Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Home / Legal / Documentation / EWS Certificate कसे काढावे?
Q.

EWS Certificate कसे काढावे?

view 13718Views

1 Year

Comment

1 Answers

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
2 2023-06-20T14:12:10+00:00

समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन अर्थात EWS प्रमाणपत्राची तरतूद आहे. या प्रमाणपत्राद्वारे शिक्षण तसेच शासकीय नोकरीच्या ठिकाणी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या जागांचा लाभ मिळवता येतो. पण, त्याआधी हे प्रमाणपत्र      काढण्यासाठीच्या पात्रतेसंबंधी नियम व अटी काय-काय आहेत आणि ews certificate documents in marathi याची तुम्हांला पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. यानंतरच पात्र असल्यास तुम्ही या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट प्राप्तीकरिता अर्ज करू शकता.

 

घरासाठी कर्ज घेण्याच्या विचारात असाल तर नोब्रोकर प्रोफेशनल होमलोन एक्स्पर्ट्सशी संवाद साधा नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसच्या मदतीने तुमच्या घरासंबंधी कायदेशीर व्यवहाराची पूर्तता करा

ews certificate कसे काढावे ?

  • EWS अंतर्गत 10 टक्के आरक्षण ओपन कॅटेगरीतील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी आहे; या सेक्शनमध्ये मोडणाऱ्या घटकांना वय, फी यामध्ये सवलत तसेच आर्थिकदृष्ट्या वंचित गटासाठी शासकिय आखलेल्या योजनांचा लाभ घेता येतो. ज्यांना कायद्याने आधीपासूनच आरक्षण दिले गेले आहे ते याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

  • अर्जदाराचे अर्थात त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे, त्याचे निवासी घर 1000 चौरस फुटांपेक्षा कमी जागेत बांधलेले असावे त्याचप्रमाणे शेत-जमीन असल्यास ती 5 एकरांपेक्षा अधिक नसावी या अटींच्या चाकोरीत जर तो खुल्या प्रवर्गातील अर्जदार बसत असेल तर तो EWS सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पात्र आहे.

  • लाभार्थी व त्याचे कुटुंब 13 ऑक्टोबर 1967 पासून किंवा त्याआधीपासून महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. राज्यस्तरावर राज्य शासनाच्या तर केंद्रीय स्तरावर केंद्र शासनाद्वारे निर्धारित केलेल्या नियम-अटींनिशी ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट प्रमाणित केले जाते. याची वैधता 1 वर्षाची असते; आर्थिक एक वर्षाप्रमाणे म्हणजेच 31 मार्चपर्यंत होय. 

  •  

    वय/जन्म, रहिवासी व उत्पन्नाच्या पुराव्यानिशी सेतु कार्यालयातील तहसीदाराकडे तुम्हांला विहित अर्ज, स्वयं-घोषणपत्रासहित जमा करावे लागते. साधारण 30 दिवसांच्या आत तुम्हांला प्रमाणपत्र सुपूर्त होईल. तसेच,

    www.aaplesarkar.mahaonline.gov.in

    या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही ऑनलाइन अप्लाय करू शकता.

     

EWS प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे,

  1.  

    अर्जदार व वडिलांचे आधार कार्ड

  2.  

    रेशन कार्ड / लाइट बिल / कर भरल्याची पावती

  3.  

    बोनाफाईड सर्टिफिकेट / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला

  4.  

    3 पासपोर्ट साइज फोटो

  5.  

    अर्जदार व वडिलांचा जातीचा दाखला

  6.  

    पॅन कार्ड व मतदान ओळखपत्र (आवश्यक असल्यास)

  7.  

    चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र

  8.  

    13 ऑक्टोबर 1967 पासून महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा सांगणारी कागदपत्रे

  9.  

    सॅलरी स्लिप (लागू असल्यास)

  10. 7/12 उतारा, 8 अ, तलाठी अहवाल (लागू असल्यास)

 

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

होम लोन साठी लागणारी कागदपत्रे पॅन कार्ड कसे काढावे उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज

Most Viewed Questions

Recently Published Questions

Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners