Table of Contents
Loved what you read? Share it with others!
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
Table of Contents
पुदीना पाने
भारतात पुदिना वाढविणे सोपे आहे, ही एक कठोर स्वरूपाची वनस्पती आहे आणि तिच्याकडे फारच कमी लक्ष देणे आवश्यक आहे.पुदिना,अन्न आणि पेय पदार्थांमध्ये उत्तमरीत्या वापरली जातेच परंतु त्याचबरोबर किडे, विशेषत: मुंग्या दूर ठेवण्यासही हे उत्तम आहे.आपण काही पुदीना पानांचा चुरा करू शकता आणि जिथे समस्या आहे अशा ठिकाणी टाकू शकता.आपण पुदीनाचे रोप असलेले कुंड्या देखील घेऊ शकता आणि मुंग्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांना खिडक्यांजवळ आणि आपल्या दाराजवळ ठेवू शकता.आपण पुदीनाची पाने अगदी चिरडून एका पुडीमध्ये टाकू शकता आणि पतंगे दूर ठेवण्यासाठी आपल्या खोलीतही ठेवू शकता.आपण इच्छित असल्यास, समान परिणाम मिळविण्यासाठी आपण आपल्या कपाटात पुदीनाच्या तेलाने भिजवलेल्या सूती बोळ्याचा वापर करू शकता.
लेमनग्रास किंवा सिट्रोनेला
जरी ही दोन झाडे एकसारखी दिसत असली तरी ती एकसारखी नाहीत; त्यांच्यात जे साम्य आहे ते म्हणजे किटक दूर ठेवण्याची त्यांची क्षमता.हे दोन्ही गवतासारखे दिसणारे वनस्पती आहेत आणि त्यांचा उग्र सुगंध असल्यामुळे किडे त्यांचा द्वेष करताना दिसतात.ही गवते वाढविणे सोपे आहे, परंतु आपल्याला सिट्रोनेला किंवा लेमनग्रासपासून तयार केलेली बरीच उत्पादने बाजारात मिळू शकतील,त्यामुळे घरी त्यांचं उत्पादन घेण्याची गरज नाही.
आपण पाण्यात ह्या तेलाचे काही थेंब मिश्रण करू शकता आणि हे आपल्या त्वचेवर,कीटक दूर ठेवण्यासाठी वापरू शकता.डासांना दूर ठेवण्यासाठी आपण सिट्रोनेला अगरबत्ती किंवा सिट्रोनेला मेणबत्त्या घरात पेटवू शकता.तसेच मुंग्या आणि इतर कीटक दूर ठेवण्यासाठी आपण त्यांचा उपयोग फरची पुसण्याच्या क्लीनरमध्ये देखील करू शकता.
कांदे
कांद्यामधील तीव्र वास आणि गंधकयुक्त सामग्री कीटकांच प्रमाण कमी ठेवण्यासाठी चमत्कार करतात.आपण कांद्याचे तुकडे करू शकता, त्यांना एका भांड्यामधे पाण्यात ठेवू शकता आणि त्यामुळे जवळील किडे पळताना पाहू शकता.
कांदे हे घरातील पालींनाही दूर ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. फक्त कांद्याचे काही तुकडे करा आणि ते आपल्या घरी सामान्यत: जेथे पाल लपतात त्या ठिकाणी ठेवा, आपल्याला आपल्या घरातील पाली नाहीशा झालेल्या मिळतील.
लॅव्हेंडर
वरीलपैकी कोणताही तीव्र सुगंध आपल्याला आपल्या घरात नको असेल,तर मग कीटकांना बाहेर ठेवण्यासाठी काही लॅव्हेंडर वापरुन पहा.आपले कपाटातील सामान सुगंधित व ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि कपड्यांपासून पतंगे दूर ठेवण्यासाठी लॅव्हेंडर हे अतिशय चांगले आहे.आपण पुदीनाची पाने जशी वापरु शकता त्याच प्रकारे आपण लॅव्हेंडरही वापरू शकता.आपण पुड्यांमध्ये,वाळलेल्या आणि चिरडलेल्या लॅव्हेंडरचा वापर करू शकता किंवा लॅव्हेंडर तेलामध्ये सूती बोळा भिजवू शकता, तेही सारखेच कार्य करेल.
आपल्याला अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास, नोब्रोकरकडील क्लीनरला कॉल करून बोलवू शकता, ते आपले घर स्वच्छ आणि कीटक मुक्त करून देतील.
जर आपल्याला असे वाटत असेल की आपणास अस्वच्छ आणि कीटकांनी ग्रस्त अशा जागेपासून दूर जाणे आवश्यक आहे, तर मग नोब्रोकेर आपल्याला राहण्यासाठी असे घर सापडून देईल जे स्वच्छ आणि किटकमुक्त असेल.
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19524+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
15996+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10407+ views
भारतीय घरांसाठी 15 आकर्षक बाह्य रंग संयोजने
January 31, 2025
7354+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7176+ views
Loved what you read? Share it with others!
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!