Loved what you read? Share it with others!
2025 मध्ये जगातील पहिले 7 सर्वात महाग घरे
2.अँटिलिया - 1 अब्ज डॉलर्स
मुंबईतील अँटिलीया हे जगातील दुसर्या क्रमांकाचे सर्वात माहागडे घर आहे. हे घर मुकेश अंबानी,जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत,त्यांच्यासाठी तयार केले गेले होते. मुकेश अंबानी हे फॉर्च्यून ग्लोबल 500 कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. हे घर,शिकागो आधारित ‘पर्किन्स अँड विल’ नावाच्या आर्किटेक्चर फर्म आणि हॉस्पिटॅलिटी डिझाईन फर्म, ‘हर्श बेंडर असोसिएट्स’ यांनी बनवले आणि डिझाइन केले आहे.400000 चौरस फूट क्षेत्र असलेले हे घर,मुंबईच्या कुंबल्ला हिल शेजारमध्ये असून, 27 मजले उंच आहे. ही इमारत भूकंप प्रतिरोधक आहे,जी रिश्टर स्केलवरील 8 तीव्रतेच्या भूकंपाचा प्रतिकार करू शकते. अँटिलियाचे सहा मजले हे मालक आणि अतिथी ह्यांच्या कार पार्किंगसाठी समर्पित आहेत. यामध्ये हेल्थ स्पा, एक आईस्क्रीम रूम, एक मंदिर, 50-आसनी चित्रपटगृह, एक सलून, तीन हेलिपॅड आणि एक बॉलरूम आहे. भव्य अशा या हवेलीमध्ये 600+ हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
अज्ञात वस्तुस्थिती: उष्णतेचा सामना करण्यासाठी इमारतीत बर्फ़ाची खोली आहे.
3.व्हिला लिओपोल्डा - 750 दशलक्ष डॉलर्स
व्हिला लिओपोल्डा हे जगातील तिसरे सर्वात महागडे घर आहे. व्हिला हा कोटे डेझूर प्रदेशाच्या फ्रान्सिस आल्प्स-मेरीटाइम विभागात आहे. हा व्हिला एका विधवेच्या मालकीचा आहे, लेबनिस ब्राझिलियन बँकर, एडमंड सफ्रा यांची पत्नी लिली सफ्रा. हे नाव बेल्जियमचा असलेला ह्या व्हिलाचा मूळ मालक, किंग लिओपोल्ड द्वितीय पासून पडलं गेलय, आणि 1920 च्या दशकात अमेरिकन आर्किटेक्ट ओगडेन कोडमन ज्युनियर यांनी ह्याला पुन्हा डिझाइन केले. व्हिला जवळजवळ 50 एकरात पसरलेला आहे,ह्यामध्ये 11 बेडरूम, 14 बाथरूम, हेलीपॅड, व्यावसायिक ग्रीनहाऊस, मैदानी स्वयंपाकघर आणि 12 जलतरण तलाव आहेत.अल्फ्रेड हिचकॉकचा 1955 चा 'टू कॅच अ थिफ' हा चित्रपट, व्हिला लिओपोल्डा येथे चित्रित झाला होता, ज्यामुले तो एक लोकप्रिय व्हिला बनला.
4.व्हिला लेस कॅड्रेस - 450 दशलक्ष डॉलर्स
फ्रान्समधील सेंट-जीन-कॅप-फेराटमध्ये, व्हिला लेस कॅड्रेस,हे जगातील चौथे सर्वात महागडे घर आहे. हे 1830 मध्ये बांधले गेले होते. हे बेल्जियमच्या राजा लिओपोल्ड II यांनी 1904 मध्ये विकत घेतले होते. सुमारे 35 एकर बागांमध्ये हा व्हिला स्थापन करण्यात आला आहे. हा सुमारे 18000 चौरस फूट आहे आणि त्यात 14 बेडरूम, एक ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव आणि 30 घोड्यांना सामावून घेता येईल असा एक मोठा तबेला आहे. व्हिलाच्या आतील बाजूस क्रिस्टल झूमर,19 व्या शतकातील ऑईल पेंटिंग्ज आणि सुमारे 3000 पुस्तके असलेलं ग्रंथालय आहे.
5.लेस पॅलाइस बुल्स - 390 दशलक्ष डॉलर्स
"बबल पॅलेस" म्हणून ओळखले जाणारे, लेस पॅलाइस बुल्स,हंगेरीयन आर्किटेक्ट, अँटी लोवाग यांनी डिझाइन केले होते आणि हे 1975-1989 च्या सुमारास बांधले गेले होते. त्याचे टोपणनाव, हे मेडिटरेनिअण समुद्राच्या बाहेर गोलाकार दिसणार्या खोल्यांच्या मालिकेपासून पडले. सध्या, बबल पॅलेसची मालकी इटालियन वंशाच्या फ्रेंच फॅशन डिझायनर, पियरे कार्डिन यांच्याकडे आहे. या मालमत्तेत 3 जलतरण तलाव, अनेक गार्डन्स आणि डोंगराच्या भागात 500 आसनींचे अॅम्फीथिएटर आहे. हे ठिकाण विशेषतः पियरेसाठी सुट्टीचे घर आहे, त्याशिवाय पार्टी आणि कार्यक्रमांसाठी एक भव्य ठिकाण आहे. हे जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे.
6.ओडियन टॉवर पेंटहाउस - 330 दशलक्ष
डॉलर्स
330 दशलक्ष डॉलर्स इतके मूल्यांकित असलेले ओडियन टॉवर पेंटहाउस,जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. हे आर्किटेक्ट अलेक्झांड्रे गिराल्डी यांनी डिझाइन केले आणि ग्रुप मझोकोको यांनी बनवले होते. हे अनेक मजल्यांमध्ये विखुरलेले आहे आणि त्यात स्वतःची खासगी लिफ्ट आहे. पेंटहाउसमध्ये रूफटॉप डेक आणि त्याच्या खाजगी वॉटर स्लाइडसह तलाव समाविष्ट आहे,जो एक मजला सरळ तलावात सोडते.
7.फोर फेअरफील्ड पॉन्ड - 248 दशलक्ष डॉलर्स2
फोर फेअरफील्ड पॉन्ड, हे रेनो ग्रुपचे मालक इरा रेनरचे निवासस्थान आहे. ही इन्व्हेस्टमेंट आणि उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकदारांची होल्डिंग कंपनी आहे. ह्या 63 एकर घरात, 29 बेडरूम, 39 बाथरूम, 91 फूट जेवणाचे खोली, बास्केटबॉल कोर्ट, स्क्वॅश कोर्ट, टेनिस कोर्ट, बॉलिंग ऍली आणि 3 जलतरण तलाव आहेत.ही हवेली नियंत्रित करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता आहे. त्या जागेची स्वतःची उर्जा तयार करणारी योजना आहे,जी त्यांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्याच जागेत आहे. ज्या लोकांना त्यांच्या कार आवडतात त्यांना, फोर फेअरफील्ड पॉन्डमध्ये एक गॅरेज आहे जे जवळपास शंभर कार हाताळू शकते!
अज्ञात वस्तुस्थिती: हवेलीचे स्वतःचे 164-आसनी थिएटर आहे.
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19614+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
16005+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10411+ views
भारतीय घरांसाठी 15 आकर्षक बाह्य रंग संयोजने
January 31, 2025
7442+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7187+ views
Loved what you read? Share it with others!
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!