whatsapp sharing button 3
Marathi
comment

2024 मध्ये मुंबईत राहण्यासाठी शीर्ष असे 7 स्वस्त आणि सर्वोत्तम ठिकाणे

पूर्वी बॉंबे म्हणून ओळखल्या जाणारी मुंबई ही भारताच्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. सुमारे 18.41 दशलक्ष लोकसंख्या असलेले हे शहर, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर बनले आहे. पश्चिम किनारपट्टीवर वसलेले,हे शहर सहसा उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव घेते. हे भारताचे आर्थिक, करमणूक आणि व्यावसायिक केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी आणि व्हिक्टोरियन अँड आर्ट डेको इमारती,ह्या युनेस्कोच्या तीन जागतिक वारसा स्थळांचे, मुंबई हे निवासस्थान आहे. शहराच्या मध्यभागी मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, एस्सेल वर्ल्ड, कान्हेरी लेणी, अशी काही नावे समाविष्ट आहेत. मुंबई शहर रेल्वे, रस्ता, पाणी आणि हवेने चांगले जोडलेले आहे.

mumbai
+

परवडणारे मुक्कामाचे ठिकाण शोधणे, ही मुंबईसारख्या शहरात जाण्याची एक प्राथमिक समस्या आहे. महानगर म्हणून मुंबईत राहण्याचा खर्च जास्त आहे.बॅचलर्ससाठी सामायिकरण आधारावर राहण्याची किंमत अंदाजे रुपये 20000 ते 25000, जोडप्यांकरिता अंदाजे ₹ 25000 ते ₹ 45000 आणि एक मूल असलेल्या कुटुंबांसाठी ₹ 30000 ते ₹ 50000 पर्यंत जाऊ शकते.

मुंबईत परवडणारी राहण्याची सोय करणे हे खरोखर एक अवघड काम आहे. तरीही मुंबई स्वप्नांचे शहर असल्याने,दरवर्षी अनंत अशा स्थलांतरित लोकांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होते, हे विधान पिढ्यान्पिढ्याचे सत्य आहे.
Read: बॉलिवूडच्या आवडत्या अ‍ॅक्शन हिरोच्या घरात- अक्षय कुमार


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



जर आपण मुंबईत परवडणारं घर शोधत असाल तर, मुंबईत राहण्यासाठी परवडणार्‍या ठिकाणांची यादी येथे आहे.

 

1.बोरिवली

सध्याच्या रिअल इस्टेटची आकडेवारी स्पष्ट करते की बोरिवली हे मुंबईचे प्राथमिक रहिवासी क्षेत्र आहे. सीएसटीजवळ काम करणार्‍यांसाठी हे एक अचूक असे स्थान आहे कारण ट्रेनने सीएसटी ला जाण्यास फक्त 45 मिनिटे लागतात. “बागांचे उपनगर” म्हणून ओळखले जाणारे हे शहरातील एक आधुनिक आकर्षण आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालयांपासून ते रेस्टॉरंटपर्यंत बोरिवलीत सर्व काही आहे.चांगल्या सामाजिक पायाभूत सुविधांची उपस्थिती, व्यवसाय केंद्रे आणि कनेक्टिव्हिटी हे बोरिवलीची प्रगती व सर्वात परवडणारी,मुंबईत राहण्यासाठीची जागा झाली आहे. बोरिवली रेल्वे स्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे कारण ते लोकल आणि बाहेरील गाड्यांचा प्रारंभ बिंदू आहे. यामुळे वारंवार प्रवास करणाऱ्यांचा कंटाळवाणा प्रवास कमी होतो. बसेस, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा अशा अनेक पर्यायांसह हे क्षेत्र सहज उपलब्ध आहे.हे मुंबईतील स्वस्त क्षेत्रांपैकी एक आहे.

Borivali

भाडेः 1 आर के ₹ 11,000 / महिना

         1 बीएचके ₹ 15000-20000 / महिना

 जवळील असलेल्या सामाजिक सोयीसुविधा:

  • शैक्षणिक संस्था: नामदार गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल, डॉन बॉस्को हायस्कूल, बोरिवली वेस्ट मधील एम.जे. ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स
  • करमणूकः फिश पार्क, कान्हेरी लेणी
  • रुग्णालये: अ‍ॅपेक्स मल्टीस्पेशालिटी रुग्णालये
  • मॉल्स: झोन मॉल
  • उद्याने: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वीर सावरकर उद्यान

 

2.कांदिवली

पूर्वी खंडोली म्हणून ओळखले जाणारे कांदिवली, हे उत्तर मुंबईत आहे. हे उपनगरीय मुंबईत आहे आणि नवीन खरेदीदारांसाठी वेगाने वाढत असलेला परिसर म्हणून उदयास येत आहे. 1907 मध्ये बांधलेले रेल्वे स्थानक,हे  शतकपूर्वीचे जुने आहे. हे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाच्या पश्चिम मार्गावरील सर्वात व्यस्त स्थानक आहे. कांदिवलीत वृद्धांसाठी वैद्यकीय सुविधा, घरकाम करणार्‍यांसाठी स्थानिक दुकाने आणि कुटुंब आणि मित्रांसाठी करमणूक व विश्रांतीची क्षेत्रे सहज उपलब्ध आहेत.हे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळांशी चांगले जोडलेले आहे. दोन्ही विमानतळ कांदिवलीपासून अंदाजे 14 कि.मी. अंतरावर आहेत. महिंद्रा लाइफस्पेसेसने कांदिवलीमध्ये आपली उपस्थिती,चांगल्यारित्या पसरविली आहे, जे खरेदीदारांसाठी एक आदर्श स्थान आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कांदिवली मार्गे जातो,जो पश्चिम उपनगराला मध्य उपनगरांशी जोडतो. कांदिवली हे मुंबईत राहण्यासाठी परवडणारे ठिकाण आहे.
Read: भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे

Kandivali

भाडेः 1 आर के ₹ 10000-15000 / महिना

        1 बीएचके ₹ 20000-25000 / महिना

जवळील असलेल्या सामाजिक सोयीसुविधा:

  • शैक्षणिक संस्था: लेडी ऑफ रेमेडी हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल
  • करमणूक: टाईमझोन एंटरटेनमेंट प्रा. लि., किडिंग्टन
  • रुग्णालये: शताब्दी, आस्था
  • मॉल: ग्रोईलचे 101, टेंथ सेंट्रल मॉल
  • उद्याने: एवरशायीन ड्रीम पार्क

 

3.मालाड

मालाडमध्ये सूर्याखालील प्रत्येक गोष्ट एखाद्यास अक्षरशः मिळू शकते. स्ट्रीट फूडपासून पॉश हॉटेल्स पर्यंतच्या आहाराच्या बाबतीत इथे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मालाड मुख्यत: कामगार-वर्गाच्या भागाला आकर्षित करतो कारण येथे भरपूर ‘एमएनसी’चे केंद्र आहे. मालाड हे मुंबईत राहण्याचे स्वस्त घर असणारा भाग म्हणून मानला जातो. उच्च-वर्ग आणि मध्यमवर्गीय लोकांसाठी घरगुती केंद्र आणि चांगल्या निवासस्थानाची मागणी येथे वाढत चालली आहे.

मालाड हे एसव्ही रोड, लिंक रोड आणि एनएच -8 फेरीद्वारे अन्य प्रमुख ठिकाणांशी जोडले जाते. मालाड वरून, गोराई, मानोरी आणि वर्सोवासाठी फेरी सेवा मिळू शकते. शिवाय छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ मालाड पश्चिमेपासून अवघ्या 12.2 किलोमीटर अंतरावर आहे.

गोरेगाव (एचएसबीसी कॉर्पोरेट ऑफिस, लोटस कॉर्पोरेट पार्क), दिंडोशी (रिलायन्स एनर्जी आणि आर टेक पार्क) आणि अंधेरी (सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, एलडीएस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, बोस्टन हाऊस) मधील कॉर्पोरेट कार्यालये सभोवताली असल्याने मालाड वर्किंग क्लास विभाग आकर्षित करते.
Read: तुमचे घर भाडोत्री देण्यासाठीच्या काही टिप्स

Malad

भाडेः 1 आर के ₹ 10000-15000 / महिना

        1 बीएचके 15000-20000 / महिना

जवळील असलेल्या सामाजिक सोयीसुविधा:

  • शैक्षणिक संस्था: बिल्लाबोंग हाय इंटरनॅशनल स्कूल
  • करमणूकः टाइमझोन, सोमवारी बाजार दर सोमवारी जकारिया रोडजवळ
  • रूग्णालये: थुंगा, संजीवनी
  • मॉल्स: इनॉर्बिट मॉल, इन्फिनिटी मॉल
  • उद्याने: बीएमसी गार्डन, गोडझिला, अप्पर गोविंद नगर पार्क
  • कमर्शियलःकॉल सेंटर, माइंडस्पेसमध्ये आणि आसपासची केपीओ आणि कॉर्पोरेट कार्यालये

 

4.घाटकोपर

आपण मुंबईत राहण्यासाठी परवडणारी जागा शोधत असाल, तर घाटकोपर ही आहे! ही मुंबईतील सर्वात जुनी वस्ती आहे. घाटकोपर मेट्रो स्थानक हे उर्वरित मुंबईशी जोडते, जेणेकरून ते कामावर आणि प्रवेश करण्यायोग्य बनते. त्यात रहिवासी, व्यावसायिक, क्रीडा आणि शैक्षणिक संस्थांसह उत्कृष्ट सामाजिक पायाभूत सुविधा आहेत. घाटकोपर रेल्वे स्टेशन, मध्य रेल्वे मार्गाचा एक भाग आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो लाइन, मुंबई मेट्रो प्रकल्पातर्फे सुरू करण्यात आली असून या नकाशासह दुहेरी लाईन असून त्यामध्ये 12 उच्च स्थानकांसह नेहमीच्या गाड्या वापरल्या जातील. एकदा प्रकल्प संपल्यानंतर प्रवाशांना फक्त 20 मिनिटे लागतील, जी आता सुमारे 70 मिनिटे घेतात.हे मुंबईत राहण्यासाठीचे सर्वात स्वस्त क्षेत्रांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.
Read: नोब्रोकर.कॉमने, जनरल अटलांटिक कडून 30 दशलक्ष मिळवले, त्यांच्या मालिका डी मध्ये आता 80 दशलक्ष जोडले गेलेत

Ghatkopar

भाडेः 1 आर के ₹ 15000-20000 / महिना

        1 बीएचके ₹ 20000-25000 / महिना

जवळील असलेल्या सामाजिक सोयीसुविधा:

  • शैक्षणिक संस्था: गरोडिया आंतरराष्ट्रीय केंद्र
  • करमणूक: किडझानिया
  • रूग्णालये: रुबी आयकेयर
  • मॉल्स: आर सिटी मॉल
  • पार्क: एलबीएस जॉगर्स पार्क

 

5.कुर्ला

हे मुंबईचे हृदय असल्याचे म्हटले जाते आणि वेगवान पद्धतीने आपला पुनर्विकास करीत आहे. कुर्लामध्ये झोपडपट्ट्यांपासून उच्च-वर्गातील लोकांपर्यंत,सर्वच मिसळलेले आहेत. हे विमानतळ आणि रेल्वे स्टेशनशी चांगले जोडले गेलेले आहे. कुर्ला आणि आसपासच्या परिसरात अनेक दर्जेदार ठिकाणे आढळतात ज्यात दारुल उलूम मेहबूब-ए-सुभानी, साई बाबा मंदिर, होली क्रॉस चर्च, गणपती मंदिर, मस्जिद डब्ल्यू मद्रासाह मार्काजुदावा, कुर्ला आणि होली क्रॉस कॅथोलिक चर्च आणि असे आणखी काही आहेत.

Kurla

भाडेः 1 आर के ₹ 10000-15000 / महिना

        1 बीएचके 20000-25000 / महिना

 जवळील असलेल्या सामाजिक सोयीसुविधा:

  • शैक्षणिक संस्था: कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल, डॉन बॉस्को कॉलेज
  • करमणूक: स्टील वॉटर एक्वाटिक्स – नेचर एक्वेरियम गॅलरी
  • रुग्णालये: खान बहादूर भाभा महानगरपालिका जनरल हॉस्पिटल, अर्पन जनरल हॉस्पिटल, फौजिया हॉस्पिटल
  • मॉल: फिनिक्स मार्केट सिटी
  • उद्याने: सहजीवन पार्क, मॅच फॅक्टरी गार्डन

 

6.विक्रोळी

बँक, शाळा, महाविद्यालये, करमणूक उद्याने आणि व्यावसायिक उपक्रमांमुळे,या उच्च-गुणवत्तेच्या सामाजिक पायाभूत सुविधांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे शीर्षक स्थान  विक्रोळी हे आहे. सहज ऍक्सेसिबल असल्याने, मुंबईत राहण्याचे स्वस्त क्षेत्रांपैकी हे एक आहे. विक्रोळीची उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे. विक्रोळीला जोडणारे मध्यवर्ती रस्ते,लाल बहादूर शास्त्री रोड, आग्रा रोड आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे हे आहेत. जलतरण तलाव, स्पा, खाजगी चित्रपटगृहे, न्यायालये, पूर्णपणे सुसज्ज जिम, गार्डन्स, ललित जेवणाचे रेस्टॉरंट्स, यामुळे विक्रोळीतील निवासी प्रकल्पांच्या मागणीला चालना मिळाली आहे.

Vikhroli

भाडेः 1 आर के ₹ 10000-15000 / महिना

        1 बीएचके ₹ 15000-20000 / महिना

जवळील असलेल्या सामाजिक सोयीसुविधा:

  • शैक्षणिक संस्था: सेंट जोसेफ हायस्कूल, अस्मिता लॉ कॉलेज
  • करमणूक: विक्रोळी सोशल
  • रुग्णालये: ोदरेज मेमोरियल हॉस्पिटल, एल एच हिरानंदानी हॉस्पिटल
  • उद्याने: संभाजी पार्क, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर उद्यान

 

7.चेंबूर

रोजगार, सामाजिक पायाभूत सुविधा आणि औद्योगिक केंद्रांसह उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान केल्यामुळे, चेंबूर हा आदर्श निवासी परिसर बनला आहे. चेंबूर हे विमानतळापासून 15 किमी आणि जवळच्या रेल्वे स्थानकापासून 6 किमी अंतरावर आहे. हे मुंबईत राहण्याचे स्वस्त घर असणारे ठिकाण मानले जाते. लोकांचा चेंबूरला जाण्याचा महत्त्वपूर्ण उद्देश म्हणजे, त्याची असलेली जोडणी होय. हे नवी मुंबईला व मध्य मुंबईला जोडते आणि त्याव्यतिरिक्त,इथे पूर्व आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असल्याकारणाने असंख्य प्रवाश्यांसाठी हा एक फायदा आहे,ह्यामुळे त्यांचे आयुष्य थोडे सोपे होते.टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, डायमंड गार्डन आणि डॉ. आंबेडकर गार्डन अशी अनेक आकर्षणे चेंबूरमध्ये आहेत. पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भाभा अणु संशोधन केंद्र, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आणि इतर बर्‍याच कंपन्यांसह, आयटी आणि सॉफ्टवेअर हबसाठीही चेंबूर सुप्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या सर्व चाहत्यांसाठी, चेंबूरमध्ये आरके स्टुडिओ आहेत.

Chembur

भाडेः 1 आर के ₹ 10000-15000 / महिना

        1 बीएचके ₹ 25000-30000 / महिना

जवळील असलेल्या सामाजिक सोयीसुविधा:

  • शैक्षणिक संस्था: सेंट ग्रेगोरिओस हायस्कूल
  • करमणूक: कार्निवल आयमॅक्स मल्टिप्लेक्स
  • रुग्णालये: झेन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल
  • मॉल्स: के स्टार मॉल, क्यूबिक मॉल
  • उद्याने: आंबेडकर गार्डन, चिमणी गार्डन

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask