आज 10 डिसेंबर,आजच्या दिवशी स्टॉकहॉल्म स्वीडन येथे नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. ही तारीख अल्फ्रेड नोबेल, या नोबेल फाऊंडेशनच्या संस्थापकाला मानवंदना म्हणून ठरवली गेलेली आहे, आणि ही परितोषिके त्याच्या वैयक्तिक मालमत्ते मधून दिली जातात. अल्फ्रेड नोबेल यांना कुठल्यातरी मार्गाने,माणवतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करायचा होता आणि त्याच संकल्पनेतून ह्या पुरस्कारांचा जन्म झाला.

दरवर्षी हा समारंभ जिथे आयोजित केला जातो ती हीच आश्चर्यकारक जागा,स्टॉकहॉल्म कॉन्सर्ट हॉल.

हा हॉल म्हणजे स्वीडनमधील स्थापथ्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना.

Picture Courtesy – wikimedia

हॉल विषयी थोडसं

या हॉलचं बांधकाम 1920 साली झालं आणि त्याचे उद्घाटन 1926 साली करण्यात आलं .ईवर टेंगबोम हा मुख्य स्थापथ्यकार आणि डिझायनर होता.स्वीडिश निओ क्लासिकल  स्थापथ्य कलेला लोकप्रिय करण्यासाठी तो सुप्रसिद्ध आहे. स्टॉकहॉल्म कॉन्सर्ट हॉल,हे त्याचं काम,ह्या कलेच्या शैलीचं एक परिपूर्ण उदाहरण आहे.

हा ब्ल्यू हॉल स्टॉकहॉल्मच्या हृदयस्थानी आणि होतोरगेटच्या पूर्वेला आहे. हॉलची पुढील बाजू होतोरगेट कडे तोंड करून आहे .ही जागा हेय मार्केट म्हणून वापरात असायची आणि या देशाचा एक खूप ऐतिहासिक भाग आहे .

बाहेरील बाजूस तुम्हाला एक मोठा ब्रॉंझ/कांस्य कारांजा दिसेल ,ह्याला ओर्फेस-बृंनें म्हणतात ज्याची रचना स्वीडिश कलाकार आणि शिल्पकार कार्ल मिलल्सने केलीय.

आतील बाजूने सुंदरशी प्रकाशरचना आणि इतर वैशिष्ट्ये एवल्ड दहलस्कोग,इसाक गृनेवल्ड ई. लोकांनी सकारलीय. तिथे उत्तम असं शाश्रीय शैलीचं फर्निचर भरपूर बघायला मिळेल आणि दरवाज्यांवर सुंदरसं नक्षीकामहि.1980 च्या दशकामध्ये हॉलच्या अंतर्गत भागाची बरीचशी पुनरबांधणी करण्यात आली, परुंतु कधीही त्याची भव्यता कमी झालेली नाही.

 

हॉल साठीची प्रेरणा

1902 साली,स्टॉकहॉल्म कॉन्सर्ट अससोसिअशन, निर्माण केली गेली.त्यांचं काम होतं कि त्यांनी शहरामध्ये कायम कॉन्सर्टसशी संबधित कार्यक्रमांच आयोजन करत राहावं.त्यासाठी नॉर्रा बंतोरगेट इथे त्यांचं जुनं आणि मोडकळीस आलेलं एक ऑडिटोरिअम होतं.त्यांना माहित होतं कि आता नंतर एका वेगळ्या  ठिकाणाची गरज पडणार आहे.

Picture Cpurtesy -runeberg

ह्या नवीन प्रकल्पासाठी लागणाऱ्या स्थापथ्यकाराच्या निवडीसाठी त्यांनी स्थापथ्य कलेशी निगडित विविध स्पर्धा आयोजित केल्या.अशा स्पर्धांमधून त्यांनी तरुण स्थापथ्य प्राध्यापक निवडला,ज्याचं नाव होतं,ईवर टेंगबोम.

जसंकी हा हॉल रॉयल स्टॉकहॉल्म फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राचं घर म्हणून काम करणार होता,त्यामुळे ईवर टेंगबोमने त्याची,संगीतासाठीचं मंदिर,म्हणून कल्पना केली,खासकरून एक ग्रीक मंदिर म्हणून.

प्रकाश योजनाही त्यामुळे बाहेरून आतमध्ये कमी होत जाताना दिसते ,जसेकी ग्रीक मंदिरांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. भिंतीवर प्रकाशीत दिव्यांची रचनाही फ्लॅरेस पद्धतीचे आहेत,ग्रीक देवतांच्या असंख्य मूर्त्या आणि मोसैकस ऑफ ओर्फेस देखील आहे .हॉलची भव्यता मोठ्या जिन्यांमुळे आणि जिन्यांवर प्रकाशित केलेल्या क्रिस्टल झुंबरांमुळे खूपच उठून दिसते.

स्टॉकहॉल्म ही वास्तू बाकीच्या वास्तूंपेक्षाही खूप वेगळी भासत असे,कारण ते लोकशाही पद्धतीने लोकांना जमा होण्याचं ठिकाण  होतं .ह्याचा अर्थ असा, कि वेग-वेगळ्या वर्गांची लोकं इथे कार्यक्रम बघण्यासाठी एकत्र येत आणि त्याचा भाग बनून जात.

 

आजचा हॉल

उदघाटणापासून स्टॉकहॉल्म कॉन्सर्ट हॉल हा ,रॉयल स्टोकहोल्म फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राचं घर राहिलेला आहे आणि नोबेल पारितोषिकेही दरवर्षी डिसेंबरच्या 10 तारखेला इथे देण्यात येतात.

ह्याच्या व्यतिरिक्त दरवर्षी इथे संगीताचे कार्यक्रम आणि मोठ मोठ्या गायकांचे कॉन्सर्टस भरपूर प्रमाणात होतात.

जसेकी ज्युलिया मॉर्गन म्हणाल्यात कि “स्थापथ्य हि दृष्टीमय कला आहे,आणि ह्या वास्तू स्वतः साठी बोलताना दिसतात”.

स्टॉकहॉल्म ही वास्तू खऱ्याने,प्रत्यक्ष अनुभवायची असेल तर संधी मिळेल तेव्हा तिथे भेट नक्की द्यावी.