जर तुम्ही आपले घर भाड्याने देऊ इच्छित असाल,किंवा विकण्याचा विचार असेल,तर तुम्हाला बाजारामध्ये चांगल्यात चांगली किंमत हवी असते.

बऱ्याच वेळेस तुम्ही बघाल की,भरपूर लोक तुमच्याशी वाटाघाटी करतील आणि घराच्या किमतीत सूट किंवा, मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत मागतील.

 

खालील काही टीप्स तुम्हाला तुमचं घर विकण्या किंवा भाड्याने देण्या अगोदर, किंमत वाढविण्याकरता मदत करतील.

 

 

  • लँड्स्केपींग मध्ये गुंतवणूक करा

 

तुमच्या घराजवळ मोकळी जागा असेल, किंवा गार्डन असेल तर त्या जागेला दुर्लक्षित करू नका.त्या ठिकाणी वाढलेले गवत, कचरा ह्यामुळे परिसर चांगला दिसत नसेल,तर घर विकत घेणारे किंवा भाड्याने राहायला येणारे ह्यावरून तुमच्या घराची देखभाल करण्याच्या क्षमतेबाबत शंका उपस्थित करू शकतात.

चांगल्या आणि सुस्थितीत असलेल्या घराच्या परिसरामुळे, आपल्याला घराचा जास्त मोबदला मिळण्यास मदत नक्कीच होते .तसेच बाहेरून घराचं दिसणंहि उंचावतं.

 

 

  • घर आतून अन बाहेरून स्वच्छ करा

 

संभावित घर खरेदी करणारे किंवा भाड्याने घेणारे लोक अशा घरांकडे जास्त वळतात, जिथे भरपूर जागा आणि प्रकाश असतो.त्यामुले जर तुमचं घर अनावश्यक  सामानाने,अती फर्निचरने,घाण व धुळीने माखलेले असेल, तर तुम्हाला अपेक्षित असलेल्या किमतीला फटका बसू शकतो .आपल्या घराला कायम स्वच्छ ठेवत राहा,आणि तुम्ही वापरत नसलेल्या सामानाला काढून टाका. मळकट आणि अस्वच्छ अशा घरापेक्षा एक स्वच्छ अन स्वागतार्ह घर जास्त लक्ष वेधून घेतं.

 

 

  • स्वयंपाकघर अद्यावत करा

 

स्वयंपाकघराला, घराचं हृदय समजलं जातं .ती एक अशी जागा आहे जिथे सर्व कुटुंब बसतं, आणि आपला जास्तीत जास्त वेळ घालवतं.त्यामुळे स्वयपाक घरातील खराब झालेले भांडे,लाकडी सामान,कप्पे,टाईल्स ई. बघून समोरच्याचं स्वारस्य संपून जातं. पण जर तुम्ही ह्याउलट, स्वयंपाक घराचं टापटीप असं सुशोभीकरण केलंत,तर हा तुमचा,घराची किंमत वाढवून मिळण्यास फायदेशीर असा मुद्दा ठरणार, हे लक्षात असुद्या.

 

 

  • स्नानगृहाचं नूतनीकरण करा

 

अस्वच्छ आणि मैले असे स्नानगृह, जिथे भरपूर पाण्याचे काळे डाग/क्षार,मोल्ड किंवा गवत आहे ,ह्यांना मोठ्या प्रमाणात नाही म्हटलं जातं.स्नानगृह हे जास्तीत जास्त दुर्दशा/झीज व तूट होणारे ठिकाण आहे,कारण स्वयंपाक घरासारखा ह्याचाही जास्त उपयोग केला जातो.

जर तुम्ही टाईल्स आणि नळ वगैरे नवीन बसवलेत,मोल्ड आणि गवत स्वच्छ करून रंग रंगोटी करून घेतलित,तर मग ह्याचा तुम्हाला 100 टक्के परतावा मिळणार, हे नक्की.

 

 

  • प्रकाशयोजना

 

तुमचं घर किती जुनं आहे? जर ते 10-15 वर्षे जुनं असेल, तर मग तुम्हाला वायरिंग व प्रकाशयोजना बदलाविशी जरूर वाटेल.

गरज असेल तसं तुम्ही प्रखर किंवा मंद अशी प्रकाशयोजना करू शकता.जुन्या पुराण्या ट्यूब लाईट्स, नवीन अशा दिव्यांनी बदलाव्यात. झुंबर व मॉडर्न दिव्यांची निवड करावी,जेणेकरून घर उठून दिसेल आणि जास्त राहण्यायोग्य वाटेल.

 

हे काही उपाय आहेत ज्याचा उपयोग तुम्ही करू शकता आणि आपल्याला इच्छीत असलेली घराची किंमत मिळवू शकता.पण हे सर्व उपाय घराला रंग दिल्यानंतर आणि किरकोळ डागडुजी केल्यानंतरच वापरावेत,अर्थात तुमचं घर बाजारात विकण्या किंवा भाड्याने देण्या अगोदरच.