icons

Login / Sign up

Zero Brokerage.

Thousands of new listings daily.

100 Cr+ Brokerage saved monthly.

Enter phone to continue

Change Phone
Get updates on WhatsApp

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा?

view 10162 Views

1

2 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
2 2023-05-11T11:55:08+00:00

सध्या जवळजवळ सगळ्याच गोष्टी इंटरनेटच्या माध्यमाने ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्याची किंवा सेवा मिळवण्याची तरतूद झाली आहे, हीच काळाची गरजही बनत चालली आहे. शासकीय स्तरावरील कामे सुद्धा आता ऑनलाइनच होतात. शासनाच्या पोर्टलवरून प्रॉपर्टी व्यवहाराशी संबंधित कामे आपण घरबसल्या करू शकतो. सातबाराच्या नोंदी, जमिनीचा नकाशा या गोष्टी पाहता येतात. तर जाणून घेऊया की ‘जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा ?’

तुमच्या मालमत्तेच्या व्यवस्थापनेसाठी नोब्रोकर प्रोफेशनल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सर्विसेस् ला संपर्क करा 

जमिनीचा नकाशा पाहणे :

मालमत्ता विकत घेताना मालमत्तेचा इतिहास पाहण्यासाठी, शेत-जमिनीतून वाट काढण्यासाठी तसेच संबंधित जमिनीची हद्द कुठपर्यंत आहे या सर्व बाबतीत त्या जागेचा नकाशा पाहणे जरूरीचे बनते. हीच प्रक्रिया आता शासनाने सुलभ आणि विनाशुल्क केली आहे. घरबसल्या मोबाइल किंवा लॅपटॉपवरून तुम्ही भू-नक्षा पाहू शकता.  

जमिनीचा नकाशा कसा पाहायचा ?

  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या mahabhunakasha.mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जा. त्यानंतर तुम्ही शहरी की ग्रामीण नकाशा पाहायचा आहे, ते निवडा. तुमच्या जिल्ह्याचे, तालुक्याचे, गावाचे नाव टाका.   

  • मग समोर स्क्रीनच्या उजव्या बाजूला तुम्हांला तुम्ही टाकलेल्या प्रदेशचा नकाशा दिसेल आणि डावीकडे प्लॉटप्रमाणे जमीन शोधण्याची सोय असते तिथे गट क्रमांक/खसरा क्रमांक टाकून सर्चवर क्लिक करा.

  •  

    संबंधित jaminicha nakasha online तुम्ही पाहू शकाल आणि त्या जमिनीचा तपशील व मॅप रीपोर्टला सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या मालकी हक्काची माहिती डावीकडे नमूद केलेले तुम्हांला दिसू शकेल.   

  •  

    जर त्या जमिनीचा नकाशा तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा असेल तर तुम्ही रीपोर्ट पीडीएफवर क्लिक करा, तिथे मग डाउनलोड व प्रिंटचे ऑप्शन दिसतील तुम्ही ते सिलेक्ट करू शकता.

  • शासनाने वेबसाइटवर online jaminicha nakasha उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत तर होत आहे शिवाय संबंधित जमिनीची वैध माहिती कळते जसे जमिनीचा आकार, स्थान, मालकी अधिकार इत्यादी. 

वरील माहितीवरून तुम्हांला ‘ऑनलाइन जमिनीचा नकाशा कसा पाहावा’ यासंबंधित आवश्यक ती माहिती प्राप्त झाली असावी, दिलेले स्टेप्स फॉलो करून तुम्ही घरबसल्या जमिनीचा नकाशा पाहू शकता. 

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

मालमत्ता पत्रक म्हणजे काय 1 हेक्टर म्हणजे किती एकर सर्वे नंबर कसा शोधायचा
Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners