खरं तर कायदेशीर भाषेत ‘पगडी’ या शब्दाची नोंद नाहीय. हा शब्द मालमत्तेच्या व्यवहारात स्थानिक स्तरावर वापरला जायचा. पुढे व्यावहारिक भाषेतही तोच शब्द प्रचलित होत गेला. तर, ही पगडी सिस्टिम म्हणजे काय, ती कशी चालते याबद्दल पुरेशी माहिती इथे जाणून घ्या.
मालमत्ता व्यवहारातील भाडेकरू पद्धतींत मोडणारी पण अंशिक किंवा अर्ध्या मालकीचा अधिकार देणाऱ्या सिस्टिमला ‘पगडी सिस्टिम किंवा पगडी प्रणाली’ असे म्हटले जाते. या प्रणालीला महाराष्ट्र ‘भाडे नियंत्रण कायदा, 1999’ अंतर्गत कायदेशीर मान्यता देण्यात आली. मालमत्तेवर अंशिक हक्क मिळवण्याच्या बदल्यात भाडेकरू घरमालकाला ठराविक रक्कम देऊ करतो त्यास पगडी असे संबोधतात. त्याच्याकडून फार कमी किंवा केवळ नाममात्र भाडे आकारले जाते.
तुम्हांला मालमत्ता भाड्याने घ्यायची असल्यास नो ब्रोकर प्रोफेशनल टेनंट प्लॅन्सला अवश्य भेट द्यातसेच, या पगडी सिस्टिममध्ये त्या अंशिक घरमालकाचे मालमत्तेवर अधिकार असते मात्र जमिनीवर नसते. त्याचे मालमत्तेवरील हक्क तो त्याच्या करार कालावधींत दुसऱ्याला हस्तांतरित करू शकतो किंवा भाड्याने देऊ शकतो. त्यातून मिळालेल्या उत्पन्नावर मूळ घरमालकाचे व अंशिक घरमालकाचे अधिकार असते, त्या उत्पन्नाचे दोघांत विभाजन होते. अंशिक घरमालक मालमत्ता विकू शकतो बदल्यात त्याला मूळ घरमालकाला समभाग द्यावे लागते. ही पगडी प्रणाली अनेक वर्षांपासून चालत आलेली खूप जुनी पद्धती आहे.
याच्याशी संबंधित विषय :
भाडे करारनामा म्हणजे काय ? भाडेकरू कायदा होम लोन साठी लागणारी कागदपत्रेYour Feedback Matters! How was this Answer?
Shifting, House?
✔
Lowest Price Quote✔
Safe Relocation✔
Professional Labour✔
Timely Pickup & Delivery
Intercity Shifting-Upto 25% Off
Check Prices

Intracity Shifting-Upto 25% Off
Check Prices

City Tempo-Upto 50% Off
Book Now
Leave an answer
You must login or register to add a new answer .
पगडी सिस्टिम म्हणजे काय ?
PranitaP
3.4k Views
1
2 Year
2023-02-16T12:42:38+00:00 2023-03-29T11:14:48+00:00Comment
Share