नाताळ/ख्रिसमस पार्टीला खेळांसाठीच्या काही आयडिया
नाताळ/ख्रिसमस, हा वर्षाचा असा सण आहे जेव्हा मित्र ,कुटुंब मैल मैल प्रवास करतात,आपल्या प्रिय व्यक्तींबरोबर वेळ घालवण्यासाठी. त्यांचा हा सुट्ट्यांचा सीजन,मजेशीर आणि अविस्मरणीय करण्याकरता का नाही काही त्यांना मनोरंजक खेळांची पर्वणी द्यावी, जेणेकरून त्यांच्या ती आयुष्यभरासाठी लक्ष्यात राहील.
नाताळच्या सिझनला आनंदमयी करण्यासाठी खाली काही साध्या आयडिया दिलेल्या आहेत.
1 ) ‘टू ट्रुथस अँड अ लाय’ नाताळ/ख्रिसमस आवृत्ती
हा एक मजेशीर खेळ आहे,जिथे एक व्यक्ती स्वतःबद्दलच्या तीन गोष्टी आपल्याशी शेअर करतो, ज्या मधील दोन गोष्टी ह्या खऱ्या असतात आणि एक खोटी, हे आपल्यावर आणि पाहुण्यांवर अवलंबून असतं ,कोणती गोष्ट कोणती आहे हे ओळखायचे .म्हणजे, खरी कोणती आणि खोटी कोणती.इथे हा ट्विस्ट आहे की, शेअर केलेल्या गोष्टी या सुट्ट्यांच्या सीझनमधल्याच पाहिजे .तुम्ही त्यात ख्रिसमसच्या वेळेस घडलेल्या मजेशीर गोष्टी, ख्रिसमसला मिळालेल्या सर्वात वाईट भेटवस्तू, विशेष काही आठवणी ई. असे राउंड्स घेऊ शकता. हा खेळ,इतर लोकांना ओळखण्याचा,जाणून घेण्याचा चांगला मार्ग आहे आणि ह्या खेळामुळे ते आपल्याला कितपत ओळखतात हेही कळत.
2 ) ‘गेस द कॅरॉल’
Picture Courtesy- swncdn
कोणत्याही वयोगटातील मुलांना खेळण्यासाठी हा एक चांगला खेळ आहे.यामध्ये तुम्हाला पाहुण्यांच्या टीम करायच्या आहेत, आणि कुठली कॅरोल आहे हे ओळखायचं .त्यासाठी तुम्ही ख्रिसमसचे कॅरोल वाजवू शकता किंवा त्या गाण्यांमधील काही ओळी कागदावर लिहून दाखवू शकता. बरोबर उत्तर देण्यासाठी एका टीम मधील लोक विचार विनिमय करून उत्तर ठरवू शकतात.
हा कधीहि खेळता येण्यासारखा खेळ आहे आणि याला जास्त तयारीही लागत नाही.
3 ) ‘स्पून अँड ओर्नामेंट’ शर्यतPicture Courtesy - thespruce
जर तुमच्याकडे थोडी जागा असेल, तर मग तिथे काही अडथळ्यांची वाट करा,एकदम अगदी लिंबू चमचा या खेळासारखं. एक आभूषण चमचा मध्ये ठेवायचं,एक व्यक्ती हा चमचा तोंडामध्ये पकडून त्या अडथळ्यांच्या वाटेतून मार्ग काढत काढत पुढे जाईल, चमचा मधील आभूषण खाली न पाडता. जर ते चमचामधून खाली पडलं ,तर पुन्हा पहिल्यापासून सुरु करायचं .हा खेळ अजुन आव्हानात्मक करायचा असेल तर,तुम्ही तो टीम करून खेळू शकता किंवा रिले करून.
4 ) ‘ओळखा पाहू’ खेळ
जेव्हा पाहुणे निवांत बसलेली असतील तेव्हा त्यांच्याकडे छोटे कागद सरकवा,आणि ख्रिसमस च्या झाडावरती कोण कोणती आणि किती आभूषणे लावलेली आहेत, याचा अंदाज करायला सांगा .जो व्यक्ती बरोबर आकडा सांगेल किंवा असलेल्या आभूषणांच्या आकड्या जवळ येईल, तो या खेळाचा विजेता ठरेल. हा खेळ खेळण्याचा दुसरा एक मार्ग आहे,तो म्हणजे ख्रिसमस थीम शी संबंधित खाद्यपदार्थ, आभूषणे इ. त्यांच्या समोर ठेवून, नंतर त्यांना किती आठवतात हे त्यांना लिहून देण्यास सांगणे,तेही एका मिनिटाच्या आत.
5 ) ‘पिन द नोस ऑफ रेनडीअर’Picture Courtesy - christmastwist
हा आणखी एक मजेशीर असा खेळ आहे,जो घरातील मोठे आणि मुले दोघेही खेळू शकतात. गाढवाला शेपुट लावणे,हा अगदी तसाच खेळ आहे. यामध्ये तुम्हाला, डोळ्याला बांधण्यासाठी पट्टी आणि कागदाचा कापलेलं एक नाक बनवावं लागेल. हे नाक, खेळणाऱ्याने ,डोळे बंद करून, भिंतीवरील रेनडियर ला चिकटवायचं आहे ,डिंकाच्या किंवा पिनच्या मदतीने.जो हे अचूकपणे करील तो या खेळाचा विजेता होईल.
6 ) ‘गिफ्ट रॅपिंग’ शर्यत
हा एक साधा आणि सोपा खेळ आहे ,ज्यामध्ये आपल्याला भेटवस्तूंचे रिकामे खोके ,कात्री ,चिकट टेप, सजवण्यासाठीचा कागद,किंवा वृत्तपत्रे इ. सामान लागेल. पाहुण्यांना ठराविक जागा दिली जाईल,तिथे त्यांनी हे मोकळे खोके,भेटवस्तूंच्या सजवण्यासाठीच्या कागदांनी सजवायचे आहेत.जे लोक चांगले आणि लवकर हे रिकामे खोके सजवतील,ते हा खेळ जिंकतिल.
हा खेळ अजुन किचकट करण्यासाठी तुम्ही चित्रविचित्र आकाराच्या वस्तू वापरू शकता,आणि हे सजवण्यासाठी लागणारी खेळणाऱ्याची कला आणि मज्जा दोन्हीही पाहू शकता.
7 ) भेटवस्तू शोधणेPicture Courtesy - mycrazygoodlife
हा खेळ 2 प्रकारे खेळता येतो,एकतर प्रत्येक पाहुन्याला त्याची भेटवस्तू शोधावी लागते,तुम्ही त्यांना दिलेल्या काही क्लूच्या मदतीने, किंवा तुम्ही तुमच्या पाहुण्यांना टीममध्ये वाटून भेटवस्तू शोधण्याचा कामाला लावू शकता.ह्यामध्ये सगळ्यांना मजा येते,आणि तुम्हाला निवांत बसून मजा बघायला मिळते.जरका लहान मुले हा खेळ खेळत असतील तर क्लू थोडे सोपे द्या आणि त्यांना घरातच किंवा गार्डन मध्ये भेटवस्तू शोधायला लावा.मोठ्या माणसांकरिता तुम्ही हा खेळ अवघड करू शकता आणि क्लू शहरामध्ये कुठेही देऊन, लपवून ठेवलेली भेटवस्तू शोधण्यासाठी एक दिवसापर्यंत गाडीने फिरून योग्य क्लू शोधन्यास लावू शकता.
आम्ही आशा करतो कि हे काही खेळ तुमचा नाताळ/ख्रिसमस आनंदी करू शकतात.तुम्ही हेही तपासून बघु शकता कि काही स्वतः करण्यासारखे नाताळ/ख्रिसमस च्या सजावटीच्या काही आयडिया वर तूम्हाला काही काम करता येऊ शकतं का.
NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage.
Following are service along with Rent / Sell / Buy of Properties
- Rental Agreement
- Packers And Movers
- Click And Earn
- Life Score
- Rent Receipts
- NoBroker for NRIs
Join the conversation!