कौटुंबिक वि. बॅचलर उत्तम भाडेकरी कोण बनतो?

घरमालक म्हणून आपल्या घरात कोण राहणार आहे, ते आपले घर कसे हाताळतील आणि आपल्या घराची कशी काळजी घेतील व घर सोडताना कोणत्या कंडिशन मध्ये सोडतील, ह्याची चिंता आपल्याला असते. या व्यतिरिक्त ते बिलल्डींग च्या नियमांचे पालन करतील की नाही,  ते वेळेवर भाडं भरतील कि नाही?आपल्याला  आणखी एक मोठा प्रश्न पडतो की, आपण आपले घर बॅचलरला द्यावे कि एखाद्या कुटुंबाला भाड्याने द्यावे?

ह्या बाबतीत खालील पॉइंट्स आपल्याला काही स्पष्टता प्राप्त करण्यास मदत करतील-

 

 

1- घराच्या  आकारावर अवलंबून असते

tiny apartment

Picture Courtesy – Business Insider

 

आपल्याकडे एक लहान घर किंवा 1 बीएचके असल्यास, आपण भाड्याने देण्यासाठी बॅचलरच निवडावा. त्यांना खूप जागा लागत नाही आणि छोट्या घरात किंवा 1 बीएचके / 1 आरकेमध्ये आरामशीरपणे जगू शकतात. एकटे लोक स्टुडिओ अपार्टमेंट आणि लहान घरे शोधतात कारण त्यांच्यासाठी ते मेन्टेन करणे सोपे आहे.

कुटुंबियांना, नवविवाहित जोडपे किंवा मुले असलेले जोडपे, ह्यांना बऱ्याचदा अधिक जागा पाहिजे असते. त्यांच्याकडे जास्त वस्तू असतात, अधिक कपडे असतात, स्वयंपाकघरामधेहि बरेच काही सामान असते,ह्याची आपल्याला कल्पना असतेच. त्यांच्याकडे लहान बजेट असले तरच ते लहान घरे शोधतात नाहीतर त्यांना मोठे घरच पाहिजे असते .

READ  2020 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे

 

2- सुविधा काय काय आहेत ह्यावर अवलंबून असते

apartment security

जेव्हा आपले घर मोठ्या इमारतीमध्ये असते, तेव्हा आपल्या भाडेकरुंना ऑफर करण्यासाठी आपल्याकडे अनेक अतिरिक्त सुविधा असतात. ह्या सोसायटीसमध्ये सामान्यत: जिम, पूल, क्लबहाऊस, सुरक्षा इत्यादी सुविधा असतात.बॅचलर पेक्षाही कुटुंबे ह्या सुविधांचा शोध जास्त घेतात, आणि उच्च अपेक्षा बाळगतात. सेफ्टी फीचर जसेकी सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक, फायर अलार्म इ. वैशिष्ट्ये बघितले जातात विशेषतः मुलांसह राहणारे कुटुंब ह्या गोष्टी शोधत असतात.

मूलभूत गरजा असलेल्या घरांना बॅचलर्सची काहीच हरकत नसते,ते सहसा जास्त वेळ काम करतात आणि या सुविधा वापरण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. एकट्या महिलांसाठी सुरक्षा देखील सर्वात महत्वाची आहे, परंतु पुरुषांना सुरक्षतेची जास्त अपेक्षा नसते.

 

3- फर्निचरवर अवलंबून असते

empty apt

तुम्ही भाड्याने देत असलेले घर पूर्णपणे फर्निश्ड आहे ,सेमी फर्निश्ड आहे,कि त्यात फर्निचरच नाही?नवविवाहित जोडपे सोडून बहुतेक कुटुंब त्यांच्या स्वत: च्या फर्निचरसह भाड्याच्या घरात येतात जे त्यांनी वर्षभर गोळा केले आहे. जर आपले घर फर्निश्ड असेल तर त्यांच्यासाठी ही समस्या बनेल कारण त्यांना फर्निचर ठेवण्यासाठी जागा राहणार नाही, किंवा तुम्हाला तुमचं फर्निचर तिथून काढून दुसरीकडे ठेवण्यासाठी जागा शोधावी लागेल आणि त्याचा बंदोबस्त करावा लागेल.

READ  लॉकडाउन संपण्याआधीच, आपल्या घरातील गृहसजावटिला प्रारंभ करा!

बॅचलर्स आणि सिंगल लोक पूर्ण फर्निश्ड घराला पसंती देतात कारण शक्यतो ते जास्त ट्रॅव्हल करत नाहीत.जर तुमचं घर सेमी किव्वा पूर्ण फर्निश्ड असेल तर चान्सेस जास्त राहील कि बॅचलर लोक तिथे राहायला इंटरेस्टेड असतील.

 

4- तुम्ही अपेक्षा करत असलेल्या भाड्यावर अवलंबून आहे

collecting rent

तुम्ही किती भाडे आणि डिपॉसिट ची अपेक्षा ठेवत आहात? कुटुंबे आणि बॅचलर ह्या दोघांचेही बजेट टाईट आणि फिकस्ड स्वरूपाचं असतं. कुटुंबे तुम्हाला मोठ्या प्रमाणात भाडे देऊ शकणार नाहीत कारण त्यांच्याकडे साधारणतः 1 किंवा 2 कमाई करणारे सदस्य आणि त्या तुलनेत अधिक लोक त्यांच्यावर डिपेंड असतात. ह्या कारणांमुळे ते डिपॉसिट  देखील जास्त देऊ शकत नाहीत.

ह्याउलट बॅचलर्स कडे भाडे विभागण्यासाठी, रूममेट्स किंवा फ्लॅटमेट्स आणण्याचा अतिरिक्त फायदा आहे जेणे करून त्यांचं भाडं विभागुन कमी भाडं भरावं लागेल.त्यांना थोड जास्त भाड  असलेतरी काही हरकत नसते कारण त्यांची ही रक्कम दुसऱ्यानंबरोबर विभागली जात आहे. डिपॉसिट च्या बाबतीतही, 2-3 लोक त्यास विभाजित करीत असतील तर तुमची त्यांना गरजच वाटेल.

 

5- किती कालावधीसाठी भाड्याने द्यायचं ह्यावर अवलंबून आहे

READ  लॉकडाऊन दरम्यान आपली कार आणि बाइक चालू स्थितीत कशी ठेवावी

bachelor

 

कुटुंबे, विशेषत: मुलांसह असलेली कुटुंबे बऱ्याचदा घरे बदलत राहण्याची शक्यता नसते. ते आपल्या मुलांच्या शाळेच्या जवळील घरे शोधत असतात.शक्यतो मुले ग्रयाजुएट होऊस्तोवर त्यांना घर बदलण्याची ईच्छा नसते. दीर्घ काळासाठी, एक कुटुंब निवडणे फायदेशीर आहे.

बॅचलर्स, त्यांच्यावर कोणतीही कौटुंबिक जबाबदारी नसल्यामुळे, घरे, नोकऱ्या आणि शहरांना अधिक सहजपणे बदलण्याची शक्यता असते. जर त्यांच्या नोकरीची मागणी असेल तर त्यांना नवीन शहरात शॉर्ट नोटिसमध्ये जावच लागतं किंवा ते परत त्यांच्या गावी जाऊ शकतात तिथेच विवाहित होऊ शकतात. त्यामुळे त्यांची कुटुंबापेक्षा जास्त काळ टिकून राहण्याची शक्यता कमी आहे. थोड्या काळासाठी जर आपल्याला आपले घर भाड्याने द्यायचे असेल तर बॅचलर्स शोधणे फायद्यात राहील.

लक्षात ठेवा की  कुटुंबे आणि बॅचलर्स दोघांचेही आप आपले फायदे आणि तोटे आहेत. आणि दोघांमध्यहि काही नियम अपवाद आहेत. जुन्या ठराविक कल्पना जसे की बॅचलर्स अधिक त्रास देतात, कुटुंब घर चांगले ठेवतात, इत्यादी चुकीच्या सिद्ध झालेल्या आहेत.

म्हणून,तुमचा भाडेकरु हुशारीने निवडा, नो-ब्रोकर आपल्याला एका क्लिकमध्ये हवा तसा पाहिजे असलेल्या भाडेकरूची निवड करण्याची परवानगी देतो! आपल्या घरासाठी सर्वोत्तम भाडेकरु मिळविण्याची प्रक्रिया जलद आणि सुलभ झालेली आहे ,त्यासाठी नो-ब्रोकर चे धन्यवाद…

Found Interesting Please Share