जेव्हा तुम्हाला तुमचं घर विकायचे, किंवा भाड्याने द्यायचे असते, आणि त्याची तुम्ही वेळेवर देखरेख करत नसाल, तर तेव्हा तुम्हाला घरातील बऱ्याचशा गोष्टींची सुधारणा किंवा निराकरण करणे भाग असते. म्हणून ऐनवेळेची धांदल कमी करण्यासाठी, आणि दुरुस्ती खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी ,घराची नियमित देखरेख ठेवणे आवश्यक आहे.
खालील काही गोष्टी तुम्ही नियमित करू शकता आणि घराची काळजी घेऊ शकता.
1 ) दरवाजे
[caption id="attachment_3676" align="aligncenter" width="500"]

door hinge[/caption]
जेव्हा दरवाज्यांचा विषय येतो, तेव्हा वेळेनुसार आणि वातावरणानुसार दोन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात.पहिलं,बिजागऱयांचा होणारा आवाज, आणि दुसरं म्हणजे, दरवाजाचं लाकूड फुगून निर्माण होणारा अडथळा.शक्यतोे पावसाळ्यात हा त्रास जास्त जाणवतो. बिजागऱयांचा ,करकर असा आवाज कमी करण्यासाठी, ग्रीस किंवा डब्ल्यू डी 40 अशा स्नेहकांचा वापर करावा. लाकूड फुगून दरवाजा जाम होण्यापासून रोखण्यासाठी, तो सँड पेपरने किंवा रंध्याने घासून घ्यावा, जेणेकरून तो व्यवस्थित बंद होईल.
2 ) भिंतीवरील पाण्याचे डाग
[caption id="attachment_3677" align="aligncenter" width="800"]

water stains[/caption]
पाण्याचे डाग पडण्याचे अनेक कारणे असू शकतात, जसेकी ,भिंतीमधील चिरा किंवा फुटलेल्या नलिका.एकदाका डागांचं हे मुख्य कारण दुरूस्त केलं ,तर मग तुम्हाला, ह्या डागांमुळे झालेली हानी भरून काढावी लागते. हे करण्यासाठी योग्य उपाय म्हणजे 10% ब्लीच पाण्यात मिसळून त्याचा फवारा डाग असलेल्या भिंतींवर मारणे .फवारल्यानंतर 24 तासांच्या आत ,हे डाग नाहीसे होतात,फक्त ब्लीच वापरताना काळजी घ्यावी .जर हे तुम्हाला अवघड वाटत असेल, तर मग तुम्ही बाजारातून डाग स्वच्छ करण्यासाठी चे दुसरे उपाय करू शकता.
3 ) घराची आग विरोधक यंत्रणा तपासा

ही दोन चरणांची प्रक्रिया आहे. पहिलं म्हणजे ,घरातील फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर व्यवस्थित चालू आहेत की नाही हे तपासा,हवं असेल तर, त्यांच्या बॅटरी बदला.दुसरा म्हणजे, फायर एक्सटींगुईशेर योग्य रीतीने काम करतोय की नाही हे बघा.त्यांनाही एक्सपायरी तारीख असते आणि देखरेखीची ही नितांत गरज असते .ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता किंवा त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलावून हे करून घेऊ शकता .असं जर वेळेवर केलं नाही ,तर मग आग आपल्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते.
4 ) झुळ-झुळ वाहणारे पाणी

हे महत्वाचं आहे की ,नळांद्वारे पाणी व्यवस्थित चालावे आणि ड्रेनेज मधूनही बाहेर विना अडथळा वाहले जावे .नळांमध्ये क्षार जमा होणे किंवा रेती अडकून बसणे ही एक साधारण समस्या आहे. हे मुख्यतः नळांमध्ये असणाऱ्या जाळ्यांमध्ये बघायला मिळते .त्यासाठी तुम्ही हाताने या जाळ्या काढून स्वच्छ धुऊन,पुन्हा बसवून दिल्यास ,त्यातून पाणी व्यवस्थित चालेल .ड्रेनेजच्या नळ्याही विशिष्ट असे केमिकल्स वापरून स्वच्छ केल्या जाऊ शकतात.
5 ) घराची खोल स्वच्छता करा
[caption id="attachment_3679" align="aligncenter" width="800"]

deep clean service[/caption]
घराच्या रोजच्या देखभालाव्यतिरिक्त, घराची खोल स्वच्छता करून घ्यावी. हे तुम्ही सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी करू शकता,जसा तुमचा घरचा वापर असेल, किंवा जेवढे मोठे तुमचे घर असेल,त्याप्रमाणे .दैनंदिन स्वच्छतेपासून सुटलेल्या जागा, यामध्ये प्रामुख्याने स्वच्छ होऊन निघतात ,जसेकी, कपाटा खालील जागा, पंखे, दिवे,टीव्ही मागील जागा ई.
जर तुम्हाला स्वतःला हे जास्त कष्टदायक वाटत असेल, तर तुम्ही आमच्या नोब्रोकर.कॉम च्या प्रतिनिधींना बोलावून घेऊ शकता .त्यांच्याजवळ योग्य उपकरणे आणि अनुभव असल्याकारणाने तुमचं काम व्यवस्थित केलं जातं.
घराची किंमत वाढवण्यासाठीच्या काही मार्गाव्यतिरिक्त, या काही घराच्या देखरेखीच्या टिप्स वापरुन, आपण
घराची योग्य किंमत लाऊ शकता.
सुस्थितीतील आपलं घर भाड्याने किंवा विकण्याच्या दृष्टीने केव्हाही चांगले असते.लक्षात असू द्या कि
नोब्रोकर.कॉम तुमच्या घरासाठी एकदम योग्य किंमत आणि गिऱ्हाईक मिळवून देईल.
Loved what you read? Share it with others!
admin,Author
NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage.
Following are service along with Rent / Sell / Buy of Properties
- Rental Agreement
- Packers And Movers
- Click And Earn
- Life Score
- Rent Receipts
- NoBroker for NRIs
Join the conversation!