Marathi
comment

2024 मध्ये चेन्नईत राहण्यासाठी सर्वोत्तम आणि परवडणारी ठिकाणे

चेन्नई, यापूर्वी मद्रास म्हणून ओळखले जाणारे, हे भारताच्या तामिळनाडू राज्यामध्ये एक महानगरीय शहर म्हणून विकसित झाले आहे आणि हे भारतातील सहाव्या क्रमांकावर आहे. चेन्नई मेट्रोपॉलिटन क्षेत्र, हे भारतातील सर्वात मोठ्या महानगरपालिका अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. हे दक्षिण भारतातील सर्वोच्च आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या समृद्ध संगीत परंपरेसाठी,चेन्नई 2017 मध्ये युनेस्को क्रिएटिव्ह सिटीझ नेटवर्क (यूसीसीएन) मध्ये जोडले गेलय.1980 पासून चेन्नई हे अपोलो हॉस्पिटल, मद्रास मेडिकल मिशन्स इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओवास्कुलर डिसीसेस आणि श्री रामचंद्र युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, हे देशातील आघाडीचे वैद्यकीय केंद्रांसाठीं प्रसिद्ध आहे. तामिळ फिल्म इंडस्ट्रीचे, चेन्नई हे घर आहे. परवडणारी घरं, भव्य शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि एमएनसी,हे विद्यार्थी आणि नोकरदारांना आकर्षित करतात.

chennai
+

निवासी वसाहतींच्या विस्तारामुळे, मागणीत घसघशीत वाढ झाली आहे. म्हणूनच, निवासी युनिट्सचे दर आणि राहण्याची किंमत येथे वाढत आहे. जगण्याचा खर्च वाचवण्यासाठी लोक, 2020 पासून चेन्नईत राहण्यासाठी स्वस्त जागा शोधत आहेत.

जर आपण चेन्नईमध्ये राहण्यासाठी परवडणारी ठिकाणे शोधत असाल, तर येथे सर्वोत्तम मानले जाऊ शकतात असे काही परिसर दिलेले आहेत:

 

1.सिरुसेरी

सिरूसेरी, आयटी हब असल्याने चेन्नईमधील गजबजलेलं क्षेत्र आहे. सिरुसेरीमधील बहुतेक निवासी सोसायटीच्या परिसरात आधुनिक सुविधा आहेत ज्यामध्ये लिफ्ट, क्लबहाऊसेस, जलतरण तलाव आणि फिटनेस सेंटर आहेत. सिपकोट आयटी पार्क, आशियातील सर्वात मोठे आयटी पार्क सिरुसरी येथे आहे, जे जगभरातील आयटी व्यावसायिकांना येथे खेचत आहे. शिवाय, हे टीसीएस, टेक महिंद्रा आणि सीटीएस सारख्या एकाधिक एमएनसी चे माहेर आहे. सिरुसेरीमध्ये गुंतवणूक करणे ही नेहमीच चांगली कल्पना आहे.जेव्हा शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, रुग्णालये आणि रोजगाराचा प्रश्न येतो, तेव्हा सिरुसेरीकडे आपल्याला देण्यासाठी उत्तम पर्याय असतात. आयटी हब असल्याने या क्षेत्रामध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. कनेक्टिव्हिटी अधिक सुधारण्यासाठी चेन्नई मेट्रोचा दुसरा टप्पा प्रस्तावित करण्यात आला असून, त्यात माधवाराम ते सिरूसेरी या मार्गावरील एक मार्ग असण्याची शक्यता आहे. कुटुंबे असलेल्या लोकांसाठी आणि सेवानिवृत्त लोकांसाठी देखील हे एक आदर्श आणि परवडणारे स्थान मानले जाते.
Read: चेन्नईची स्थापत्य कला


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



Siruseri

भाडेः1 बीएचके फ्लॅट,15000 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत.

जवळील मूलभूत सामाजिक सुविधा:

  • शैक्षणिक संस्था: आयटीएम बिझिनेस स्कूल चेन्नई, अमेलिओ अर्ली एज्युकेशन – सिरुसरी
  • रुग्णालये: हायजिया हेल्थकेअर, मधुरा हॉस्पिटल
  • मॉल्स:द मरिना मॉल
  • उद्याने: टीसीएस गार्डन

 

2.पेरियार नगर

हे विलीवक्कम, कोलाथूर आणि पेरंबूर जवळ आहे. या क्षेत्राला विश्वासार्ह सार्वजनिक परिवहन प्रणालीचा फायदा आहे. ते जोरदारपणे बस आणि गाड्यांद्वारे जोडले गेलेले आहे. आपण शॉपिंगची आवड असलेले व्यक्ती असल्यास, जवळ बरीच शॉपिंग सेंटर आणि बुटीक आहेत. पेरियार नगर, चेन्नईमधील राहण्यासाठी स्वस्त घरे असलेल्यांपैकी एक आहे.

Periyar Nagar

भाडेः 1 बीएचके फ्लॅट 7000 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीच्या पुढे आणि 1 आरके 4000 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

जवळील मूलभूत सामाजिक सुविधा:

  • शैक्षणिक संस्था: पेरियार मॅट्रिकुलेशन हायर सेकंडरी स्कुल, वल्लालार मॅट्रिकुलेशन स्कूल, भक्तवत्सलम मेमोरियल कॉलेज फॉर वुमन
  • करमणूक: अरुलमीगु श्री पार्थसारथी स्वामी मंदिर
  • रूग्णालये:गव्हर्नमेंट पेरिफेरल हॉस्पिटल, डॉ लव्हान्य कार्तिकेयन 
  • उद्याने: चेन्नई कॉर्पोरेशन पार्क- पेरियार नगर

 

3.आय्याप्पंथंगल

चेन्नईच्या दक्षिण-पश्चिम भागात जलद वाढणार्‍या उपनगरांपैकी एक म्हणजे,आय्याप्पंथंगल. हे चेन्नई शहरापासून 18.6 किमी अंतरावर आहे. आय्याप्पंथंगल हे शहरातील इतर भागाशी बस व रेल्वेने चांगले जोडलेले आहे. 6 एकरातील आय्याप्पनथंगल बस टर्मिनस, तांबाराम, कोवलम, सोममंगलम, कोयम्बेडु, कुंद्रथूर, सुंगुवचत्रम आणि मिंट अशा महत्त्वपूर्ण स्थानांना जोडला गेलेला आहे.सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन,अवडी आणि गुंडी येथे आहेत, जे पश्चिम लाईन आणि चेन्नई दक्षिण वर अनुक्रमे 12 कि.मी आणि 11 कि.मी. अंतरावर आहेत. येथे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी उत्तम कनेक्टिव्हिटी आहे, जे पल्लवाराम रोडमार्गे केवळ 11.5 किमी अंतरावर आहे. चेन्नई मेट्रोचे, अलंदूर आणि सेंट थॉमस माउंट मेट्रो शेजारीच आहेत, हे काम करणार्‍या व्यावसायिकांसाठी एक वरदानच आहे. डीएलएफ आयटी पार्क ब्लॉक 14, अंबित आयटी पार्क, ईएसपीईई आयटी पार्क, वन इंडियाबुल्स पार्क यासारख्या प्रमुख आयटी हबची उपस्थिती,आय्याप्पनथंगलसाठी अजून एक फायदा आहे. चेन्नईमध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम आणि परवडणारी ठिकाणे शोधत असलेल्या नोकरी शोधणा-यांना आय्याप्पनथंगलची शिफारस केली जाते.
Read: भारतातील पूर्व-मंजूर गृहकर्ज समजून घेणे

Iyyappanthangal

भाडेः 1 बीएचके  9000 रुपयांपासून सुरू होते.

जवळील मूलभूत सामाजिक सुविधा:

  • शैक्षणिक संस्था: कलशेत्र मॅट्रिकुलेशन स्कूल, सेंट अ‍ॅन्नाल मॅट्रिकुलेशन स्कूल, श्री रामचंद्र डेंटल कॉलेज
  • करमणूक: पोरूर लेक
  • रुग्णालये: एमएमएस रुग्णालय
  • उद्याने: चेन्नई कॉर्पोरेशन पार्क – मारुती नगर पार्क

 

4.अवडी

अवडी हे चेन्नईमधील सर्वात जुन्या भागांपैकी एक आहे, आणि बहुतेक अनेक संरक्षण आस्थापने आणि उत्पादन घटकांसाठी ओळखले जाते. अण्णा नगर, अंबत्तूर आणि नुंगमबक्कम पासून 15 मिनिटांच्या अंतरावर, हे एक लोकप्रिय गुंतवणूक ठिकाण आहे. सार्वजनिक वाहतुकीने,येथील जीवन सुलभ आणि कमी थकवणारे बनवल्याने, बऱ्याच वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रगत झाले आहे. आयटी उद्योगाच्या अस्तित्वामुळे, आयटी व्यावसायिकांनी या क्षेत्राकडे झुंबड घातली आहे, ज्यामुळे येथे घरांची मागणी वाढत आहे. प्रख्यात शैक्षणिक आणि आरोग्य सेवा संस्था, रोजगाराच्या संधींचा भरभराट, तसेच विकसित क्षेत्राच्या सभोवतालच्या मजबूत सामाजिक पायाभूत सुविधांसह, अवडी ही लहान कुटुंबे असलेल्या तरुण व्यावसायिकांसाठी एक उत्तम निवासी क्षेत्र आहे.
Read: व्यावसायिक क्लिनरकडून तुम्हाला मदत हवी आहे,हे दर्शविणारी 5 चिन्हे

Avadi

भाडेः भाड्याने देण्यासाठी 2 बीएचके फ्लॅट्स सरासरी 6,000-8,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहेत.

