Post Question
Home / Society Management / सोसायटी ना हरकत दाखला नमुना?
Q.

सोसायटी ना हरकत दाखला नमुना?

Comment

1
Answers

2 2023-04-27T15:17:42+00:00

बऱ्याच व्यवहारात ना हरकत प्रमाणपत्र अर्थात NOC ची गरज भासते; ते नसल्यास काम पुढे सरकत नाही. त्या-त्या कार्यक्षेत्रानुसार NOC चे विशिष्ट नमुने ठरवले गेले असतात. यामध्ये ग्रामपंचायत, वित्तीय, औद्योगिक, शैक्षणिक, गृह निर्माण संस्था आदींचा समावेश होतो. आता ‘सोसायटी ना हरकत दाखला नमुना’ कसा असतो, कोणत्या कारणांसाठी सभासद या दाखल्यासाठी अर्ज करू शकतो, याविषयी जाणून घेऊ.  

नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसेस् ला संपर्क करून कायद्याच्या कागदपत्रांविषयी रीतसर जाणून घ्या
  • सभासद विविध कारणांकरीता सोसायटीकडे NOC साठी अर्ज करू शकतो; जसे-

  1.  

    सोसायटीची मालमत्ता कोणत्या तरी कारणासाठी वापरायची असल्यास  

  2.  

    सभासदाला त्याची मालमत्ता व्यावसायिक कामासाठी वापरायची असल्यास

  3.  

    त्याची मालमत्ता विकायची, भाड्याने द्यायची किंवा गहाण ठेवायची असल्यास त्याला सोसायटीकडे एनओसीची मागणी करावी लागते.

  4.  

    सदनिकेच्या अंतर्गत दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी सभासदाने आधी सोसायटीला एनओसी अर्ज द्यावे लागते

  5.  

    शिवाय, सभासदाने सदनिका घेण्यासाठी वित्तीय संस्थेकडून लोन घेतले असल्यास, इत्यादी.

 

  •  

    सर्वांत आधी सभासदाने त्याला ज्या कारणासाठी सोसायटी ना हरकत दाखला लागणार आहे, त्याचा लेखी तपशील असलेला अर्ज सुपूर्त करावा. सोसायटीने अर्ज प्राप्त झाल्याची नोंद घेऊन मॅनेजमेंट मीटिंगमध्ये विनिमयानंतर NOC प्रमाणित करावा. 

  • जर काही कारणास्तव मीटिंग न झाल्यास अध्यक्ष व सेक्रेटरी यांच्या स्वाक्षरीने देण्यात यावा आणि पुढील बैठकीत याची परवानगी घ्यावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

  • सभासदाकडून सोसायटीला येणे बाकी असेल तर त्याने ती रक्कम भरून सर्व औपचारिक गोष्टींची पूर्तता जबाबदरीने पूर्ण केली पाहिजे जेणकरून सोसायटी NOC साठी हरकत घेणार नाही.

  •  

    जर अर्जंट असूनही तुमच्या अर्जाची दखल सोसायटीकडून घेतली जात नसेल तर तुम्ही निबंधकाकडे अर्ज देऊ शकता, संबंधित निबंधक सोसायटीला तुम्हांला NOC देण्याबाबतचे आदेश देतील.

  •  

    तुम्हांला विशिष्ट नमुन्यात सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र हवे असल्यास तुम्ही अर्ज करताना त्याचा उल्लेख करू शकता किंवा सोबत नमुना प्रत जोडू शकता. तसे नसल्यास, ‘सोसायटी ना  हरकत दाखला नमुना’ प्रमाणे तुम्हांला एनओसी मिळून जाईल.   

तर उपरोक्त माहितीवरून ‘society noc format in marathi’ यासंबंधीचे नियम तुमच्या लक्षात आले असतील. एनओसीसाठी अर्ज केल्यानंतर पोचपावती घेणेसुद्धा आवश्यक असते.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

कुलमुखत्यारपत्र म्हणजे काय ? ना हरकत प्रमाणपत्र अर्ज नमुना ईसार पावती म्हणजे काय ?  

Leave an answer

You must login or register to add a new answer .

Recently Published Questions

Most Viewed Questions

Flat 25% off on Home Painting
Flat 25% on Painting | Top Quality Paints | Professional Tools | Verified Partners
X
Home Cleaning Starting ₹359 Only
Revive Your Space with Expert Cleaning!
X
Enjoy hassle-free on time movement of your household goods.
X
Buy Your Dream Home with NoBroker.com & Enjoy Exclusive Benefits on Home Loan & Interior Services
X
Fastest Sanction in 7 Days from 15+ Banks | Max Funding | No Hidden Charges
X
Get upto ₹10 Lacs Instantly in your bank account | Instant Disbursal |
X