आभा नारायण लांबा
तुम्ही जर भारतातील वास्तू संवर्धनाबद्दल विचार कराल, तर सगळ्यात प्रामुख्याने पहिले तुमच्या लक्षात येणारे नाव म्हणजे, आभा नारायण लांबा. स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, नवी दिल्ली येथून त्यांनी वास्तू संवर्धनात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.
त्यांनी काम करण्यास प्रारंभ केल्यापासून, दर्शविलेले आहे कि कसे त्यांचे संशोधन, संस्कृतीबद्दल आदर आणि सूक्ष्म तपशिल ह्यांची मदत घेऊन प्रमुख भारतीय वारसा स्थळांचे नूतनीकरण केले जाऊ शकते.
त्यांच्या हया नाजूक संरचनेंवर केलेल्या दोषमुक्त कार्याने त्यांना, संस्कृती पुरस्कार, आइसनहॉवर फेलोशिप,अॅटिंगहॅम ट्रस्ट आणि चार्ल्स वॉलेस फेलोशिप आणि असे अनेक पुरस्कार जिंकून दिलेले आहेत.आर्क व्हिजनने 2016 मध्ये त्यांना शीर्ष वीस स्थापत्यकलेतील महिलांमध्ये नामांकित केले होते.
शीला श्री प्रकाश
ही एक अशी स्त्री आहे ज्यांचा आपण भारतीय वास्तूशास्त्राचा विचार करतांना विसर पडू देऊ नये.त्या स्वतःचा स्थापत्यकार म्हणून सराव सुरू करणार्या भारतातील पहिल्याच महिला आहेत!1970 मध्ये जेव्हा त्यांनी सुरुवात केली,तेव्हा सथापत्यकला, हा पुरुषांचे वर्चस्व असलेला उद्योग होता आणि त्यावेळेस ते लोक तिच्याशी दयाळूपणे वागले नाहीत.तरीही, त्यांनी अण्णा युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंगमधून स्थापत्यकलेमध्ये स्नातक पूर्ण केले आणि त्यानंतर त्या कामाला लागल्या.
त्यांचा हा दृढ आत्मविश्वास आज त्यांना जगातील सर्वात प्रभावी महिला स्थापत्यकार बनवते.शीला श्री प्रकाश यांनी १२०० हून अधिक स्थापत्य प्रकल्प, डिझाईन आणि पूर्ण केले आहेत.तसेच त्यांनी अनेक पुरस्कारही मिळविलेले आहेत.
त्यांच्या पुरस्कारांमध्ये - जिओर्नले डेल अर्चीटेत्तुराचा जगातील 100 सर्वात प्रभावी स्थापत्यकार, 2019 चा सस्स्टेण्याबिलिटी चॅम्पियन, आणि असे बरेच पुरस्कार आहेत.
शिमुल झवेरी काद्री
अकॅडमी ऑफ आर्किटेक्चर,मुंबई येथे स्थापत्यकलेची पदवी आणि मिशिगन येथील आर्ण आर्बर विद्यापीठात अर्बन प्लानिंगचे शिक्षण घेतल्यानंतर, 1990 मध्ये त्या भारतात परत आल्या आणि स्वतःची कंपनी सुरू केली.
त्यांचे कार्य सूर्यप्रकाश, वारा, नैसर्गिक साहित्य यासारख्या नैसर्गिक घटकांच्या वाढीवर आणि वापरण्यावर केंद्रित आहे.इमारतींना त्यांचा अनोखा, स्वच्छ आणि मोहक लुक देण्यासाठी त्या आधुनिक तंत्रज्ञानासह आधुनिक सामग्री ह्यांचा एकत्र वापर करतात.
त्यांची फर्म एसजेके आर्किटेक्ट्स आणि त्यांनी,बरेच पुरस्कार पटकावले आहेत.ह्यामध्ये 2016 मधील प्रिक्स व्हर्साय पुरस्कार, शिकागो अॅथेनियम म्युझियम ऑफ आर्किटेक्चर डिझाईन अवॉर्ड 2016, वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टिवल स्मॉल प्रोजेक्ट ऑफ द ईयर अवॉर्ड 2012 आणि यासारखे बरेच पुरस्कार आहेत.
अनुपमा कुंडू
कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई विद्यापीठाकडून स्थापत्यकलेची पदवी, आणि बर्लिनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेट पदवी घेऊन अनुपमा कुंडू यांनी आपल्याकडे स्थापत्यकलेकडे बघण्याचा, आणि त्याकरिता वापरल्या जाणार्या साहित्याचा मार्ग बदलला.बांधकाम करण्यासाठी “कचरा साहित्य, कौशल्य नसलेले कामगार आणि स्थानिक समुदाय” वापरण्याच्या उद्देशाने; पर्यावरणीय दुष्परिणाम कमी करणार्या भौतिक संशोधनात गुंतवणूक करण्याबरोबरच त्यांच्या इमारती गर्दीतहि आपले वेगळेपण नजरेत भरतात.
त्यांच्या कार्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आणि त्याचबरोबर त्यांनी शाश्वत आणि जागरूक
इमारतीवरील अनेक पुस्तके प्रकाशित केली.
अनुपमा ह्यांनी आर्किटेक्ट ऑफ दी इयर (2003), आर्किटेक्ट ऑफ द फ्यूचर (2000) आणि इतर बरीच उल्लेखनीय पुरस्कार जिंकली आहेत.
जर आपण ह्या सर्व महिल्लांकडून प्रेरित झाले असाल आणि तुम्हाला अशा घरात जायचे असेल कि जिथे जास्त काम करण्याची,जास्त साध्य करायची प्रेरणा हवी असेल,तर आम्हाला तुमच्यासाठी ते घर शोधण्यास मदत करू द्या!नोब्रोकरकडे प्रत्येक बजेट आणि आवश्यकतेनुसार घरे आहेत, आपला घराचा शोध आमच्यापासून सुरु करा.