सेसलिया अहेर्ण, एक आईरीश लेखक, एकदा असं म्हटला होता की, घर ही एक जागा नसून ती एक भावना आहे .खरंतर घर, बऱ्याच भावनांचे एक मिश्रण आहे ,आणि ही यादी लांबच लांब आहे ,ज्यामध्ये, प्रेम, जिव्हाळा, कुटुंब, मालकी हक्क ,अभिमान ई. गोष्टींचा समावेश असतो.

जरी,घर हे प्रत्येकाच्या इच्छा यादीत असेल,पण ,हा काही सोपा निर्णय नाही ,कारण घर घेताना आपल्याला असंख्य ,अवघड प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात.जसे की, कधी घ्यावे ,कुठे घ्यावे ,काय घ्यावं आणि कसे घ्यावे .आपल्यापैकी बरेचसे लोक, नक्की काय घ्यावं या प्रश्नापाशी अडकलेले असतात .म्हणजे, एक अपार्टमेंट घ्यावं ,की जमीन घेऊन त्यावर अपार्टमेंट बांधावे.

तर मग कोणते जास्त योग्य आहे? अपार्टमेंट की जमीन? याचे उत्तर शोधण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे ,आपण आधी म्हटल्यानुसार ,’भावनांचा’ विचार करावा लागेल .स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला काय पाहिजे आणि का पाहिजे?

चला तर मग तर्क आणि ‘भावना’ च्या आधारे, थोडासा प्रयत्न करून ह्या प्रश्नांचं उत्तर शोधूया.

 

कोणतं सोपं आहे?

apartment keys

नक्कीच ,अपार्टमेंट. तुम्हाला आवडणारा अपार्टमेंट घेण्यासाठी फक्त पैशांची जुळवाजुळव करावी लागते,शीर्षक आणि कायदेशीर कागदपत्रे ,ह्यासाठी पळापळ करत बसावं नाही लागत, जसेकी जमीन खरेदी करताना घडतं. जर ते अपार्टमेंट असेल, तर बांधकाम करणाऱ्यालाच या सर्व गोष्टी कराव्या लागतात .

रेरा सारखे कायदे ,घर खरेदी करणाऱ्यांना सुरक्षितता पूरवतात ,आणि अपार्टमेंट बांधणाऱ्यानाही कायद्याने बांधून ठेवतात .जर तुम्ही ,तुमचं घर स्वतः बांधून घ्यायचं ठरवलं असेल ,तर मग तुम्हाला थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील ,आणि थोडी पायपीट करावी लागेल. पहिल्यांदा तुम्हाला एक स्थापत्यकार शोधावा लागेल, बांधकामाचा आराखडा मंजूर करून घ्यावा लागेल,कच्चा माल इत्यादींसाठी वाटाघाटी करून सर्वोत्तम सौदे मिळवावे लागतील.

आपण हे सर्व प्रयत्न केलेच पाहिजेत कारण ,त्याचं फळरूपी आपल्याला, ‘भावनां’ वर अवलंबून असलेलं एक स्वप्नवत घर बांधायचं आहे.

 

किंमत

paying money

जर तुम्ही मोठ्या शहरामध्ये राहत असाल, तर मग आपार्टमेंटपेक्षा ,जमीन खरेदी करून त्यावर घर बांधण्याची किंमत फार जास्तीची मोजावी लागू शकते.तसं म्हटलं तर, ते शेवटी आपले घर खरेदी करण्यासाठी असलेल्या बजेटवर देखील अवलंबून असते.

 

सुख सुविधा

apartment pool

आजकाल, बहुतेक अपार्टमेंट कॉम्प्लेक्स ,अशा बऱ्याच सुविधा देतात जसेकी स्विमिंग पूल,क्लब हाऊस,खेळ मैदान,बाग बगीचे ई. जोपर्यंत तुम्ही खरेदी करत असलेली जमीन ही एखाद्या समुदाय किंवा टाउनशिपचा भाग नाही, तोपर्यंत तुम्हाला या सुविधांचा लाभ मिळणार नाही .अजून एक महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे,अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहण्याची सुरक्षितता ही खूप मोठी आहे.

 

गुंतवणूक म्हणून

house investment

फक्त मालमत्तेचा प्रकार, हा एकमात्र घटक नाही जो रिअल इस्टेट गुंतवणूकीवरील परतावा ठरवतो .

वेळ, स्थान, खरेदीची किंमत, भाड्याने मिळणारा अंतरिम परतावा यासारखे घटकही लक्ष्यात घ्यावे लागतात.

तथापि, जमीनिचा एक तुकडा अपार्टमेंटपेक्षा वेगवान आणि जास्त परतावा मिळवून देऊ शकतो ,हे खरे आहे.

 

बँक सहाय्य

home loan approve

जमीन खरेदीसाठीची कर्ज प्रक्रिया ही फार क्‍लिष्ट स्वरूपाची आहे, याउलट अपार्टमेंट खरेदीसाठीची कर्जप्रक्रिया सोपी आहे.बहुतेक बँका जमिनीसाठी कर्जांवर जास्त व्याजदर आकारतात. तथापि, आपण जमीन विकत घेण्याच्या दोन वर्षांच्या आत ,आपले घर बांधण्याची योजना आखल्यास ,बँक चांगल्या व्याजदरात कर्ज देऊ करतील.

आता तुम्हीच निर्णय घ्या, जमीन विकत घ्यायची आणि आपल्या स्वप्नातील घर संपूर्ण स्वातंत्र्यासह डिझाइन करायचं कि आपल्या गरजा पूर्ण करणारं, सुंदर अपार्टमेंट खरेदी करायचं ?

आशा आहे कि आम्ही काही महत्त्वाच्या घटकांवर चर्चा केली आहे ,जी आपल्याला योग्य तो निर्णय घेण्यास मदत करील.