Marathi
comment

जागतिक आरोग्य दिन साजरा करणे आणि कोरोनाव्हायरस बद्दलच्या अफवा खोडून काढणे

या वर्षी – 2020 मध्ये, 7 एप्रिल रोजी आपण जागतिक आरोग्य दिन साजरा करत आहोत.दरम्यान कोविड -19 सर्व देशभर (किंवा खंडभर) असल्यामुळे, पूर्वीपेक्षा ह्यावेळेस स्पष्ट आहे की, जागतिक आरोग्य हे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य दिनाची सुरुवात 1950 मध्ये डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या वतीने,जागतिक आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण बाबींवर आपले लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आली. प्रत्येक वर्षी ह्या दिवसाची एक थीम असते,आणि या वर्षीची थीम आहे,परिचारिका आणि दाईंना समर्थन दर्शविणे.

+

 

परिचारिका आणि दाई, जग कसे निरोगी ठेवत आहेत?

आपण बातम्या पहात असल्यास, आपल्याला जगभरातील डॉक्टर आणि परिचारिका,कोरोनव्हायरस – कोविड -19 संक्रमित झालेल्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावताना दिसतील.परिचारिका आणि इतर आरोग्य सेवा कर्मचारी सर्व रूग्णांना दर्जेदार, आदरणीय आणि समर्पित काळजीपूर्वक सेवा देत आहेत. ते सर्व चोवीस-चोवीस तास काम करीत आहेत आणि आपला जीव धोक्यात घालवत आहेत,जेणेकरुन जग हया साथीच्या रोगातून बरे होईल.

 

ते त्यांच्या पायांवर तास अन तास उभे असतात आणि बर्‍याचदा त्यांच्या स्वत: च्या गरजांकडे दुर्लक्ष करतात,जेणेकरून जे आजारी आहेत त्यांना योग्य उपचार आणि आधार मिळेल. ते जागरूकता पसरविण्यात आणि इतरांना स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि निरोगी रहाण्यास शिकवितात.

Celebrating World Health Day and Busting Coronavirus Myths

आपण परिचारिका व दाईंना मदत कशी करू शकतो?

 

बदल घडविण्यासाठी आपल्याला राजकारणी किंवा धोरणकार बनण्याची गरज नाही, आपण बदल करू शकता व परिचारक आणि दाईंना मदत करू शकता –
Read: आपले घर स्वच्छ आणि निर्जंतुक कसे करावे – कोरोनाव्हायरसपासून स्वतःचे रक्षण करा


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



 

  • त्यांच्या परिश्रमांबद्दल त्यांचे कौतुक करा.

 

  • त्यांचे आभार माना, कामावर त्यांची छायाचित्रे किंवा व्हिडिओ घ्या आणि त्यांचे प्रयत्न किती अमूल्य आहेत हे प्रत्येकास कळू द्या. जेव्हा आपण हे सोशल मीडियावर सामायिक करत असाल तेव्हा हे हॅशटॅग वापरा – # सपोर्ट नर्सेसअँड मिडवाईवस आणि # कोविड-19.

 

  • याचिका तयार,सुरू करा किंवा स्थानिक नेत्यांना त्यांना योग्य पाठिंबा देण्यास आणि त्यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगा, त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार कार्य करण्यासाठी त्यांना मदतीची आवश्यकता आहे.

Celebrating World Health Day and Busting Coronavirus Myths

कोविड -19 साथीच्या रोगात मदत करण्यासाठी आपण काही करू शकतो का?

 

कृतज्ञता व्यक्त करण्याव्यतिरिक्त, त्यांचे आभार मानण्याबरोबरच आणि स्थानिक नेत्यांना आपल्या आरोग्यसेवांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगायला सांगण्याशिवाय,आपण सुरक्षित राहून इतरांना शिक्षण देऊन मदत करू शकतो, या कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी आपण जे काही करू शकतो ते आपण केलेच पाहिजे.

 

कोविड-19 विषयी माझ्या आसपासच्या लोकांना मी कसे शिकवू शकेन आणि मी काय करावे?

 

आपल्या आसपासच्या लोकांना मदत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे,आपल्या स्वत: भोवती फिरत असलेल्या कोरोनावायरसच्या दंतकथा आणि वास्तविक तथ्यांमधील फरक माहित करून घेणे. येथे काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला जागरूक करण्यासाठी आवश्यक आहेत –

 

  1. उच्च तापमानामुळे कोरोनाव्हायरस नष्ट होतो. सुरक्षित राहण्यासाठी आपण उन्हात किंवा 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात वेळ घालवला पाहिजे.

= हे खोटे आहे. गरम देशांमध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. थेट सूर्यप्रकाशामध्ये उभे राहणे किंवा 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात राहिल्यामुळे आपणास व्हायरस होण्यापासून वाचवित नाही. आपल्याला वारंवार आपले हात धुण्याची गरज आहे, आपल्या तोंडाला स्पर्श करणे टाळा आणि सामाजिक अंतराचा सराव करा. स्वतःचे रक्षण करण्याचे हेच ज्ञात मार्ग आहेत.

 

  1. भारतीयांची प्रतिकारशक्ती इतरांपेक्षा चांगली आहे, त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची काहीच गरज नाही.

= हे खरे होण्यासाठी भारतीयांची आयुर्मानाची संख्या चांगली असणे आवश्यक आहे. हे जसे की आपल्याला माहित आहे तसे नाही, आपला आयुर्मानाचा विचार केला तर आपण जगातील 128 व्या क्रमांकावर आहोत. डब्ल्यूएचओने प्रकाशित केलेला एअर क्वालिटी डेटाबेस पाहिला तर जगातील सर्वाधिक प्रदूषित 10 शहरांपैकी 9 शहरे भारतात आहेत!जगात मधुमेहांची संखेमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत, याचा अर्थ असा आहे की आपण आधीच गैरफायद्यात आहोत. हा एक नवीन विषाणू आहे, जो आपण यापूर्वी पाहिला नव्हता, म्हणूनच भारतीय म्हणून आपण त्याच्यावर रोग प्रतिकारशक्ती निर्माण केली हे बहुधा संभव नाही. कोविड -19 ची बातमी येते तेव्हा आपण जगाच्या इतर देशांप्रमाणे सावधगिरी बाळगण्याची आणि कोणतीही जोखीम घेण्याची आवश्यकता नाही.त्यामुळे हे विधान चुकीचेच आहे.
Read: कोविड -19 साथीच्या महामारी दरम्यान सामाजिक अंतर

 

  1.   अल्कोहोल कोरोना जंतूंचा नाश करतो,म्हणून

              अल्कोहोल पिल्याने तुमचे रक्षण होईल.

= जर आपण जास्त मद्यपान केले तर आपला इतर बर्‍याच आरोग्यविषयक समस्येनी शेवट होईल. मद्यपान केल्याने फायदा होत नाही, हे धोकेदायक आहे आणि प्रतिकारशक्ती देखील कमकुवत करते, ज्यामुळे आपण अधिक संवेदनशील बनता. आपण आवश्यक असल्यास, संयमात प्यावे परंतु हे आपल्याला व्हायरसपासून संरक्षण देत नाही, हे लक्ष्यात ठेवा, म्हणून हे चुकीचे आहे.

 

Celebrating World Health Day and Busting Coronavirus Myths

 

  1.   आपण शाकाहारी पदार्थ खाल्ल्यास, 

                आपल्याला कोरोना होणार नाही.

= हे खरं आहे की कोरोनाव्हायरसने एका प्राण्यापासून मनुष्यापर्यंत उडी घेतली आहे, तरीही अद्याप कोणत्याही ज्ञात प्राण्यांच्या प्रजातींमध्ये हा विषाणू वाहू शकला नाहीये. वैद्यकीय तज्ज्ञांनी लोकांना मांसाहार करण्याविषयीच्या अफवांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे आणि यामुळे आपणास व्हायरस कसा होतो हेदेखील सांगितले जाते. चिकन आणि इतर मांस खाणे सुरक्षित आहे, फक्त स्वच्छतेच्या योग्य पद्धतींचे अनुसरण करा. शाकाहारी खाद्य आपल्याला चुकीची कल्पना बनविण्यापासून, व्हायरस होण्यापासून प्रतिबंधित करणार नाही.हे विधान चुकीचे आहे.
Read: आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना

 

  1.   आपल्याला डासांमधून कोरोनाव्हायरस होऊ

                 शकतो.

= डब्ल्यूएचओने प्रकाशित केल्याप्रमाणे ‘आजपर्यंत कोरोनाव्हायरस डासांद्वारे संक्रमित केला जाऊ शकतो असे सूचित करण्यासाठी कोणताही पुरावा मिळालेला नाही.’ संसर्ग झालेल्या व्यक्तीला खोकला किंवा शिंका येणे किंवा लाळेच्या थेंबातून किंवा नाकातील स्त्रावामधून सर्वात मोठे संक्रमण होते. त्यामुळे हे खोटे आहे.

Celebrating World Health Day and Busting Coronavirus Myths

  1.   चीनमधील पार्सल कोविड -19 पसरवू

                  शकतात म्हणून तेथून काहीही मागवू नका.

= हे खरं आहे की कोरोनाव्हायरस बराच काळ (पृष्ठभागावर अवलंबून) जिवंत राहतो आणि प्लास्टिक आणि कार्डबोर्डवर 24 ते 70+ तास जिवंत राहू शकतो. परंतु पार्सल चीनमधून आपल्यापर्यंत पोहोचण्यास जास्त वेळ लागत असल्याने, आणि तापमानात बरेच बदल होत असल्याने ही कल्पना खोटी ठरविण्यात आणि व्हायरस टिकण्याची शक्यता नाही. सुरक्षित राहण्यासाठी, बाहेरून तुमच्या घरात येणारी कोणतीही गोष्ट स्वच्छ व निर्जंतूक करा.

 

  1.   कोरोनाव्हायरस केवळ वृद्धांनाच प्रभावित 

                   करतो,तरुणांना नाही.

= डब्ल्यूएचओच्या मते, सर्व वयोगटातील लोकांना कोरोनाव्हायरसचा त्रास होऊ शकतो, म्हणून हे चुकीचे आहे. वृद्ध लोकांना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विशेषत: जर त्यांना पूर्वीचा दीर्घकालीन आजार असेल (जसे की दमा, मधुमेह, हृदयविकार) कारण त्या आजारामुळे ते अधिक असुरक्षित आहेत आणि त्यांना बरे होण्यासाठी अधिक त्रास होऊ शकतो.तरुणांनी आरोग्याची काही समस्या असल्यास,त्यांना देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे,आणि त्यांनी तसे केले नाही तर ते व्हायरसचे वाहक असू शकतात व दुसऱ्या लोकांना असुरक्षित करू शकतात. म्हणूनच चांगली स्वच्छता आणि सामाजिक अंतर पाळणे हे महत्त्वाचे आहे.
Read: मुद्रांक शुल्कामध्ये कपात केल्यामुळे रिअल इस्टेटला चालना मिळेल: पीएमसी

 

  1.   आपण 10 सेकंद आपला श्वास रोखू शकत 

                  असल्यास आपल्याला कोरोनाव्हायरस

                  नाही.

= आपला श्वास 10 सेकंदांपर्यंत रोखून ठेवणे कोविड-19 चाचणी म्हणून कार्य करते, असा विश्वास खोटा आहे. डॉ. फहीम युनूस, मेरीलँड विद्यापीठातील संसर्गजन्य रोगांचे प्रमुख, म्हणाले की कोरोनाव्हायरस संक्रमित लोक जास्त काळ आपला श्वास रोखू शकतात.आपल्याला कोरोनाव्हायरस सारखा गंभीर आजार असल्यास, याची पुष्टी करण्याचा प्रयत्न करणे चांगली कल्पना नाही. चाचणीद्वारेच जाणून घेणे योग्य आहे कारण आपल्याला भरपूर असे लक्षणे दिसतात जेकी फक्त चाचणी मुळेच सांगू शकतील कि कोरोनाव्हायरस आजार आहे कि नाही ते.

 

  1.   कोविड -19 बरोबर लढण्यासाठी आले, 

                  लिंबू, मध, लसूण आणि भारतीय मसाले

                  चांगले आहेत

Celebrating World Health Day and Busting Coronavirus Myths

 

= होय, काही भारतीय मसाल्यांचा काहीशा प्रमाणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा परिणाम आहे,आणि काही पदार्थ आपल्या प्रतिकारशक्तीला चालनादेखील देतात. तथापि, या विषाणूविरूद्ध हे पदार्थ उपचार करू शकतात, किंवा संघर्ष करू शकतात याचा पुरावा नाही. लक्षात ठेवा, कोरोनाव्हायरस एक विषाणू आहे, बॅक्टेरियम नाही,म्हणून हे चुकीचे आहे.

 

  1.   आपण पुरेसे पाणी किंवा कोमट पाणी

                    प्यायल्यास आपल्या पोटातील ऍसिड

                    व्हायरस नष्ट करते

= प्रथम, हे समजणे महत्वाचे आहे की पाणी आपल्या पोटातील आम्लचा प्रभाव सौम्य करेल, म्हणून आपण जितके जास्त पाणी प्याल ितके ते तीव्रतेने कमी होईल. दुसरे म्हणजे, बहुतेक व्हायरसमध्ये पोटातील ऍसिडच्या संपर्कात टिकून राहण्याची क्षमता असते. कोरोनाव्हायरस पोटावर नव्हे तर श्वसनमार्गावर परिणाम करते, म्हणून ह्यामध्ये पोटातील आम्ल कोणतीही भूमिका निभावत नाही, यामुळे हे खोटे ठरते.

 

आपण इतर कोणत्या अजून काही अफवा ऐकल्या आहेत, किंवा तुम्हाला कोरोनाव्हायरस बद्दल काही उत्तरांचं जाणून घेणं आवश्यक आहे? आम्हाला खाली एक संदेश ड्रॉप करा किंवा नोब्रोकरवर आमच्यापर्यंत संपर्क साधा.

 

कोविड -19 आणीबाणीच्या वेळी खाली संपर्क साधा-

 

  • राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर + 91-11-23978046 किंवा 1075

 

  • व्हाट्सएपवर मायगोव्ह कोरोना हेल्पडेस्क – 9013151515

 

  • कर्नाटक – 104

 

  • महाराष्ट्र – 020-26127394

 

  • तामिळनाडू – 044-29510500

 

  • दिल्ली एनसीआर – 011-22307145

 

  • तेलंगणा – 104

 

  • आंध्र प्रदेश – 0866-2410978

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask