‘आपलं घर सुंदर असावं, आपलं घर सुंदर दिसावं’ याच प्रयत्नात प्रत्येकजण असतो. घरात सगळ्या सुविधा असल्या पाहिजेत, घराची संरचना आकर्षक असावी, घरातलं वातावरण नेहमी प्रफुल्लित असावं असा आपल्या सर्वांचाच अट्टहास असतो, तो असायलाही हवा. बऱ्याच गोष्टी घराच्या सुंदरतेमध्ये भर टाकत असतात. त्यांपैकी महत्वाचं एक म्हणजे ‘रंग’, आता वास्तुशास्त्रानुसार घराचा रंग कसा असावा हे आपण जाणून घेऊया.
नो ब्रोकर प्रोफेशनल पेंटिंग सर्विसची भेट घेऊन तुमच्या घराचे रंगकाम योग्य दरात संपन्न कराप्रत्येक रंगाचं खास वैशिष्ट्य आहे. रंग आपल्या स्वभावावर प्रभाव टाकणारे असतात. वास्तुशास्त्रानुसार घराचे रंग अनुरूप ऊर्जा देणारे व सकारात्मक प्रभाव पाडणारे असावेत. दिशा-उपदिशांनुसार तसेच किचन, बेडरूम, स्टडीरूम, बाथरूम, जिना, गेट यांच्यासाठी वास्तुशास्त्रात विशिष्ट रंग सुचवले आहेत. जसे पूर्व, पश्चिम, वायव्य, ईशान्य या दिशांच्या भिंतींचा रंग बदामी, पांढरा, आकाशी, फिकट पिवळा व करडा असावा. घराच्या उत्तरेकडील भिंती पिस्ता, पोपटी, हिरवा तर नैऋत्य, आग्नेय व दक्षिणेकडील भिंती पिवळा, तांबडा, गेरू, केशरी, गुलाबी या रंगांनी फिकट रंगवलेले असावे.
| घरातील स्थान | रंग |
|
किचन |
हलक्या छटांचा तांबडा व केशरी |
पूजेची खोली |
फिकट केशरी, पिवळा, बदामी |
|
गेट |
सिल्वर, पांढरा, गेरू |
|
बेडरूम |
गुलाबी, पिवळा, करडा, लव्हेंडर, हिरवा (फिकट) |
|
बाथरूम |
पांढरा, बदामी |
स्टडीरूम |
पिस्ता, आकाशी, बदामी, गुलाबी (फिकट) |
|
ड्रॉइंग रूम |
पांढरा, फिकट पिवळा, बदामी |
|
बाल्कनी |
पिस्ता, आकाशी, गुलाबी |
|
घराचे बाह्यरंग |
फिकट जांभळा, पिस्ता, बदामी, अबोली, पिवळसर |
तुमच्या घराच्या नूतनीकरणासाठी नो ब्रोकर प्रोफेशनल होम इंटिरियर सर्विसला नक्की कॉन्टॅक्ट करा
वास्तुशास्त्रानुसार घरच्या भिंतीना गडद रंग देणे टाळावे त्याने भडक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. कारण, घरासाठी जास्त उग्र किंवा ज्वलंत स्वरूपाचे जसे गर्द पिवळा, लाल, काळा, निळा रंग जर तुम्ही वापरलात तर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. अशा रंगांमुळे एकतर उजेड व्यवस्थित पडत नाही व खोली छोटी दिसते. मानसिक स्थिती स्थिर राहत नाही; कलह, वाद, असंतुष्टता उद्भवण्याची संभावना असते. एकंदर यावरून तुम्हांला घराचा कलर कसा असावा आणि कसा नसावा, याबद्दल कल्पना आली असेल.
संबंधित विषय येथे वाचा :
मनी प्लांट कोणत्या दिशेला लावावे ? वास्तुशांती का करावी ? घर खरेदी करण्यापूर्वी तपासण्यासारख्या गोष्टीYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & Delivery
Intercity Shifting-Upto 25% Off
Check Prices
Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices
City Tempo-Upto 50% Off
Book Now
Related Questions
Leave an answer
You must login or register to add a new answer .
वास्तुशास्त्रानुसार घराचा रंग कसा असावा
Snehit
2280 Views
1
2 Year
2023-03-20T12:42:46+00:00 2023-03-31T10:37:23+00:00Comment
Share