1
Marathi
comment

2024 मध्ये हैदराबाद येथे राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणं

जेव्हा भारतातील राहण्याच्या दृष्टीने सर्वाधिक सुयोग्य शहरे दाखवणाऱ्या यादी आणि लेखांचा विचार केला जातो,तेव्हा त्यात हैदराबाद नेहमीच शीर्ष 3 स्थानांमध्ये असते.माहिती तंत्रज्ञान तेजीत आल्यापासून हैदराबाद एक राष्ट्रीय पसंती बनली आहे, इन्फोसिस, मायक्रोसॉफ्ट, कॉग्निझंट आणि जेनपॅक्ट सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या शहराला त्यांचे घरच म्हटले आहे. हैदराबादचे व्यावसायिक केंद्र देशासाठी किती महत्वाचे आहे हे जाणून घेऊ इच्छित असल्यास, येथे एक मनोरंजक ट्रिव्हिया आहे – हैदराबादमध्ये सर्वाधिक विशेष आर्थिक क्षेत्रे (सेझ) आणि सर्वात मोठी कार्यरत लोकसंख्या आहे!

The Cheapest Places To Live In Hyderabad For 2020

Things we covered for you

+

स्वाभाविकच, आर्थिक क्रियाकलाप, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात विकास,हे बाहेरील लोकांना आकर्षित करतात आणि यामुळे संपूर्ण शहरातील रिअल इस्टेटच्या किंमती वाढतात. हैदराबादने गेल्या 2 दशकात हा अनुभव घेतला आहे परंतु भारतातील सर्वात मोठे महानगरांपैकी एक असूनही, हैदराबादमध्ये स्वस्त असे भाड्याने दिले जाणारे व मिळणारे पर्याय अगदी सहज भेटू शकतात. आमची खात्री आहे की 2020 मध्ये हैदराबाद येथे राहण्यासाठी, योग्य स्वस्त स्थान शोधण्यासाठी आपला शोध खाली सूचीबद्ध आहे. चुकीचे भाग शोधण्यात तुमचा वेळ वाया जाऊ नये यासाठी काळजीपूर्वक नमूद केलेल्या खालील स्थानांचा तपशील वाचा.
Read: भारतीय ग्रीष्म ऋतूसाठी,या मोहक फुलांच्या वनस्पतींसह आपल्या घराशेजारी सर्वोत्कृष्ट बाग मिळवा.


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



 

  • उप्पल

 

आपण,पूर्व हैदराबादच्या बाहेरील बाजूपासून सुरुवात करूयात,उप्पल या परिसरापासून. नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे घर म्हणून ओळखले जाणारे, उप्पल हे हैदराबादमध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम परवडणारे क्षेत्र आहे. उप्पल हे एक प्रसिद्ध आयटी हब आहे, व तर्णका आणि पोचारामसारख्या निवासी भागांना चांगले जोडलेले आहे. उप्पल एक अतिशय मैत्रीपूर्ण शेजार म्हणून पुढे आले आहे आणि अनेक निवासी प्रकल्पांमुळे तरुण व्यावसायिकांना,नोकरदारांना येथे जगण्याची संधी मिळते, यामुळे विद्यार्थी आणि स्नातकांसाठी हे हैदराबादमधील एक स्वस्त भाड्याचे क्षेत्र बनले आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 6500-8000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: लेडी फ्लॉवर कनिष्ठ महाविद्यालय, काककटिया ज्युनियर कॉलेज
  • रुग्णालये: आदित्य हॉस्पिटल, स्पार्क हॉस्पिटल, सुमिथ्रा हॉस्पिटल
  • मॉल: महालक्ष्मी मॉल, श्री हेमादुर्गा मॉल
  • उद्याने: पेड्डा चेरूव पार्क, हुडा पार्क

Uppal

 

  • सोमाजीगुडा

 

राजभवन (आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे राज्यपाल यांचे अधिकृत निवासस्थान) म्हणून प्रसिद्ध असलेले, सोमाजीगुडा हे एक शांत शेजार आहे,जे एका मोठ्या व्यावसायिक केंद्रात झपाट्याने बदलत आहे. अद्ययावत रहिवासी क्षेत्र असूनही, कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांसारख्या सुविधांवर कोणत्याही प्रकारची तडजोड न करता हैदराबादमध्ये भाड्याने मिळणाऱ्या फ्लॅटसाठी चांगल्या आणि स्वस्त जागा मिळू शकतात. मजेदार तथ्यः सोमाजीगुडा हे अर्ध्या किमीच्या अंतरामध्ये,30 दागिन्यांची दुकाने असण्यासाठी प्रसिद्ध आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 8500-9800

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: रूट्स कॉलेजियम, व्हिला मेरी कॉलेज
  • रुग्णालये: मात्रिका हॉस्पिटल, यशोदा हॉस्पिटल, झोई हॉस्पिटल
  • मॉल: जीएस मॉल, एसके महावीर मॉल
  • उद्याने: द पार्क हैदराबाद, हुसेन सागर वेस्ट पार्क

Somajiguda

 

  • मियापुर

 

आता ‘ग्रेटर हैदराबादचा’ एक भाग असलेले, मियापूर हे यादीमधील हैदराबादमध्ये राहण्यासाठी मिळणाऱ्या स्वस्त घरांसाठी एक आहे आणि यामागे एक कारण आहे! सुरुवातीला मियापूर हे ग्रामीण गाव होते.मात्र आता ते हैदराबाद मेट्रो रेल नेटवर्कचाही भाग आहे. या भागात त्याचे काही स्टेशन्स असणार आहेत. हे शहरापासून 14 मैलांच्या अंतरावर आहे परंतु हैदराबादमध्ये भाड्याने मिळणाऱ्या फ्लॅट्ससाठी, चांगल्या आणि स्वस्त जागा शोधणार्‍या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय म्हणून उदयास आला आहे.
Read: पुण्यात मालमत्ता व्यवस्थापन

1 बीएचके चे भाडे: रु. 6500-7400

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शिक्षण संस्था: दीक्षा ज्युनिअर कॉलेज, सेंट मार्टिन्स ज्युनिअर कॉलेज
  • रुग्णालये: पद्मा हॉस्पिटल्स, शिकारा हॉस्पिटल्स
  • मॉल्स: जीएस मॉल, श्रीवेन मॉल
  • उद्याने: डिप्थीश्री कम्युनिटी पार्क, श्रीला पार्क

Miyapur

 

 

  • बेगमपेट 

 

हुसेन सागर तलावाच्या अगदी उत्तरेस, बेगमपेटचा एक सुंदर परिसर आपल्याला सापडेल, ज्याचे नाव बशीर उन्निसा बेगम यांच्या नावावर आहे,जी निजामातील एकाची कन्या होती अन तिने एकेकाळी ह्या शहरावर राज्य केले होते. हे हैदराबादमधील पॉश क्षेत्रांपैकी एक आहे, आणि अशा प्रकारे आपल्या एकूण जीवनाचा खर्च चालू ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या खिशात किंचित खोल हात घालावा लागेल. परंतु येथे बरीच कार्यालये, रेस्टॉरंट्स आणि विश्रांतीची ठिकाणे आहेत हे लक्षात घेता, भाडे तुलनेने स्वस्त आहे आणि नक्कीच आपण देणार असलेल्या जास्तीचे पैसे वाचतात.

1 बीएचके चे भाडे: रु. 10,000-11,000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: महर्षि वेद विज्ञान महाविद्यालय, गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वूमेन
  • रुग्णालये: व्हीएनएन मल्टीस्पेशालिटी, विवेकानंद रूग्णालय
  • मॉल्स: बाबूखान मॉल, सेंट्रल मॉल, ओएसिस सेंटर
  • उद्याने: कुंदन बाग पार्क, उमा नगर मेन पार्क

Begumpet

 

  • अमिरपेट

 

हैदराबादच्या वायव्य दिशेकडे जाताना आपल्याला अमीरपेट नावाचे एक ठिकाण सापडते जे आपल्या खिशासाठी फारच हलके आहे, खासकरुन तरुण कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी आणि तरुण नोकरदार, ज्यांना बंजारा हिल्स आणि बेगमपेट यांच्याशी चांगला संपर्क असलेल्या क्षेत्रात रहायचे आहे. हैदराबादचे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे, आपणास येथे बऱ्याच सॉफ्टवेअर प्रशिक्षण संस्था आढळतील आणि अशा प्रकारे आयटी व्यावसायिकांसाठी,जे अधिक बचत आणि सामायिकरण आधारावर फ्लॅट मिळवू इच्छितात त्यांच्यासाठी हैदराबादमधील एक स्वस्त भाड्याचे क्षेत्र आहे!
Read: फेस मास्कचे महत्त्व आणि घरी फेस मास्क कसा तयार करावा

1 बीएचके चे भाडे: रु. 7500-8600

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: प्रियदर्शनी पदवी महाविद्यालय, हर्षिनी महाविद्यालय
  • रुग्णालये: एस्टर प्राईम हॉस्पिटल, वेलनेस हॉस्पिटल, चाल्ला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
  • मॉल:द चेन्नई शॉपिंग मॉल, चावलास मॉल.
  • उद्याने: वेंगलराव नगर कॉलनी पार्क, सिद्धार्थ नगर पार्क

Ameerpet

 

  • माधापूर

 

भरपूर अशा पायाभूत सुविधा आणि त्या भागाच्या आसपास सॉफ्टवेअर कंपन्यांची असलेली मोठी संख्या,ह्यामुळे भाड्याने फ्लॅट्स घेताना सर्वात जास्त पसंती माधापूरला मिळते. या भागाच्या हृदयाला ‘हायटेक सिटी’ असे म्हणतात, लोकप्रियतेत आणि रिअल इस्टेटच्या किंमतींमध्ये हळू हळू वाढ झाल्यापासून हे दिसून येत आहे. जर आपण एक काम करणारे व्यावसायिक असाल तर माधापूर हे आपल्या यादीतील सर्वात वरचे एक क्षेत्र आहे, आणि आम्ही आपल्याला खात्री देऊ शकतो की हैदराबादमध्ये राहण्यासाठी आपल्याला एक तुलनेने परवडणारी आणि स्वस्त भाड्याची जागा मिळेल.

1 बीएचके चे भाडे: रु. 13,500-14, 000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: श्री वेंकटेश्वरा कॉलेज ऑफ फार्मसी, अर्बन कनिष्ठ महाविद्यालय
  • रुग्णालये: मेडिकव्हर हॉस्पिटल्स, ओक्रीज हॉस्पिटल्स
  • मॉल: इनॉर्बिट मॉल, बेस्ट फॅशन आउटलेट मॉल
  • उद्याने: अयप्पा सोसायटी पार्क, गायत्री नगर पार्क

Madhapur

 

  • बंजारा हिल्स

 

समृद्ध वारसा आणि भूतकाळाचे ओझे असलेले, बंजारा हिल्स हे निझामाच्या निवडीचे ठिकाण बनून ते शहरी निवासी आणि व्यावसायिक केंद्रात बदलले आहे. 14 वेगवेगळ्या मुख्य रस्त्यांद्वारे विभक्त केलेले, हे क्षेत्र श्रीमंत परिसर आणि स्थलांतरितांचे आकर्षण केंद्र बनले आहे, जे शहरातील सर्व चांगल्या हँग-आऊट ठिकाणांजवळ,राहण्यासाठी एक मोठे अपार्टमेंट सामायिक करणे पसंत करतात. मनोरंजक वस्तुस्थिती: 2011 मध्ये इकॉनॉमिक टाइम्सचा अंदाज होता की संपूर्ण बंजारा हिल्सच्या मालमत्तेची किंमत ही जवळपास 20 अब्ज डॉलर्स इतकी आहे! हे सर्व असूनही, हे हैदराबादमधील राहण्यासाठी सर्वोत्तम परवडणारे क्षेत्र म्हणून मानले जाऊ शकते.
Read: आपण कंटेनर घर तयार करण्यास इच्छित आहात का? फायदे व तोटे जाणून घेण्यासाठी वाचा!

1 बीएचके चे भाडे: रु. 10,000-11,000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: पीएजीई ज्युनियर कॉलेज, लखोटिया कॉलेज ऑफ डिझाईन
  • रुग्णालये: केअर हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल
  • मॉल्स: जीव्हीके वन मॉल, सिटी सेंटर मॉल
  • उद्याने: जलगम वेंगलराव पार्क, कमलापुरी पार्क

Banjara hills

 

  • माणिकोंडा

 

लॅन्को हिल्स टेक पार्कसाठी प्रसिद्ध असलेल्या माणिकोंडामध्ये,हैदराबादमधील माणिकोंडा जवळ भाड्याने घेतलेल्या फ्लॅटसाठी चांगली आणि स्वस्त जागा असणाऱ्या, व व्यावसायिक केंद्रांपासून दूर जाऊ इच्छित नसलेल्या लोकांसाठी,इथे बरीचशी आवड निर्माण होते. टेलिकॉन नगर ते बाह्य रिंगरोड दरम्यान पडणारा, मणिकोंडा देखील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच राष्ट्रीय महामार्ग 4, 7 आणि 9 पर्यंत थेट जोडणारा रस्ता उत्तम कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या सर्व बाबींमुळे हे राहण्यासाठी एक उत्तम परिसर बनते आणि तेथे बरीच,हैदराबादमधील परवडणारी घरे भाड्याने उपलब्ध आहेत.

