भारतासारख्या देशामध्ये राहताना,जिथे लोक इतके मित्रत्वाने वागतात ,इथे कोणाला भेटायला जाताना भेटण्याच्या वेळापत्रकाची वाट पाहत नाहीत.

तुमचा घरमालक अचानक तुमच्या घरी भेटायला येणार असेल तर तुमचं कसं होईल? जर तुमचं नशीब खूपच वाईट असेल आणि तुमचा घरमालक तुमच्या जवळच राहत असेल, तर मग ,तुम्हाला भेटण्यासाठी तो वारंवार येऊ शकतो .

घाबरू नका आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत , जेणेकरून आपण घरमालकाच्या अचानक भेटीला आणि घराच्या तपासणीला व्यवस्थित तोंड देऊ शकाल.

 

घर मालकाशी चांगले संबंध राखा

become friends

जर, तुमची आणि घर मालकाची ,भेटीदरम्यान बऱ्याच गोष्टींवरती नजरानजर होत नसेल ,तर मग तुमच्यात काहीतरी बिनसण्याची शक्यता जास्त आहे .काही बाबतीत असंही होतं ,तुम्ही घर कितीही स्वच्छ आणि सुंदर ठेवले, तरीही घर मालक ,त्यात काही ना काही दोष काढणारच .त्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे, की तुम्ही घरमालकाबरोबर चांगले हितसंबंध ठेवा. जरी तुमच्या दोघांमध्ये काही साम्य नसेल ,तरीही. जर तुम्ही त्यांचं मन  जिंकलं ,तर मग ,निम्मे युद्ध तुम्ही इथेच जिंकता. जर तुम्ही त्यांना आवडत असाल, तर घरातील किरकोळ नुकसान झालेल्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत ,आणि स्वतःहून दुरुस्त करून देतील.

READ  फ्लॅटपेक्षा डुप्लेक्स घर का निवडावे?

 

पाळीव प्राणी ठेवणेबाबत

good pet

बऱ्याच घरमालकांना आपल्या भाडेकरूंनी ,पाळीव प्राणी ठेवलेले पसंत नसते .त्यांना वाटत असते  की, हे पाळीव प्राणी त्यांच्या घराचं नुकसान करू शकतात ,पण हे खरं नाही .जर तुमच्याकडे चांगला प्रशिक्षित असा कुत्रा,मांजर किंवा पक्षी असेल, तर मग घरमालकाला तक्रार करण्यासाठी काही जागा राहत नाही. आपल्या पाळीव प्राण्यांना त्यांचे काम करण्यासाठी कचरा पेटी किंवा शौचालय वापरण्यासाठी प्रशिक्षित करा, एकदाका त्यांना सवय झाली ,कि मग ते त्यांचं काम तिथेच व्यवस्थित करतील. जेव्हा घरमालक, घर तपासणीसाठी येईल, तेव्हा तुम्हाला फक्त इतकच करायचं कि ,ती संबंधित कचरापेटी लपवून ठेवायची, किंवा स्नानगृह, बाल्कनी यांना कुलूप लावून बंद ठेवायचं ,म्हणजे आपलं घर स्वच्छ दिसेल आणि खराब वासही येणार नाही.

 

योग्य गोष्टी सांगा

dirty mess

कधीकधी, आपण कितीहि कठोर परिश्रम घेतले ,तरी आपले घर प्रचंड विस्कटलेले दिसते .हे कदाचित अति कामाच्या व्यापामुळे किंवा घरात पार्टी केल्यामुळे होऊ शकते. पण ,हे पार्टीमुळे झालं ,असं कधीही सांगू नका.

तुम्ही पार्टी करता किंवा तुम्ही आळशी असल्याची वस्तुस्थिती जाणण्याअगोदर ,घर मालक हे हलक्याने घेऊ शकतो की अति कामामुळे किंवा कुटुंबाशी संबंधित आपत्कालीन स्थितीमुळे तुम्हाला घराची आवराआवर करता आली नसेल .घरमालकाला काय सांगायचे असेल ते आधी ठरवून घ्या आणि प्रामाणिकपणे सांगा ,की हे तात्पुरते स्वरूपाचे आहे. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही घर स्वच्छ ठेवण्याचा दिलेला शब्द पाळला पाहिजे .जर घरमालकाला वाटले की तुम्ही तुमचा शब्द पाळताना दिसत नाहीत ,तर मग तो तुम्हाला ,घर सोडून जाण्यास सांगू शकतो.

READ  भारतातील पूर्व-मंजूर गृहकर्ज समजून घेणे

 

तुमचे हक्क जाणा

reading doc

तुम्ही भाडेकरार केलेला कागद, हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे .जर करारानुसार, तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात ,आणि घरमालक त्याला विरोध करत असेल, तर तुम्ही भाडे करार केलेला कागद दाखवू शकता. याच प्रकारे पाळीव प्राणी पाण्याबाबतही तुम्ही हे वापरू शकता.पण जर हेच तुम्ही करारानुसार वागत नसाल ,तर तुमच्यावर उलटू शकतं .आणि जर तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये राहत असाल, तर मग त्यांच्या नियम आणि अटींची माहिती ठेवा, जर त्यांनी तुमच्या विषयी तक्रार केली, तर मग घरमालकाला तुमच्या विरुद्ध

कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही.

जर तुम्हाला माहीत असेल की ,सोसायटीमधील करारानुसार तुम्ही सर्व नियमांचे पालन व्यवस्थित करत आहात ,तर मग तुम्हाला घाबरण्याचे काहीएक कारण नाही.

 

व्यवस्थित राहून आणि वागूनही जर घरमालक तुम्हाला त्रास देत असेल ,तर मग तुम्ही घर सोडण्याची वेळ आलेली आहे .

नोब्रोकर.कॉम वरती घर शोधा आणि ब्रोकरेज साठीचे पैसे वाचवा,शिवाय तुम्हाला आनंदी ठेवणारे घर सहजपणे उपलब्ध होईल ते वेगळेच.

Found Interesting Please Share