जवळील मूलभूत सामाजिक सुविधा:

  • शैक्षणिक संस्था: व्ही.जी.एन. चिन्मय विद्यालय शाळा, इंम्याकुलेट हार्ट गर्ल्स हायर सेकंडरी स्कुल, आलिम मुहम्मद सालेघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
  • करमणूक: अवडी लेक, परुतीपट्टू लेक पार्क
  • रुग्णालये: रेनबो आय हॉस्पिटल, के.सी. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल
  • उद्याने: कॉर्पोरेशन पार्क, भीष्मा पार्क

 

5.वंदलूर

हे चेन्नई शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात स्थित आहे, जे रेल्वे किंवा रस्त्याद्वारे सहजतेने उपलब्ध आहे. ओआरआर (आउटर रिंग रोड) आणि जीएसटी रोड (ग्रँड सदर्न ट्रंक) यांच्याशी थेट जोडल्यामुळे, वंदलूर सर्वात नवीन उभरते रिअल्टी ठिकाण बनले आहे. तांबाराम, पेरूंगलाथुर, मुडीचूर, उरापक्कम आणि पडप्पाई अशा काही प्रमुख ठिकाणांपासून, वंदलूर हे फक्त 5 कि.मी. अंतरावर आहे. चेन्नईतील कोणत्याही उपनगरात, वंदलूरप्रमाणे महान जोड असलेलं ठिकाण नाही. वंदलूर रेल्वे स्थानक, चेन्नई उपनगरीय रेल्वे मार्ग, एग्मोर आणि तंबरम यांना जोडते.वंदलूर-केळमबक्कम मार्ग,हा केलंबक्कम मधील आयटी कॉरिडोर ते जीएसटी, आणि जुना मामलापुरम रोड (ओएमआर) यांना जोडणाऱ्या ग्रँड सदर्न ट्रंक (जीएसटी) रोड जंक्शनपासून सुरू होणारा 18 कि.मी लांबीचा रस्ता आहे. हा रस्ता विमानतळापासून अंदाजे 24 किमी अंतरावर आहे.
Read: बेंगलुरूमधे पहिल्यांदा घर घेताय? ‘खाता’बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.

Vandalur

भाडेः 1 बीएचके अपार्टमेंट दरमहा सरासरी 5000 रुपये भाड्याने आणि 1RK 3000 रुपयांना उपलब्ध आहेत.

जवळील मूलभूत सामाजिक सुविधा:

  • शैक्षणिक संस्था: श्री विश्व विद्यालय शाळा, विलीस इंटिग्रेटेड हायस्कूल, क्रेसेंट कॉलेज
  • करमणूकः अरिग्नार अण्णा झूलॉजिकल पार्क, निन्जा भारथ, वंदलूर रिझर्व फॉरेस्ट
  • रुग्णालये: थालीर हॉस्पिटल
  • मॉल्स: गोल्ड सॉक ग्रांडे मॉल चेन्नई
  • उद्याने: चिल्ड्रन पार्क

 

6.तंबाराम

चेन्नईच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या रहिवासी क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेलं, तंबाराम हे चेन्नईमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. हे क्षेत्र रेल्वे स्टेशन आणि विमानतळ या दोन्ही ठिकाणांहून चांगले जोडलेले आहे. स्टेशनवरून विमानतळावर जाण्यासाठी सुमारे 10 मिनिटे लागतात. ओएमआर त्याच्या आयटी हबसाठी लोकप्रिय आहे. हे तांबाराम पासून केवळ 12 कि.मी. अंतरावर आहे, जे कॉर्पोरेट व्यावसायिकांना प्रवास करण्यास सोयीस्कर ठरते. शहरी रहिवासी शाळा, महाविद्यालये, इस्पितळांपासून आयटी पार्कपर्यंत सर्वकाही येथे असल्याने, या क्षेत्राने स्थावर मालमत्ता गुंतवणूकदारांना आकर्षित केले. असंख्य आगामी प्रकल्पांमुळे परिसरातील घरांची मागणी वाढत आहे.

Tambaram

भाडेः 6500 हजार रुपयांपासून पुढे येथे स्वस्त घर मिळू शकते.

 जवळील मूलभूत सामाजिक सुविधा:

  • शैक्षणिक संस्था: लव्हेंडर स्कूल, सॅन अ‍ॅकॅडमी
  • करमणूक: ओपन एअर थिएटर
  • रुग्णालये: दीपम हॉस्पिटल, हिंदू मिशन हॉस्पिटल, एन एस हॉस्पिटल
  • उद्याने: मुथुरंगम पार्क, भारती पार्क

 

या व्यतिरिक्त, पोरूर, अंदंबक्कम, ओएमआर अशी अनेक इतर क्षेत्रे आहेत,जिथे बजेट अनुकूल दरात आपल्याला राहण्यासाठी आदर्श जागा आहेत.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask