2
Marathi
comment

2024 मध्ये बंगळुरूमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे

पूर्वी बेंगलोर म्हणून ओळखले जाणारे बंगळुरू हे भारतातील सर्वात मोठे आयटी हब आहे. खरोखर हे महानगर, अनेक संस्कृती, धर्म आणि राष्ट्रीयत्व यांचे एक उकळते असे भांडे आहे. मुंबई आणि दिल्लीनंतर हे भारतातील तिसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे, ज्यात 9 दशलक्षाहून अधिक लोक दक्षिणेकडच्या शहराला आपले घर म्हणत आहेत! भव्य अशी मंदिरे, उत्तम नाईटलाइफ, गोंधळ उडवणारी गर्दी आणि अविरत असणारी वाहतूक कोंडी यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये, जगातील सर्वात उच्च शिक्षित असा वर्कफोर्स आहे.

The Cheapest Places To Live In Bengaluru For 2020 

Things we covered for you

+

आज हे शहर दक्षिण भारताचा ‘मुकुट दागिना’ आहे, आणि येथील जगण्याची किंमत जास्त म्हणून प्रसिद्ध आहे. जगातील कोणत्याही आयटी हबप्रमाणेच, एकदा मोठ मोठ्या एमएनसी कंपन्या शहरांमध्ये आल्यावर, त्या मोठ्या ब्रँडला आकर्षित करतात आणि अशा प्रकारे रिअल इस्टेटची किंमत वाढवतात. जर आपण बंगळुरुमध्ये राहण्यासाठी स्वस्त घरांची यादी शोधत असाल, तर खालील सूचीची आपल्याला नक्कीच खूप मदत होईल!

 

  • मल्लेश्वरम

2020 मध्ये बंगळुरुमध्ये राहण्यासाठी सर्वात स्वस्त असा हा पर्याय, यादीतील एक उत्तम नियोजित परिसर व स्वस्त ठिकाण देखील. शहराच्या पश्चिम उपनगरात स्थित, मल्लेश्वरम हे सेंट्रल टिफिन रूम आणि वीणा स्टोअर्ससारख्या काही उत्तम वारसा असलेल्या कॅफेसाठी ओळखले जाते. राजाजीनगर, शेषाद्रिपुरम तसेच केम्पेगौडा बस टर्मिनस यासारख्या क्षेत्राशी याचा चांगला संपर्क आहे.
Read: 2024 मध्ये पुण्यात राहण्यासाठी परवडणारी ठिकाणे


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



1 बीएचके चे भाडे: रु. 7200-8000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: मल्लेश्वरम लेडीज असोसिएशन फर्स्ट ग्रेड, शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालय
  • रुग्णालये: मनिपाल हॉस्पिटल, के. सी. जनरल हॉस्पिटल
  • मॉल: मंत्री स्क्वेअर मॉल
  • उद्याने: मल्लेश्वरम सार्वजनिक उद्यान, सँकी टँक

Malleshwaram

 

  • केंगेरी

पश्चिम बंगळुरुमध्ये वसलेले, केंगेरी हे शहरातील उपग्रह शहर म्हणून प्रसिद्ध आहे कारण सरकारने केलेला विकास,सायबर कॅफे आणि टेलि बूथची मोठ्या संख्येने उपस्थिती इथे आहे.ह्या परिसराला परवडण्याजोगे तसेच मैसूर रोड आणि बाह्य रिंग रोडशी चांगले संबंध जोडण्याचा बहुमान मिळतो. बंगळुरुमध्ये परवडणारी व पश्चिम बंगळुरुमधील अशी ही जागा काही लोकांना आपल्याकडे आकर्षित करते, लोकसंख्या वाढत असल्यामुळे, लोकांसाठी या भागात उत्तम रेस्टॉरंट्सची गर्दी झाली आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 8700-10000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्थाः केंगेरी प्री युनिव्हर्सिटी कॉलेज, केंगेरी फर्स्ट ग्रेड कॉलेज
  • रूग्णालये: पी.एम संतोषा कॉलेज, एच.के हॉस्पिटल
  • मॉल: गोपालन आर्केड मॉल, गोपालन लिगेसी मॉल
  • उद्याने: केंगेरी सॅटेलाईट टाऊन पार्क, के. एस. अश्वथ मेमोरियल चिल्ड्रन पार्क

Kengeri

 

  •  सर्जापूर

शहराच्या दक्षिणेकडच्या दिशेने जाताना बंगळुरुमध्ये राहण्यासाठी सर्जापूर नक्कीच एक स्वस्त परवडणारी जागा आहे. व्हाइटफील्ड आणि इलेक्ट्रॉनिक सिटी सारख्या व्यवसाय केंद्रांसह सर्जापूरमध्ये उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे. आपण एक तरुण नोकरदार असल्यास किंवा आपल्याला मल्टिप्लेक्स, मॉल्स, सुपरमार्केट आणि फॅन्सी रेस्टॉरंट्समध्ये हँग आउट करण्यास आवडत असल्यास, येथे रहाण्यासाठी हा एक उत्तम परिसर आहे! या परिसरातील काही सर्वोत्कृष्ट मॉल्स आणि कार्यालये असल्याकारणाने, लोक असे म्हणू शकतात की बेंगळुरूमधील आयटी व्यावसायिकांसाठी,स्वस्त भाड्याच्या राहणीसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 9500-11,000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: एएलटी प्रशिक्षण महाविद्यालय, सेंट जेरोमस पीयू अँड डिग्री कॉलेज.
  • रूग्णालये: कोलंबिया एशिया हॉस्पिटल, स्वर्णमुखी हॉस्पिटल
  • मॉल्स: टोटल मॉल, मार्केट स्क्वेअर
  • उद्याने: इबलूर पार्क, केपीसीएल लेआउट चिल्ड्रन्स पार्क

Sarjapur

Read: हिवाळ्यात आपल्या घराला उबदार कसे ठेवावे

 

  • होस्कोटे

बंगळुरुमध्ये होस्कोटे जवळ भाड्याच्या फ्लॅट्ससाठी, चांगल्या आणि स्वस्त जागेसाठी एक चांगला पर्याय म्हणून उदयास येत आहे, निओ बेंगलुरू नावाच्या ठिकाणी वसलेले होस्कोटे हे एक नवीन स्थान आहे. जरी हा परिसर राष्ट्रीय महामार्ग 4 आणि 207 च्या छेदनबिंदूवर आहे, तरीही होस्कोटे आयटी हब आणि व्हाइटफिल्ड स्टेशनसह भव्य कनेक्टिव्हिटी प्रदान करते. या परिसरातील फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी, 2020 वर्ष हा उत्तम काळ आहे कारण जवळपासच्या विकास प्रकल्पांना आगामी काळात बाजारपेठ फुगती राहणार आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 8500-10000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: महादेव पीयू महाविद्यालय, शासकीय प्रथम श्रेणी महाविद्यालय, होस्कोटे
  • रुग्णालये: ओव्हम वूमन एंड चाईल्ड स्पेशालिटी हॉस्पिटल
  • मॉल: नारद एंटरप्रायजेस, फॅरीको रेशीम केंद्र
  • उद्याने: होस्कोटे पार्क

Hoskote

 

  • बीटीएम लेआउट

बोम्मनहल्ली, तावरकेरे आणि माडीवाला लेआउट उर्फ बीटीएम लेआउट हे दक्षिण बंगळुरूमधील एक लोकप्रिय ठिकाण आहे, हे अंशतः आधुनिक पायाभूत सुविधांमुळे, चांगले कनेक्टिव्हिटी असलेले क्षेत्र आहे, आणि काहीसे म्हणजे आयटीपीएल आणि इलेक्ट्रॉनिक शहराच्या जवळचे आहे. बीटीएम लेआउटची देखील बंगळुरू शहर रेल्वे स्थानकापासून 15 किमीपेक्षा कमी अंतरावर संपर्क आहे. बीटीएम लेआउटमध्ये बरीच कोचिंग केंद्रे आहेत आणि जर आपण विद्यार्थ्यांसाठी आणि बॅचलर्ससाठी बंगळुरूमध्ये स्वस्त भाड्याच दिलेली जागा शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 12,000-13,000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: अलायन्स युनिव्हर्सिटी, एम.ई.एस. कॉलेज
  • रुग्णालये: लाइफ सायकल हॉस्पिटल, गंगोत्री हॉस्पिटल
  • मॉल: वेगा सिटी मॉल, गोपालन मॉल
  • उद्याने: मायको लेआउट पार्क, बीटीएम पार्क

BTM Layout

Read: आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने

 

  • हेब्बल

हेब्बल तलावासाठी परिचित असलेले हे ठिकाण, बंगळुरु शहरातील येणाऱ्या काळातले सर्वात वरचे रहिवासी क्षेत्र बनत आहे.हा परिसर अनेक निवासी प्रकल्पांनी भरलेला आहे,जो आपल्या बजेटच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही किंमतीसाठी आपल्याला एक चांगला पर्याय देतो. इतर व्यावसायिक आणि शैक्षणिक केंद्रांशी चांगले जुळलेले, बंगळुरुमध्ये आपण भाड्याने परवडण्याजोगे घरे शोधत असाल, तर हेब्बल हे निश्चितच एक ठिकाण आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 8500-9500

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: आयआयबीएस कॉलेज, डेअरी सायन्स कॉलेज, हेब्बल.
  • रूग्णालये: बेंगलोर बॅप्टिस्ट हॉस्पिटल, कोलंबिया एशिया हॉस्पिटल
  • मॉल्स: एस्टीम मॉल, सिटी सेंटर मॉल
  • उद्याने: हेब्बल लेक पार्क, आनंद नगर पार्क

Hebbal

 

  • चांदापुरा

राष्ट्रीय महामार्ग (एनएच 7) च्या जवळपास असलेले, आणि बंगळुरूमध्ये राहण्यासाठी सर्वात स्वस्त ठिकाण शोधण्यासाठी, एक चांगला पर्याय म्हणून उदयास आला आहे, खासकरून जर आपण इलेक्ट्रॉनिक सिटी आणि शहरातील आयटी हब जवळ असाल तर. 2021 मध्ये या भागात नम्मा मेट्रो सुरू होणार आहे. चांदापुरामध्ये परवडणारे फ्लॅट शोधण्याची आता योग्य वेळ आली आहे कारण कुटुंब आणि तरुण व्यावसायिकांना येणाऱ्या काळात,चांगल्या परिसरात सहज सवलत मिळू शकेल.

1 बीएचके चे भाडे: रु. 8200-9200

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्थाः लॉरवेन कॉलेज ऑफ सायन्स अँड मॅनेजमेंट, तपस्या पीयु कॉलेज
  • रुग्णालये: आत्रेय हॉस्पिटल
  • मॉल: एसआरटी मॉल
  • उद्याने: केएचबी सूर्य नगर पार्क, नाल्लाप्पा नर्सरी

Chandapura

 

  • व्हाइटफील्ड

डी. एस. व्हाइटच्या नावाने ओळखले जाणारे हे क्षेत्र एकेकाळी सत्य साई बाबा ह्यांचा आश्रम ‘ब्रिंदावन’साठी प्रसिद्ध होते. तथापि, आज, व्हाइटफिल्डमध्ये पसरलेल्या आंतरराष्ट्रीय ब्रांड्स आणि मॉल्सच्या भारांसह निवासी आणि व्यावसायिक केंद्रे असलेले हे एक गजबजलेले क्षेत्र आहे.इथे आयटीच्या भरभराटीचा अनुभव आलेला आहे आणि अशाप्रकारे किरकोळ रिअल इस्टेटमध्ये तेजी आहे. 1 बेडरूमच्या फ्लॅटची भाड्याची किंमत पाहता आपणास आढळेल की, बरीच महत्त्वाची कार्यालये जवळ काम करण्यासाठी असताना ही किंमत स्वस्त आहे. एकंदरीत, आयटी प्रोफेशनल्ससाठी व्हाईटफील्ड ही बंगळुरू मधील स्वस्त अशा भाडोत्री क्षेत्रांपैकी एक आहे.
Read: फ्रँकिंग शुल्क म्हणजे काय?

