Loved what you read? Share it with others!
स्मार्ट होम उपकरणे आपले पैसे कसे वाचवू शकतात?
स्मार्ट थर्मोस्टॅट्स
टॅबलेट किंवा स्मार्टफोन सारख्या आपल्या कोणत्याही इंटरनेट-कनेक्ट केलेल्या उपकरणाद्वारे, या स्मार्ट थर्मोस्टॅट्सवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. ही वायफायद्वारे ऑपरेट केली जात असल्याने आपणास त्यांच्यावर कोणत्याही दुर्गम ठिकाणाहूनही नियंत्रण ठेवता येऊ शकते. उदाहरणार्थ, आपण जर कुठे घराबाहेर गेले असाल आणि तापमान कमी करण्यास विसरल्यास, आपण ते आपल्या ऑफिसमधून करू शकता आणि घरातुनच ह्यात बदल करण्याची गरज नाही.
आपल्या घरासाठी असलेली ही स्मार्ट उपकरणे, आपली जीवनशैली समजतात आणि त्यानुसार त्यांना बदलू किंवा समायोजित करतात. स्मार्ट थर्मोस्टॅट्स हे सुनिश्चित करू शकतात की उष्णता वाया जाणार नाही, आणि घरी कोणीही नसल्याचे समजल्यास ते तापमानात बदल करू शकतात.
स्मार्ट पंखे
हे स्मार्ट पंखे, कोणत्याही स्मार्ट थर्मोस्टॅट्सप्रमाणेच कार्य करतात. इतर स्मार्ट उपकरणांप्रमाणेच हे पंखे, स्मार्टफोन-टॅब्लेट सारख्या इंटरनेट-सक्षम उपकरणांद्वारे ऑपरेट केले जाऊ शकतात. ते आपल्याला आपल्या मोबाइल उपकरणावरील अँपद्वारे,पंख्याचा वेग सुरु करणे, थांबविणे किंवा बदलण्याची परवानगी देते!
स्मार्ट लाइट बल्ब
या स्मार्ट बल्बसाठी टाळ्या! स्मार्ट बल्ब हे 21 व्या शतकातील स्मार्ट जगाचे भविष्य आहेत. या स्मार्ट बल्बसह आपले विद्यमान बल्ब पुनर्स्थित करा,आणि आपण निश्चितपणे काही अतिरिक्त पैसे वाचवाल. एखादा चित्रपट पाहताना, आपल्याला आपल्या खोलीचा प्रकाश अंधुक करायचा असेल, तर तो स्मार्टफोनद्वारेच अॅपद्वारे करा, केवळ दिवे चालू किंवा बंद करण्यासाठी उठण्याची गरज नाही. आपल्या मुलगा, कमी प्रकाशाच्या खोलीत जाण्यापूर्वी घाबरेल,ह्याचीचिंता आहे? स्मार्ट बल्ब स्थापित करा, जेव्हा त्यांना कोणतीही हालचाल जाणवते तेव्हा जे चालू होते, किंवा अॅपमधून बेडरूममधील दिवे सरळ सुरु करतात!
स्मार्ट आउटलेट्स
स्मार्ट उपकरणांकडे वळण्याआधी,एक छोटी सुरुवात करण्यासाठी, आपण स्मार्ट प्लग स्थापित करुन प्रारंभ करू शकता. हे प्लग आपल्याला आपल्या बेडसाईड दिवा, इस्त्री किंवा सॉकेटशी कनेक्ट केलेली कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नियंत्रित करण्यास मदत करतात, म्हणून जर आपण घाई घाईने आपले घर सोडले असेल,व आपण आपले 'हेयर स्ट्रेटनर' अनप्लग केला आहे की नाही हे आपल्या लक्षात नाही, काळजी करण्याची गरज नाही, फक्त आपल्या स्मार्टफोनवरून हे करा!
आपल्या घरासाठी ही सर्व स्मार्ट उपकरणे, आपल्या आयुष्यात अतिरिक्त आराम देण्यासाठी येथे आहेत आणि ते दीर्घकाळ आपले काही पैसे वाचवतात. आपण आपले घर स्मार्ट बनवू इच्छित असल्यास, आपण उपरोक्त-सूचीबद्ध उपकरणासह प्रारंभ करू शकता.
Most Viewed Articles
रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय आणि आपल्याला त्याची आवश्यकता का आहे?
January 31, 2025
19612+ views
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025
16005+ views
गृह विम्याच्या बाबतीत सर्वात आश्चर्यकारक तथ्ये
May 18, 2020
10411+ views
भारतीय घरांसाठी 15 आकर्षक बाह्य रंग संयोजने
January 31, 2025
7440+ views
भारतात असलेल्या 'को-लिव्हिंग स्पेसस'बद्दल आपल्याला आवश्यक असलेली सर्व माहिती
January 31, 2025
7187+ views
Loved what you read? Share it with others!
Recent blogs in
तुमचे घर बाळासाठी सुरक्षित बनवा
January 31, 2025 by NoBroker.com
आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय
January 31, 2025 by NoBroker.com
त्रासदायक कीटक आपले घर उध्वस्त करीत आहेत? जाणून घ्या आपण त्यांना कसे दूर ठेवू शकता.
January 31, 2025 by NoBroker.com
बंगळुरूमध्ये आपले पाणी बिल ऑनलाईन कसे भरावे याबद्दल मार्गदर्
January 31, 2025 by NoBroker.com
Full RM + FRM support
Join the conversation!