ज्या पद्धतीने आणि वेगाने भारतातील  शहरे विकसित होत आहेत,त्या अनुषंगाने आपला भाडेकरु कोण असेल हे आपल्याला सांगता येत नाही. तो आपल्या शहरातील किंवा आपल्या राज्यातील असू शकतो, दुसऱ्या राज्यातील असू शकतो किंवा दुसऱ्या देशातीलही असू शकतो. जरका आपला भाडेकरु आपल्या विश्वसनीय मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून आलेला नसेल तर तुम्ही त्याच्यावर नक्की विश्वास ठेवू शकत नाही आणि तो विश्वास तुम्ही अजिबात ठेवू नका. इथे हेही लक्षात घ्यायला हवं की तुमच्या भाडेकरूचे व्हेरिफिकेशन न केल्याबद्दल तुम्ही जबाबदार धरले जाल, विशेषत: जेव्हा ते एखाद्या गुन्ह्यात सहभागी असतील तर. म्हणून,आपल्या भाडेकरूचं व्हेरिफिकेशन करून घेणं हे कधीही चांगल,आणि तेही भाडेकरार करण्याअगोदर करून घ्या.

 

खालील काही मार्गाने आपण आपल्या भाडेकरूचे व्हेरिफिकेशन करू शकता.

 

1 ) पोलीस व्हेरिफिकेशन

बंगलोर सारख्या मेट्रो शहरांमध्ये नागरिक, पोलीस व्हेरिफिकेशनची सुविधा मिळवू शकतात. त्यासाठी एक फॉर्म भरून देणे आणि ठराविक फी भरणे गरजेचे आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही त्या शहराचे नागरिक असणे आवश्यक आहे.आणि ज्याचा पत्ता तपासायचा आहे तोही बंगलोर मधलाच असायला पाहिजे.जर तो बाहेर देशाचा रहिवासी असेल तर तुम्ही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळवू शकता. भारतीय नागरिकांसाठीही पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळते .

 

2 ) बाहेरील एजन्सिज

अशा काही कंपन्या आहेत ज्या  भाडेकरुंच्या पार्श्वभूमीची तपास करून माहिती पुरवतात. त्यांच्याकडे एक पडताळणी यादी असते, ज्याच्या नुसार भाडेकरूंच्या आधीच्या घर मालकांकडे,शेजार्‍यांकडे,ते काम करत असलेल्या ठिकाणी चौकशी करून,ते माहिती गोळा करतात.एकदा त्यांची पडताळणी यादी पूर्ण झाली कि लगेच त्याचा एक रिपोर्ट बनवून तुम्हाला ते देतात. ह्या कंपन्या मूलभूत माहिती,जसे की,गुन्हेगारी पार्श्वभूमी, पत्त्याची तपासणी, ओळख पटवणे,इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.तुमच्या मागणीनुसार,संदर्भ तपासणी, बँक क्रेडिट तपासणीही ते करून  देऊ शकतात.

 

3 ) सेल्फ व्हेरिफिकेशन

तुम्ही स्वतः पण तुमच्या संभाव्य भाडेकरुची छोटीशी तपासणी करू शकता. त्यासाठी थोडा वेळ लागेल, पण जास्त त्रास नाही होणार. भाडे करार करताना तुम्हाला भाडेकरुच्या सरकारी ओळखपत्राची गरज भासेल,ह्या प्राथमिक महितिचा उपयोग तुम्ही तुमच्या भाडेकरुची उलट तपासणी करण्यासाठी करा.तुम्ही तुमच्या भाडेकरूला,शहरातील एखाद्या व्यक्तीचा संदर्भ देण्यासाठी सांगू शकता किंवा  जर तो शहरात नवीन असेल तर त्याच्या स्वतःच्या शहरातील व्यक्तीचा संदर्भ देऊ शकतो.तुम्ही, तो काम करत असलेल्या ठिकाणी चौकशी करू शकता किंवा तो जर एखाद्या प्रतिष्ठित, मल्टिनॅशनल कंपनीत काम करत असेल तर तेथील HR मॅनेजरने त्याच्या पार्श्वभूमीची तपासणी नक्कीच केलेली असेल.

 

आपल्या भाडेकरूच्या आधीच्या घर मालकाबरोबर बोलून घेणे ही एक चांगली कल्पना आहे . त्यामुळे,आपला  भाडेकरू कसा असेल याचं चित्र आपल्याला स्पष्ट होईल. बँक क्रेडिट

तपासणी,गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी आपण स्वतःहून करणे जरा अवघड आहे .

 

4) नोब्रोकर व्हेरिफिकेशन

नोब्रोकर च्या सहाय्याने भाडेकरू शोधणे खूप जलद आणि सोयीस्कर झालेले आहे .त्यामुळेच, भाडेकरुचं व्हेरिफिकेशन करनंही नोब्रोकेरने सोपं करून ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही आमच्या बरोबर भाडेकरार कराल, तेव्हा तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनचा पर्याय उपलब्द असेल. जर तुम्ही आमच्या व्यतिरिक्त भाडेकरार करत असाल, तर मग तुम्ही ते करण्यासाठीची वेगळी मागणी करू शकता. त्यासाठी, तुम्हाला फक्त एवढंच करायचं कि,आम्हाला  संदेश पाठवायचा आणि मग आमच्या टीमचा एक प्रतिनिधि तुम्हाला संपर्क करून तुमची गरज पूर्ण करेल.

 

लक्षात ठेवा 1/10 घरमालकाने भाडेकरूंसंदर्भातील घोटाळे अनुभवलेले आहेत. अशा प्रकारातील फसवणुकीची अंदाजे रक्कम ही ,15000 कोटींच्या घरात गेलेली आहे. ह्या तोट्यासाठीं, भाडे न भरणे, प्रॉपर्टीला हानी पोहोचवणे, कोर्टातील खटल्याची फीस हे घटक योगदान देतात. ह्या सगळ्या अडचणी टाळण्यासाठी आपल्या भाडेकरुचं व्हेरिफिकेशन लवकर करून घ्या.