1 बीएचके चे भाडे: रु. 12,000-14, 500

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शिक्षण संस्था: दीक्षा शाळा, एमव्हीजे पीयु कॉलेज
  • रुग्णालये: श्री सत्य साई उच्च माध्यमिक विज्ञान संस्था, मनिपाल हॉस्पिटल
  • मॉल्स: फोरम नेबरहुड, पार्क स्क्वेअर मॉल, फिनिक्स मॉल.
  • उद्याने: नल्लूरहल्ली पार्क, इनर सर्कल म्युनिसिपल पार्क

Whitefield

 

  • जयनगर

जयनगर हे आश्चर्यकारक खाद्य संस्कृती, सुपरमार्केट आणि ब्रूअरीज शोधणार्‍या लोकांसाठी सर्वात परवडणारे क्षेत्र आहे. काही वर्षांपूर्वी डीएनए बंगळुरूने जयनगरचे नाव शहरातील ‘मोस्ट लिवेबल’ म्हणून ठेवले! योग्य मालमत्ता कोठे शोधायची हे आपल्याला माहित असल्यास, जयनगर अजूनही बंगळुरूमध्ये राहण्यासाठी एक परवडणारी जागा आहे. वेगवेगळ्या व्यावसायिक केंद्रांच्या जवळपास राहण्यास मिळणे,हे जयनगरमधील परवडणार्‍या फ्लॅटमध्ये राहण्याचा एक अतिरिक्त फायदा आहे.

1 बीएचके चे भाडे: रु. 10,700-12,000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शैक्षणिक संस्था: आयबीएमआर आयबीएस कॉलेज, नोबल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स
  • रुग्णालये: मनिपाल रुग्णालय, सागर रुग्णालये
  • मॉल्स: बेंगलोर सेंट्रल, हाय स्ट्रीट पार्क
  • उद्याने: जयनगर पार्क, माधवन पार्क, राणाधीरा कांतीरावा पार्क

Jayanagar

  • इंदिरानगर

बंगळुरूमधील एक पॉश क्षेत्र, ंदिरानगर हे शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृह, ब्रूवरीज आणि आयटी कंपन्यांपर्यंत सर्वकाही गोष्टींसाठी एक उत्कृष्ट ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. जर आपण असा विचार करीत असाल कि तरी ते लोकांच्या बंगळुरुमधील स्वस्त आणि परवडणार्‍या यादीमध्ये का आहे, तर मग तसे आश्चर्यचकित होऊ नका! जर आपल्याला सर्वोत्तम हँगआउट ठिकाणी,सर्वोत्तम पायाभूत सुविधा आणि निकटता हवी असेल,तर इंदिरानगरमध्ये भाडोत्री, तुलनेने स्वस्त फ्लॅट शोधणे इतके अवघड नाही!

1 बीएचके चे भाडे: रु. 13,500-15000

शेजारी असलेल्या सामाजिक सुविधा

  • शिक्षण संस्था: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, इंदिरानगर इव्हनिंग महाविद्यालय
  • रुग्णालये: लाइफ सायकल इंदिरानगर हॉस्पिटल, चिन्मय हॉस्पिटल, रश्मी हॉस्पिटल
  • मॉल: खेनी प्लाझा, केपी स्क्वेअर
  • उद्याने: वुड पार्क, इंदिरानगर पार्क

Indiranagar

बरं तर मग, आपल्याकडे आता सर्व आहे! आम्ही निश्चितपणे आशा करतो की बंगळुरुमध्ये राहण्यासाठी स्वस्त आणि परवडणार्‍या ठिकाणांचा आपला शोध येथे संपला आहे! बाहेर जाण्यापूर्वी आणि भाड्याने घरे आणि सदनिका शोधण्याआधी, सद्य परिस्थितीबद्दल एकाधिक स्त्रोतांसह तपासणी करणे,हे नेहमी लक्षात ठेवा. आशा आहे की आपणास आपल्या आवश्यकतेनुसार योग्य असे एक स्थान मिळेल आणि नम्मा बंगलुरूमध्ये आपण मुक्काम कराल.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask