Loved what you read? Share it with others!
'एम्बसी टेक व्हिलेज' जवळ रहाण्यासाठीचे सर्वोत्कृष्ट परिसर
- बेल्लंदूर: बेल्लंदूर हे बंगळुरूच्या दक्षिण-पूर्वेकडे स्थित एक उपनगर आहे. त्याच्या पश्चिमेस एचएसआर लेआउट, पूर्वेस देवराबिसनहल्ली, दक्षिणेस सर्जापूर रोड आणि उत्तरेस बेल्लंदूर तलाव आहे. पूर्व आणि दक्षिण बंगळुरू दरम्यान हा एक महत्त्वाचा ट्रांजिट पॉईंट बनून, आऊटर रिंग रोड परिसरातून जातो. सुरुवातीला हा ग्रामीण भाग होता परंतु आयटी हबच्या आगमनामुळे,निवासी व व्यावसायिक संकुलांच्या विकासामध्ये मोठी वाढ झाली आहे.माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि वित्त उद्योगात काम करणार्या कर्मचार्यांसाठी या परिसरात अनेक विशेष आर्थिक क्षेत्र अस्तित्त्वात असल्यामुळे हा त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. केपीएमजी, एसएपी लॅब, एटी अँड टी, सिस्को, इंटेल, विप्रो इत्यादी कंपन्या या भागात आहेत. एम्बसी टेक व्हिलेजपासून ते 2 किमी अंतरावर आहे.या परिसरामध्ये काही चांगल्या शाळा जशा की स्मृती अकॅडमी, सेंट पीटर्स, ऑर्किड आणि व्हबग्योर. बंगलोर मधील एक उत्तम हॉस्पिटल, सक्रा वर्ल्ड हॉस्पिटल देखील या ठिकाणी आहे त्याचबरोबर कोलंबिया एशिया, क्लाउडनाईन आणि अपोलो क्लिनिक हे पण इथे आहेत.2 बीएचके,बेल्लंदूरमध्ये दरमहा रुपये 15,000 ते 40,000 दरम्यान भाड्याने मिळतील. रहिवासी सोसायट्यांसह बरीच रेस्टॉरंट्स, कॅफे आणि बार सुरु झाल्यामुळे या भागाची स्थिती चांगलीच वाढली आहे.
- दोड्डाकंनेली: एम्बसी टेक व्हिलेजपासून सुमारे 2.2 किमी अंतरावर, दोड्डाकंनेली हे टेक पार्कमध्ये कार्यरत व्यावसायिकांसाठी एक व्यवहार्य पर्याय आहे. ह्या परिसरातील 2 बीएचकेची किंमत दरमहा रुपये 11,000 ते 32,000 दरम्यान असेल. व्ही व्ही आर स्कूल आणि अंजनाद्री हायस्कूल या भागातील काही शाळा आहेत.करुणालयम रूग्णालय आणि वेमना रुग्णालये दोड्डाकंनेलीतील प्रसिद्ध रुग्णालये आहेत. हा परिसर अद्याप संपुर्णपणे विकसित झालेला नाही आणि तरीही बरीच चांगली रेस्टॉरंट्स आणि बार इथे उपलब्ध आहेत.
- कैकॉन्ड्रहल्ली: अंदाजे 2 किमी अंतरावर, एम्बेसी टेक व्हिलेजजवळ, कैकॉन्ड्रहल्ली हा एक विशाल परिसर आहे. व्हाईटफील्ड, इलेक्ट्रॉनिक शहर, बाह्य रिंगरोड, मराठहल्ली आणि कोरमंगला यासारख्या आयटी क्लस्टर भागाशी चांगली कनेक्टिव्हिटी असलेला हे वेगवान विकसित होणारे क्षेत्र आहे. त्यात सर्वात वेगवान विकसनशील परिसर म्हणजे सर्जापूर - जिथे बंगळूरु स्थित आयटीमधील मोठी कंपनी,इन्फोसिसने अगदी विशेष आर्थिक क्षेत्र स्थापित केले आहे.सर्जापूरमध्ये अलीकडे बर्याच चांगल्या सोसायट्यांचा विकास झाला आहे आणि बर्याच प्रतिष्ठित संस्थांचे बांधकाम इथे चालू आहे. एशिया पॅसिफिक वर्ल्ड स्कूल, स्मृती अकॅडमी,सेंट पीटर्स स्कूल आणि क्ले (एक सुप्रसिद्ध प्ले स्कूल साखळी),हे कैकॉन्ड्रहल्लीत आहेत.कोलंबिया एशिया आणि स्वर्णमुखी हॉस्पिटल अशी बरीच चांगली रुग्णालये देखील जवळ आहेत. या भागात, सर्जापूर सोशल, हूट आणि वेपर सारख्या रेस्टॉरंट्स आणि पबची संख्या चांगली आहे आणि यामुळे तो तरुण गर्दीत लोकप्रिय पर्याय बनला आहे. कैकॉन्ड्रहल्ली येथे एक सरोवर देखील आहे, जे त्यास एक निसर्गरम्य वातावरण देते.या परिसरातील 2 बीएचकेची किंमत दरमहा रुपये 14,000 ते 30,000 दरम्यान असेल.
- कडूबीसनहल्ली: एम्बसी टेक व्हिलेजपासून कडुबेसनसहल्ली एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे आणि हे एक परवडणारे क्षेत्र आहे. टेक पार्क जवळ असले तरी ते वेल्स फार्गो जवळ देखील आहे. परिसरातील 2 बीएचकेची किंमत अंदाजे रुपये 14,000 ते 30,000 इतकी असेल. खरं तर, रुपये 30,000 मध्ये एखाद्यास इथे राहण्यासाठी मोठी विलासी जागा मिळू शकते.हा परिसर, मराठाल्ली, वर्थूर आणि गुंटूरची चांगला जोडलेला आहे. त्यात इथे शहराच्या बर्याच दुसऱ्या भागांच्या तुलनेने रुंद रस्ते आहेत. बऱ्याच प्रतिष्ठित विकासकांनी ह्या भागात चांगल्या सोसायट्या बांधल्या आहेत. हे कुटुंबांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. ह्याठिकाणी न्यू होरायझन गुरुकुल, श्री श्री रविशंकर बाल मंदिर आणि अशी अजून काही छान प्ले स्कुल्स आहेत. फोस्टर हेल्थकेअर आणि माया मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स सारखे बरेच चांगले मल्टि-स्पेशालिटी रुग्णालये इथे सहज उपलब्ध आहेत.
- पानाथूर: पानाथूर हे एम्बेसी टेक व्हिलेजपासून साधारणतः 1.8 किमी अंतरावर आहे,आणि वर्थूर, भोगनहल्ली आणि मराठहल्लीशीही चांगले जोडलेले आहे. पानाथूरमध्ये 2 बीएचके दरमहा रूपये 10,000 ते 30,000 मध्ये सहज उपलब्ध असतील.परिसरामध्ये,मुन्नीरेड्डी लेआउट, जेसीआर लेआउट आणि लॉर्ड्स स्टेप्स लेआउट,यांसारखे चांगल्या लेआउट्स देखील आहेत. ग्रेड ए च्या बर्याच विकासकांनी ह्या भागात चांगले प्रकल्प बांधले आहेत.ऑर्किड इंटरनॅशनल,लिटल एली प्रीस्कूल, वाग्देवी विलास, ज्योती इंग्लिश स्कूल इत्यादी इथल्या काही प्रमुख शाळा आहेत. अॅश्योर स्पेशॅलिटी क्लिनिक, माया हॉस्पिटल, अपोलो डायग्नोस्टिक्स ही काही चांगली वैद्यकीय केंद्रे आहेत जी पानाथूरमध्ये आहेत. येथे जवळपास काही चांगले फॅमिली रेस्टॉरंट्स देखील आहेत. यात असंख्य किराणा दुकाने आणि सुपरमार्केट आहेत जे, एम्बसी टेक व्हिलेजमध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी,पानाथूर एक आदर्श पर्याय बनवते.
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19858+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
16121+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10437+ views
Home Loan Process in India: Step-by-Step Procedure
October 27, 2023
8316+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7311+ views
Loved what you read? Share it with others!
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!