जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी घर शोधत असता,तेव्हा तुम्ही प्राधान्याने आपल्या मुलांच्या गरजांचा,आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करत असता. कुटुंबासोबत राहत असताना, तुमच्या घराशेजारी खाण्याची दुकानं,हॉटेल्स, पब असतील तर तुमची काही हरकत नसेल,पण शाळा, करमणूक सुविधा,सर्व कुटुंब असलेला समुदाय, इत्यादी आपल्या सूचीच्या शीर्षस्थानी असणारच.तुमच्या याआधीच्या गरजांच्या तुलनेत ह्यावेळेसच्या नविन गरजा खूप वेगळ्या झालेल्या असतात.कुटुंबासाठी एक योग्य घर शोधणे इतके सोपे काम राहिलेले नाही,आणि त्यासाठी बऱ्याच तडजोडी आणि समायोजन करावे लागते.हे त्रासदायक व अवघड असू शकते, म्हणून आपल्याला बऱ्याच गोष्टी,जसे की घराचं स्थान, सभोवतालीचा परिसर, कार्यालय,शाळा किती दूर आहेत ई. गोष्टींच संतुलन साधावं लागतं.

आपल्या कुटुंबासाठी घर शोधताना,कोणत्या गरजांना कसे प्राधान्य द्यायचे, ते येथे आपण पाहूयात.

स्थान

how to find the perfect house

घराची निवड करताना आणि त्याला अंतिम स्वरूप देताना आपण अनेक दृष्टीकोनातून स्थानाचे विश्लेषण केले  पाहिजे.आपल्याला पाहिजे असलेल्या स्थानाविषयी अचूक कल्पना असणे आवश्यक आहे,कि ते रुग्णालये, बाजारपेठेसारख्या ई.मूलभूत सुविधांपासून किती सुलभ अंतरावर आहे. सर्वात पहिली गोष्ट तुम्ही तपासली पाहिजे ती म्हणजे, चांगल्या शाळांपासून ते स्थान किती दूर आहे.तुमच्या मुलांनी फक्त आपल्या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी,जास्त दूर अंतर कापत जावं अशी तुमची इच्छा नसणारच, तर काही शाळा दोन किलोमीटर पेक्षा जास्त दूर राहणाऱ्या मुलांना प्रवेशही देत नाहीत.दुसरा मुद्दा विचारात घेण्यासारखा म्हणजे,आपल्या कार्यालयाचे घरापासूनचे अंतर.या निर्णयामध्ये मदत करण्यासाठी आपण ‘नोब्राकर लाइफ स्कोअर कॅल्क्युलेटर’ वापरुन पाहू शकता.तसेच,वारंवार वीज कपात, पाणी कमतरता, प्रदूषण, गर्दीयुक्त रस्ते किंवा कमी हिरवळ असलेल्या कोणत्याही परिसरात जाण्याची तुमची ईच्छा नसतेच.म्हणून, घर निवडताना,त्याला अंतिम स्वरूप देण्याआधी, या गरजा पूर्ण करणाऱ्या स्थानांबद्दल सखोल संशोधन करा.

READ  उन्हाळ्यात आपले घर थंड ठेवण्याचे मार्ग

सुरक्षित शेजार

जसेकी तुम्ही आपल्या कुटुंब आणि लहान मुलांसोबत स्थलांतरित होत असता,त्यामुळे तुम्हाला त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची ईच्छा असते.आपल्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारचं शेजार मिळणार,ह्याची चौकशी करण्याची आवश्यकता असते.जास्त कुटुंबे असलेलं शेजार, हे कधीही सुरक्षित असते.सभोवतालच्या परिसरात दिवसाच्या कोणत्याही वेळी जाणे सुरक्षित आहे की नाही? हे आपण पहायला हवे. कौटुंबिक स्वरूपाचं असं वातावरण तपासा, आसपास मुलं खेळताना दिसतात,त्यांच्याशी व त्यांच्या पालकांशी चर्चा विनिमय करा, ज्यामुळे तुम्हाला समजून येईल कि हा परिसर राहण्यायोग्य कितपत ठीक आहे.

मुलांसाठीच्या सुविधा

how to find the perfect house

मुलांसाठी शाळा, उद्याने, खेळाचे मैदान आणि मनोरंजक केंद्रे यासारख्या काही सुविधा घराजवळ असणे आवश्यक आहे.लहान मुलांसाठी,मोठ्या घरापेक्षा, चांगल्या सुविधा असणे प्राधान्याचे असते.कुटुंबासह राहताना खेळाचे मैदान असणे म्हणजेे जवळपास सुपरमार्केट असण्या इतके महत्वाचे आहे.सुविधांसह तडजोड केलेल्या मोठ्या घरापेक्षा,छान सुविधा असलेल्या छोट्या घराची निवड करणे नेहमीच चांगले असते. घरात मुले असणे हे मोठ्या जबाबदारीचे काम आहे, आणि आपल्याला सर्व गोष्टी त्यांच्या दृष्टिकोनातूनही समजून घेण्याची गरज असते.घराजवळ असलेल्या मूलभूत सोयीसुविधांमुळे आपले कुटुंब फक्त आनंदीच राहणार नाही, तर यामुळे आपल्याला त्यांना बाहेर घेऊन जाण्याची वेळ देखील कमी येईल.

READ  आपल्या घरात पाण्याणे होणाऱ्या नुकसानीची ही चिन्हे बघा व दुरुस्तीवर होणारा हजारोंचा खर्च वाचवा

मोकळी जागा महत्त्वाची आहे

how to find the perfect house

जेव्हा आपण जागेविषयी बोलतो, त्यावेळेस घराच्या आकाराशी त्याचा संबंध नसतो.तर ते,मुलांसाठी असणाऱ्या ऐसपैस खेळण्याच्या जागेबद्दल आणि कुटुंबाच्या सर्व गरजा भागविण्यासाठी असलेल्या पुरेशा साठवणूक जागेशी संबंधित असते.लहान मुलांबरोबर राहताना, साठवणूक जागा मर्यादित असेल तर, घराची आवरा आवर करणे कठीण होते.त्यामुळे घर आकारात लहान असले तरी चालेल,पण सामानाची सोय करण्यासाठी स्वयंपाकघरात तसेच इतर खोल्यांमध्ये पुरेशी साठवणूक योग्य जागा आहे कि नाही याची खात्री करा,जिथेकी आपलं जास्तीचं असं सामान ठेवलं जाऊ शकतं.मोठी बाग आणि घराबाहेर भरपूर जागा असणे महत्वाचे आहेच, परंतु आपल्या रोजच्या जीवनावर परिणाम करणारी कुठली गोष्ट असेल, तर ती म्हणजे साठवणूक करण्यासाठी असलेली जागा. विश्वास ठेवा, मुलांबरोबर राहताना आपल्याला आसपास जितकी मिळू शकेल तितक्या जागेचा संग्रह केला पाहिजे.

जर आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेतल्या, तर एक परिपूर्ण घर शोधणे महत्वाचे आणि कठीण कार्य आहे.घराचा आकार कि परिसर,ह्यामध्ये काय निवडावे,अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला तडजोड करणे आवश्यक असते.तथापि, बाकी इतर बरेच घटक आहेत जे आपल्याला कशाला प्राधान्य दयावे हे ठरावण्यास मदत करू शकतात.नोब्राकरमध्ये, आमच्या ग्राहकांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, आमच्याकडे प्रत्येक प्रकारची मालमत्ता आहे.तर मग जास्त विचार करू नका, आपल्या कुटुंबासाठी एक परिपूर्ण घर शोधण्यासाठी, नोब्रोकरवर लवकर नोंदणी करा.

Found Interesting Please Share