल्यासाठी बर्‍याच आरोग्याच्या समस्या निर्माण करते. वायू प्रदूषण सर्रास होत असल्याने, घरात झाडे ठेवणे आपल्याला निसर्गाच्या जवळ राहण्यास, आणि आरोग्याची चांगली काळजी घेण्यास मदत करते.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Loading More Post...

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask