Post Question
Home / Legal / ईसार पावती म्हणजे काय?
Q.

ईसार पावती म्हणजे काय?

Comment

1Answers

0 2023-03-31T09:56:15+00:00

प्रॉपर्टीचा व्यवहार म्हणजे जरा क्लिष्टच असतो. कित्तीतरी औपचारिक बाबींची पूर्तता करावी लागते. एक जरी पायरी चुकली किंवा राहिली तर ते व्यवहार अधिकृतरित्या पूर्ण होत नाही. एकतर मालमत्ता व्यवहाराच्या गोष्टी महागड्या व सोबत वेळखाऊदेखील असतात असा परिस्थितीत काम चांगल्याप्रकारे फत्ते व्हावे असाच आपला मानस असतो. यांत कागदपत्रे-पावती यांनादेखील महत्व असणारच तर पाहूया ‘ईसार पावती म्हणजे काय’ या पावतीचे जागेच्या व्यवहारामध्ये काय महत्व आहे, ही पावती कधी काढली जाते.

तुमच्या मालमत्तेच्या संबंधित कायदेशीर व्यवहारासाठी नो ब्रोकर लीगल सर्विसेस् शी आजच कॉन्टॅक्ट करा

स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री लगेलग तडकाफडकी होत नाही, तसं होऊ पण नाही. समजा तुम्ही एखादी जागा घेण्याच्या विचारात आहात, तुम्ही त्याची जाहिरात वाचली किंवा कुणाकडून तर त्याबद्दल माहिती मिळाली. जागा पाहिल्यानंतर सर्व रीतीने ती जागा तुम्हांला व तुमच्या आप्तजनांना अनुरूप वाटली. जागेचे स्थान, दर, जमिनीचा पोत तसेच व्यावहारिक पारदर्शकता या सगळ्या अंगांनी ती जागा खरेदी करण्यासाठी पसंत पडली तर तुम्ही म्हणजे खरेदी करणारा व विक्रेता यांच्यामध्ये एक करार होतो, त्यांत दोन्ही पक्षांकडून होणाऱ्या व्यवहारासाठी संमती दर्शवली जाते. या प्रक्रियेत जागा खरेदी करणारा टोकन अमाऊंट विक्रेत्याला देऊ करतो, जेणेकरून विक्रेत्याने याच जमिनीचा दुसऱ्या कुणासोबत व्यवहार करू नये. हे टोकन अमाऊंट दिल्यावर जी पावती बनवली जाते, तिला ‘ईसार पावती’ असे म्हणतात. सामान्यत: हा टोकन अमाऊंट मूळ व्यवहार किमतीच्या एक-दोन टक्के इतके असते; काही व्यवहारांत कमी-जास्त असू शकते.   

ईसार पावतीला विसार पावती असेदेखील म्हटले जाते. हे इंग्लिशमध्ये ही प्रक्रिया अर्नेस्ट मनी डिपॉजिट (Earnest Money Deposit) या नावाने प्रचलित आहे. एखाद्या जागेच्या भविष्यात होणाऱ्या खरेदी-विक्री व्यवहारासाठी आताच्या घटकेला एक ठराविक रक्कम (टोकन अमाऊंट) दिल्यावर जो पुरावा प्राप्त होतो ती ईसार पावती असते. यामुळे संबंधित जागेचा विक्रेता मधल्या काळात इतर कुणाशी त्याच जागेचा व्यवहार करू शकत नाही.  

उपरोक्त साऱ्या माहितीद्वारे ईसार पावती म्हणजे काय, ती कशासाठी केली जाते, ही पावती किती महत्वाची असते, या सगळ्याची कल्पना तुम्हांला आली असावी.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

मुद्रांक शुल्क म्हणजे काय ? मालमत्ता कर म्हणजे काय ? उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज

Leave an answer

You must login or register to add a new answer .

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Flat 25% on Painting | Top Quality Paints | Professional Tools | Verified Partners
Home Cleaning Starting ₹359 Only
Revive Your Space with Expert Cleaning!
Enjoy hassle-free on time movement of your household goods.
Buy Your Dream Home with NoBroker.com & Enjoy Exclusive Benefits on Home Loan & Interior Services
Fastest Sanction in 7 Days from 15+ Banks | Max Funding | No Hidden Charges
Get upto ₹10 Lacs Instantly in your bank account | Instant Disbursal |