1 बीएचके चे भाडे: रु. 9000-10,500

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: साधना कनिष्ठ महाविद्यालय, मनु पॉलिटेक्निक महाविद्यालय
  • रुग्णालये: प्रेराणा हॉस्पिटल, प्रीतम हॉस्पिटल
  • मॉल: ललित मॉल, श्री निलयम
  • उद्याने: पंचवटी पार्क, एलआयसी कर्मचारी कॉलनी पार्क

Manikonda

 

  • शमशाबाद

 

हैदराबादमधील परवडणारी,आणि राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे वळ असल्याकारणाने,खासकरुन हैदराबादच्या दक्षिणेकडील भागातील लोकांसाठी,शमशाबाद हा एक उत्तम पर्याय आहे. परिसरातील मध्यभागी स्थित सिम्बायोसिस आणि टाटा विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या विविध शैक्षणिक संस्थांमुळे या भागात बरीच तरुण गर्दी दिसत आहे. जर आपण यापैकी काही सन्मानित महाविद्यालयांमध्ये प्रवेश करण्यासाठी तितकेच उज्ज्वल असाल, तर पुढच्या घरासाठी शमशाबादकडे नक्की पहा!

1 बीएचके चे भाडे: रु. 8500-9600

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, टाटा विद्यापीठ
  • रुग्णालये: लिम्स हॉस्पिटल्स, ट्रायडंट सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल
  • मॉल: रामास्वामी अँड सन्स
  • उद्याने: इराम गार्डन, पंचवटी पार्क

Shamshabad

 

 

  • ज्युबिली हिल्स

 

हायटेक पार्कच्या सेंट्रल आयटी हबपासून काही किलोमीटर अंतरावर वसलेले ज्युबिली हिल्स, हा निवासी हबचा सर्वाधिक लोकप्रिय भाग आहे. राक्षस हवेली आणि टॉलीवूड सुपरस्टार घरांसाठी प्रसिध्द असलेले हे ठिकाण, तरुण नोकरदारां आणि कुटूंबासाठी राहण्याचे उत्तम असे क्षेत्र आहे. व्यावसायिक रीअल इस्टेटमध्ये दर आकाशाला भिडलेले असूनही, आम्ही असे सुचवितो की हैदराबादमध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि स्नातकांसाठी स्वस्त भाड्याने मिळणारी लोकल जागा इथे शोधणे अजूनही एक चांगली शक्यता आहे,कारण येथील परिसरात निवासी प्रकल्पांमध्ये वाढ झाली आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 8900-10000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: सेंट मेरीज ज्युनियर कॉलेज, नारायणा ज्युनियर कॉलेज
  • रुग्णालये: अपोलो रुग्णालये, एव्हिस रुग्णालये
  • मॉल्स: अल्काझर मॉल, अ‍ॅक्सस 2 फ्यूचर ज्युबिली मॉल
  • उद्याने: कासू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान, ज्युबिली हिल्स पार्क, जपानी गार्डन

Jubilee Hills

बरं तर मग आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, की जर आपण 2020 मध्ये हैदराबादमध्ये राहण्यासाठी एक स्वस्त आणि परवडणारी जागा शोधत असाल तर ही यादी नक्कीच आपला बराच वेळ आणि पैशाची बचत करेल! आपण नवाबी-शहराकडे, त्याचे उत्तम अन्न, दर्जेदार शिक्षण किंवा चांगल्या आयटी उद्योगाच्या नोकरीसाठी जात आहात का, आम्ही आपणास हार्दिक शुभेच्छा देतो आणि आशा करतो की आपण हैदराबादमध्ये आनंदाने आणि खिशाला परवडणाऱ्या जागी वास्तव्य कराल.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask