icons

Login / Sign up

Zero Brokerage.

Thousands of new listings daily.

100 Cr+ Brokerage saved monthly.

Enter phone to continue

Change Phone
Get updates on WhatsApp

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

गायरान जमीन नावावर कशी करावी

view 3077 Views

1

2 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
3 2023-04-27T00:15:01+00:00

जमिनीला पूर्वीपासून अनन्यसाधारण महत्व दिले गेले, आजही ते वाढतच चालले आहे. जमीन एकाच प्रकारची किंवा एकाच कामासाठी नसते तर ठराविक कामासाठी तिचे प्रकार पाडले जातात. विशेष नावांनी ती जमीन मग ओळखली जाते, त्या जमिनीचे नियम ठरवले जातात ते पाळावे लागतात. तर, इथे आधी गायरान जमीन म्हणजे काय ते समजून घेऊ नंतर गायरान जमीन नावावर करणे शक्य आहे का

,

याबद्दल माहिती घेऊया.    

तुमच्या जमिनीसंदर्भात कायदेशीर कामांसाठी नोब्रोकर प्रोफेशनल लीगल सर्विसशी अवश्य संपर्क साधा

गायरान जमीन म्हणजे काय ?

  • गुरांच्या कुरणासाठी, वैरणीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीला गायरान जमीन म्हटले जाते. 

  • गावच्या एकूण क्षेत्रफळापैकी पाच टक्के जमीन यासाठी राखीव जमीन असते ज्यावर कुणीही व्यक्तिगत अधिकार दाखवू शकत नाही. 

  • गायरान जमिनीवर शासकीय मालकी अधिकार असतात याचा ताबा फक्त देखभालीकरीता व ग्रामस्थांच्या सार्वजनिक वापरासाठी ग्रामपंचायतीकडे सुपूर्त केलेला असतो. 

  • ग्रामपंचायतसुद्धा त्या जमिनीवर कोणते बांधकाम विनापरवानगी करू शकत नाही. 

  • जर ती जमीन अन्य उपक्रम किंवा कार्यक्रमासाठी वापरायची असेल तर अधिकृत परवानगी घ्यावी लागते.

तुम्ही प्लॉट खरेदी करण्याच्या विचारात असाल तर नोब्रोकर प्लॅटफॉर्मच्या ‘प्लॉट फॉर सेल’ ला जरूर भेटा 

gayran jamin navavar karne :

  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम १२ अनुसार गावातील जमिनी गुरेचरणासाठी, स्मशानभूमीसाठी, बगीचा-वनांसाठी, छावणीसाठी, मळणीसाठी तसेच अन्य सार्वजनिक कार्यासाठी राखीव ठेवण्याचे नमूद आहे.

     

  • गायरान जमीन नावावर कशी करावी’, असा जर तुम्हांला प्रश्न पडला असेल तर ते कुणाच्याही नावे करता येत नाही हे लक्षात असू द्यात. अशा जमिनी जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाहीत. 

  • अलीकडे त्या जमिनींवर अतिक्रमणाचे प्रमाण वाढले असून गायरान जमीन वापराचा मूळ उद्देश्य मागे पडत चालला आहे. 

  • सर्वोच्च न्यायालयाने सन २०११ साली गायरान जमिनी इतर कारणाकरीता वापरण्यावर निर्बंध टाकले आहेत. या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की गावातल्या राखीव जमिनी फक्त केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांसाठी उपलब्ध करून द्याव्यात; इतर कोणत्याही व्यक्ति, संस्था यांच्या प्रकल्पाकरीता अशा जमिनी वापरात आणू नये.        

तर आता वरील माहितीवरून, ‘गायरान जमीन नावावर करणे’ हे शक्य नाही, ती फक्त सार्वजनिक व शासकीय उपक्रमांसाठी राखीव असते, हे तुमच्या लक्षात आले असेल.    

याच्याशी संबंधित आणखी विषय येथे वाचा :

खालसा जमीन म्हणजे काय ? वडिलोपार्जित जमीन नावावर करणे जमीन खरेदी-विक्री नियम
Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners