“लोहरी”-भारतीय हिवाळी उत्सवांचे विज्ञान आणि महत्त्व

लोकप्रिय समजाच्या उलट, ‘लोहरी’ हा उत्तर भारतीय प्रदेशाचा,मुख्यतः पंजाबचा उत्सव नाही,तर दक्षिणेकडील प्रदेशातही पोंगल आणि मकर संक्रांती यासारख्या नावांनी साजरा केला जातो. ही एक वैज्ञानिक घटना देखील आहे,कारण ती पूर्णपणे खगोलशास्त्र आणि विज्ञानाच्या क्रांतीवर आधारित घटना आहे ,जी धर्म अज्ञेयवादी आहे. मुळातच, हे सूर्याचं पुनरुत्थान किंवा उत्तर गोलार्धातील परतताणाचा उत्सव आहे ,आणि योगा योगाने तो पिक कापणी हंगामाच्या वेळेस येतो.

भारतातील शीख आणि हिंदू लोक मोठ्या प्रमाणात ‘लोहरी’ हा उत्सव साजरा करतात, हे हिवाळ्याचा शेवट असल्याचे दर्शवते.

मकर संक्रांतीपूर्वीच्या रात्री, हा उत्सव साजरा केला जातो.मुख्यतः उत्तर भारतीय प्रदेशात मोठ्या उत्साहामध्ये आणि जोशात साजरा केला जातो.वर्षातील अनेक हिंदू उत्सवांपैकी ,पहिला असलेल्या लोहरी उत्सवाला ,एक खास स्थान शेतकरी समुदायात आहे,कारण तो शेतकऱ्याच्या पिक कापणीचा उत्सव आहे.

थोर व्यक्ती ‘दुल्ला भट्टी’

असंख्य पौराणिक कथांनुसार,भरपूर थोर व्यक्ती लोहरी उत्सवाशी निगडित आहेत, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आणि मनोरंजक आहे,”दुल्ला भट्टी”.दुल्ला भट्टी हे एक लोकप्रिय स्वरूपाचं व्यक्तीमत्व होतं, तो रॉबिनहुडला मिळता जुळता होता, त्यामुळे स्थानिक गरिबांमध्ये तो त्यांचा नायक बनला.पौराणिक कथांमध्ये घडतं तसं, एकदा त्याने एका कुमारिकेला पुरुष गुंडांकडून वाचवले आणि तिचा स्वत: च्या मुलीप्रमाणे सांभाळ करून, काळजी घेतली.

READ  लॉकडाउन नंतर ऑफिसला परत जाताय?तिथे सुरक्षित कसे रहायचे, ते पाहूयात

दुल्ला भट्टी, या व्यक्तिमत्वावर अनेक विनोदी लोकगीते आहेत ,जे त्याचे वैभव आणि त्याच्या यशाची आठवण करून देतात.लोहरी उत्सवादरम्यान, शेजार पाजारातील मुलं ,लुटीच्या स्वरूपात सर्व घरांमधून मिठाई गोळा करतात ,जी नंतर प्रथम अग्नीला/शेकोटीला अर्पण केली जाते आणि उर्वरित “प्रसाद” म्हणून वाटून दिला जातो.

उत्सवाचा वेळ

Lohri celebration

Picture Courtesy – rgyan

लोक एकत्र जमतात,अग्नी/शेकोटी पेटवतात, पॉपकॉर्न, शेंगदाणे, रीवारी आणि गजक (पारंपारिक हिवाळी मिठाई) मित्र, शेजारी आणि नातेवाईकांना वितरीत करतात.उत्तर भारतात, नवविवाहित दाम्पत्य किंवा कुटुंबात नवीन जन्माला आलेल्या मुलांसाठी लोहरीचे विशेष महत्त्व आहे ,कारण कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक एकत्र जमुन त्यांचा पहिला लोहरी उत्सव साजरा करतात. ह्यादिवशी तीळाचा भात खाणे देखील पारंपारिक आहे जे की गूळ, तिल आणि तांदूळ एकत्रित करून बनवले जाते.

मनोरंजक गोष्ट म्हणजे,असाही एक समज आहे कि, लोहरीची रात्र वर्षाची सर्वात थंड रात्र असते, त्यानंतर सर्वात मोठी रात्र आणि सर्वात लहान दिवसही. सर्वात थंड रात्र असल्याकारणाने लोक शेकोटी पेटवतात आणि त्याभोवती वेळ घालवतात. संध्याकाळच्या वेळेला लोक मोकळ्या जागेमध्ये जमा होतात आणि लाकडी, शेणाच्या गोवऱ्या ,ऊस गोळा करून पेटवतात.

READ  आपले घर छान बनविण्यासाठी,सजावटीचे 5 उपाय

या अग्नी पेटवण्यामागे काही धार्मिक मूल्य देखील आहेत, सभोवतालच्या पिकांसाठी,अनुरुप वातावरणासाठी सन्मानचिन्ह म्हणून आणि चांगल्या कापणीसाठी आभार मानण्याचं ,ते एक प्रतीक आहे.

बऱ्याच पारंपारिक मिठाया अग्नीला अर्पण केल्या जातात.पंजाबी लोकनृत्य आणि गाणे ,या उत्सवाचे ठळक मुद्दे आहेत,आणि चांगल्या मेजवानीसह हा उत्सव संपुष्टात येतो.

Found Interesting Please Share