icons

Login / Sign up

Zero Brokerage.

Thousands of new listings daily.

100 Cr+ Brokerage saved monthly.

Enter phone to continue

Change Phone
Get updates on WhatsApp

Experience The NoBrokerHood Difference!

Set up a demo for the entire community

Thank You For Submitting The Form
Q.

आधार कार्ड वरील नाव कसे बदलावे?

view 3840 Views

1

2 Year

Comment

whatsapp [#222222128] Created with Sketch. Send
1 2023-05-11T11:50:30+00:00

अशी काही प्रमाणपत्रे आहेत, ज्याच्यामुळे संबंधित व्यक्तीची अधिकृत ओळख पटते. त्यांपैकी महत्वाचे एक म्हणजे व्यक्तीचे ‘आधार कार्ड’ होय. कायदेशीर, बँकेची, शैक्षणिक, कामाच्या ठिकाणीसुद्धा हे कार्ड संबंधित व्यक्तीच्या ओळखीचा वैध पुरावा मानला जातो. परंतु, हे कार्ड अपडेट करून घेणेही तितकेच गरजेचे असते. जर आधार कार्डवर तुमचे नाव चुकीचे पडले असेल किंवा नाव बदलले असल्यास ‘आधार कार्ड नाव बदलने’ सुद्धा आवश्यक असते.

जमीन खरेदी-विक्रीच्या कायदेशीर प्रक्रियेत नोब्रोकरच्या प्रोफेशनल लीगल सर्विसची अवश्य मदत घ्या

aadhar card nav badalne :

  • आधार कार्डवरील तुमचे नाव योग्य असणे अतिआवश्यक असते कारण तेच गृहीत धरले जाते. बऱ्याच ठिकाणी आधार कार्डवर जसे आहे तसेच हुबेहूब नाव लिहिण्यास सांगतात. मग त्यात जर फरक दिसला तर कामे रखडतात.   

  • नाव चुकले असल्यास किंवा लग्न झाल्यानंतर आधार कार्ड नाव बदल करावे लागते तसेच अन्य काही कारणास्तव नावात बदल केले गेले असल्यास कार्डवरील आधीचे नाव काढून टाकावे लागते.  

  • तुम्ही जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ह्या संबंधीचा अर्ज देऊ शकता. तिथे कार्यकारी अधिकाऱ्याकडे तुम्हांला काही कागदपत्रे सादर करावी लागतात. अर्ज केल्यानंतर साधारण सात ते पंधरा दिवसात अपडेटेड आधार कार्डची पोहोच होईल.

  •  

    त्याचप्रमाणे, शासनाच्या www.uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही घरबसल्यादेखील काही औपचारिक पायऱ्यांची पूर्ती करून तुमच्या आधार कार्डवरील नावात बदल करू शकता.   

आधार कार्ड नाव बदलणे कागदपत्रे :

  1.  

    आधार कार्ड (जे अपडेट करायचे आहे ते)

  2.  

    पॅन कार्ड

  3.  

    मतदान ओळखपत्र

  4.  

    ड्रायविंग लायसन्स

  5.  

    रेशन कार्ड

  6.  

    लाइट बिल

aadhar card name change after marriage documents required in marathi :

  1.  

    विवाह नोंदणी प्रमाणपत्र

  2.  

    लग्नपत्रिका

  3.  

    पती-पत्नीचा एकच पत्ता असलेले अधिकृत डॉक्युमेंट

तर वरील सर्व माहितीवरून तुम्हांला आधार नाव बदलणे प्रक्रिया कशी पूर्ण केली जाते याविषयीच्या महत्वाच्या गोष्टी लक्षांत आल्या असतील. तुमचे आधारकार्ड सुद्धा चालू नाव टाकून अपडेट करून घ्यायचे असेल तर आधी करून घ्या.

याच्याशी संबंधित विषय येथे वाचा :

उत्पन्न प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज पॅन कार्ड कसे काढावे आधार कार्ड वरील जन्मतारीख बदलणे
Flat 25% off on Home Painting
Top Quality Paints | Best Prices | Experienced Partners