काय तुम्हाला ‘हिवाळी सोलस्टीस’,हा शब्द ओळखीचा वाटतो, पण त्याचा अर्थ माहित नाही. तर मग घाबरू नका ,तुम्ही एकटे नाही आहात.ह्या अशा गोष्टी आहेत, ज्या आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत.पण, आपल्याला त्याबद्दल माहिती नाही म्हणजे असं नाही, की आपण त्याबद्दल काही जाणून घ्यायचे नाही. या विशेष दिनाबद्दल खाली  थोडक्यात काही माहिती दिलेली आहे.

 

हिवाळी सोलस्टीस म्हणजे काय?

winter-solstice

हिवाळी सोलस्टीस म्हणजे सर्वात लहान दिवस किंवा असा दिवस जेव्हा आपल्याला सूर्यप्रकाश एकदम कमी वेळ बघायला मिळतो .हे आपल्याला वर्षातून दोनदा बघायला मिळते,एकदा दक्षिण आणि एकदा उत्तरी गोलार्धामध्ये .ही खगोलीय घटना तेव्हा घडते  जेव्हा, पृथ्वीचा एक ध्रुव (उत्तर किंवा दक्षिण) सूर्यापासून जास्तीत जास्त तिरपा झालेला असतो.

 

हिवाळी सोलस्टीस कधी असते?

 

हिवाळी सोलस्टीस उत्तर गोलार्धामध्ये, 20 ते 23 डिसेंबर यादरम्यान कधीही घडून येऊ शकते .सामान्यतः 21 डिसेंबर ही मुख्य तारीख आहे .तारखेतील हा बदल घडण्याचे कारण म्हणजे ,सूर्याचा पृथ्वीशी संबंधित पुन्हा पहिल्या ठिकाणाकडे परत येण्याचा काळ वेगळा असतो, आणि हे आपल्या कॅलेंडरवर्षाच्या गणनेनुसार होत नाही.

READ  तुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स

 

काय हे एका ठराविक वेळेलाच घडते?

 

होय,हिवाळी सोलस्टीस हे ,21 डिसेंबरला,ठराविक वेळेलाच घडून येते .ही वेळ तेव्हा मोजली जाते, ज्या क्षणाला पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून सर्वात दूर आणि 23.5 अंशामध्ये तिरका झालेला असतो. भारतामध्ये हा क्षण 21 डिसेंबरच्या रात्री 9.58 ला पाहायला मिळेल.

 

या दिवशी घडलेल्या  महत्वपूर्ण घडामोडी

events on winter-solstice

  • 21 डिसेंबर, 1620 रोजी प्लायमाउथ येथे यात्रेकरूंचे आगमन झाले.

 

  • पियरी आणि मॅडम क्युरी यांनी रेडियमचा शोध लावला

 

  • अपोलो 8 हे अंतरीक्षयान प्रक्षेपित केले गेले, हे पहिले मानव चंद्र अभियान बनले.

 

  • जेम्स नाईस्मिथच्या नियमांनुसार,1891मध्ये पहिला बास्केटबॉल खेळ खेळला गेला.

 

  • 1937 साली ,‘स्नो व्हाईट अँड द सेव्हन डॉर्फस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला .हा वॉल्ट डिस्नीचा पहिला आणि पूर्ण लांबीचा पहिलाच अॅनिमेशनपट होता.

 

  • या काही सकारात्मक घटनांव्यतिरिक्त,मागील काही वर्षांमध्ये ह्या दिवशी बरेच भूकंप, त्सुनामी आणि नैसर्गिक आपत्या घडल्या

 

सोलस्टीस बद्दलच्या काही कथा

  • पूर्व इस्लामिक काळापासून चालत आलेल्या कथांनुसार,मिथरा,प्राचीन सूर्यदेव,ह्याचा जन्म या दिवशी झाला,तो अंधारावर विजय आहे.

 

  • ही सर्वात मोठी रात्र असल्याने, झोरास्ट्रिअनच्या म्हणण्यानुसार या रात्री दुष्ट आत्मा पृथ्वीवर भटकत असतात.असेही मानले जाते कि,हया रात्री अहिरीन शक्ती बलवान असते.रात्रीच्या दुष्ट शक्तींकडून होणारी कोणतीही हानी टाळण्यासाठी लोकांनी रात्रभर जागावे,खाणं-पिणं करावं, कविता आणि कथा सांगाव्यात,असा उल्लेख आहे.
READ  मुद्रांक शुल्कामध्ये कपात केल्यामुळे रिअल इस्टेटला चालना मिळेल: पीएमसी

 

  • सेल्टिक आणि जर्मनिक लोककथादेखील,या रात्री दुष्ट प्रवृत्ती आणि आत्मा बाहेर येत असल्याचे संबोधतात.

 

  • मेसोअमेरिकन लाँग काउंट कॅलेंडरमध्ये,21 डिसेंबर 2012 हि तारीख 13.0.0.0.0 ह्या तारखेशी जुळते.प्राचीन माया कॅलेंडरमध्ये दिल्यानुसार ह्या दिवसाला, चक्राचा शेवट म्हणून चिन्हांकित करण्यात आले आहे, त्यामुळे बरेच लोक घाबरले की,या तारखेला जगाचा अंत होईल.

 

जर तुम्हाला या संदर्भात किंवा अजून कुठल्या विषयावर काही माहिती हवी असेल तर खाली एक कॉमेंट लिहा आणि आमच्या ब्लॉगचे अनुसरन करा.

Found Interesting Please Share