तुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स

तुमचे घर भाड्याने देणे,ही एक अशी गोष्ट आहे जिथे प्रयत्नांची गरज असते.कारण पहिलंतर, त्याच्याशी तुमचे भावनिक मूल्य संलग्न असतात, आणि दुसरं म्हणजे भाडेकरू, घर व्यवस्थित वापरतील अन सुस्थितीत ठेवतील ना, ह्याबद्दल तुम्हाला चिंता वाटणे,जेकी बरोबरच आहे.शेवटी हा विचार की,भाडेकरू आपल्या घरात किती काळ टिकेल, आणि आपण भाडेकरु किती काळ टिकवू इच्छित आहात. याचा विचार कदाचित त्रासदायक ठरू शकतो, जर तुम्ही दोघांनीही भाडेकरार केलेला नसेल तर.

घर भाडोत्री देण्याच्या प्रक्रियेबद्दल मदत करण्यासाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत.

अगोदरच्या गोष्टी अगोदर

rent price

तुमच्या परिसरामध्ये असलेल्या घरभाड्याविषयी आधी माहिती करून घ्या,जर ही माहिती मिळण्यास तुम्हाला अडचण येत असेल, तर मग तुम्ही स्वतः एका भाडेकरूच्या स्वरुपात, त्या परिसरामध्ये फिरून, स्वतः भाडेकरू असल्याचे भासवून, भाड्याचा अंदाज घेऊ शकता. यामुळे तुमच्या जागेला मिळणाऱ्या भाड्याचा ही अंदाज तुम्हाला येईल. नोब्रोकर.कॉम या वेबसाईटवर तुमचं भाडं जाणा, हे एक असं फीचर आहे जे तुमच्या मालमत्तेचं योग्य भाडे दर्शवतो. तुम्ही घर भाड्याने देऊ इच्छित असल्यास तुम्ही आम्हाला कॉल करून विचारू शकता.हे आपल्याला भाडे किंमतीबाबतच्या पातळीची कल्पना देईल, आणि आपल्याला घर भाड्याने द्यायच्या वेळेस मदतिचं ठरेल.

READ  लॉकडाऊन दरम्यान आपली कार आणि बाइक चालू स्थितीत कशी ठेवावी

दिसणं फरक पाडेल

plant at home - how to rent your house

आपले घर अधिक आकर्षक वाटण्याकरिता, आवश्यक असलेल्या ,हव्या त्या सुधारणा करा. कधीकधी, एखाद्या खोलीच्या कोप-यात एक दिवा किंवा इनडोअर प्लांट ठेवण्यासारखे सर्वात सोपे व कमी खर्चिक पर्याय देखील घराला एक विलक्षण अनुभव देऊ शकतात.गालिचा साफ करणे,उडालेला रंग देऊन घेणे आणि खिडकीचे पडदे बदलणे,ह्या गोष्टींकडे आपण अल्पकालीन मूल्य जोडणी म्हणून देखील पाहू शकता.

ऑनलाइन या आणि ब्रोकरेज वाचवा

how to split rent

तुमच्या घराला ऑनलाइन पोर्टल्सच्या यादीत समाविष्ट करा,जिथे ब्रोकर लोकांचा अडथळा नसेल. जेणेकरून तुमच्या घर भाड्याने देण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष देऊ शकता. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार भाडेकरूंसाठी निवड-निकष ठरवू शकता.

योग्य वेळ साधा

how to rent your house

ग्राहक घर-शोध नमुना अभ्यास, सूचित करतो की, शुक्रवारी पोस्ट केलेल्या भाडे जाहिराती ,इतर दिवशी पोस्ट केलेल्या जाहिरातींपेक्षा जास्त वेळा बघितल्या जातात. कदाचित कारण लोक आठवड्याचे शेवटचे दिवस त्यांच्यासाठीचे घर शोधण्यात घालवतात.

भाडेकरू म्हणून तुम्हाला कोण पाहिजेत?

tenant - how to rent your house

आपण आपले घर, कुटुंबास किंवा जवळच्या मित्रांना भाड्याने देऊ इच्छित असाल ,कारण यामुळे आपल्याला आपले घर चांगल्या हातांमध्ये असल्याचे आश्वासन मिळते. हे बरे राहील कि ,आपले घर कोणासाठी म्हणून भाड्याने द्यायचे ,हे आधीच ठरवले पाहिजे किंवा आपल्या जागेसाठी कोण योग्य भाडेकरू होऊ शकेल याचा एक अंदाज घेतला पाहिजे,म्हणजे कुटुंबासाठी, बॅचलर्ससाठी ई.

READ  आपल्याला रजा,परवाना करार आणि भाडे करार यामधील फरक माहित आहे काय?

आम्हाला आशा आहे की, वरील माहितीमुळे आपल्या घराला, भाड्याने देण्याची प्रक्रिया सुलभ होईल.जर तुम्हाला अजून माहिती व मदत हवी असेल तर नोब्रोकेर ला भेट द्या.आमच्याकडे,कोणत्याही ब्रोकरेजशिवाय आपल्याला आवश्यक असलेली मदत मिळू शकेल.

Found Interesting Please Share