HomePackers and MoversGuidesनवीन शहरात जात आहात? जीवन सुलभ करण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे!

नवीन शहरात जात आहात? जीवन सुलभ करण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे!

calendar icon

January 31, 2025 12:00 AM

author

Nithin

Senior Editor

Category

Packers and Movers Tips

Tag

Moving Tips

Views

2.7K Views

नवीन शहरात जाणे, नोकरीसाठी असो किंवा फक्त नवी सुरुवात करण्यासाठी असो,नेहमीच उत्साहपूर्ण आणि धडकी भरवणारं असतं.शहराला भेट देणे आणि शहरात राहणे या दोन गोष्टी खूप वेग वेगळ्या आहेत.ज्यांना नवीन शहरात जायचे आहे त्यांनी फक्त खाली दिलेल्या मुद्द्यांचं अनुसरण कराव.हे आपलं नवीन ठिकाणी जाणे सुलभ करेल आणि संपूर्ण प्रक्रिया कमी तणावपूर्ण बनवेल. स्वतः संशोधन करा आपण नवीन शहरात जाण्यापूर्वी,ज्या शहराकडे जात आहात त्याबद्दल योग्य प्रमाणात संशोधन करणे,अती महत्वाचे आहे.जर तेथे आपले मित्र किंवा कुटूंबातील कोणी सदस्य असतील,तर तेथे राहण्यासाठीचा खर्च किती असेल, आपल्याला जगण्यास आवश्यक असलेल्या गोष्टींसाठीचा भाव तिथे काय आहे,आणि हे आपल्याला आपले बजेट बनविण्यास मदत करेल.अशा इतर गोष्टी शोधण्यासाठी त्यांच्याशी बोला,आपल्याला तिकडे राहण्यासाठी अजून काही चांगल्या अतिरिक्त जागा सुचविण्यासही त्यांना सांगू शकता.परंतु, आपण राहण्यासाठी ज्या जागेची निवड केली आहे त्यासाठी बजेटचे नियोजन करणे फार महत्वपूर्ण आहे,जेणेकरून ती आपल्या बजेटमध्ये फिट बसेल. Moving to A New City? Here’s What You Need to Do to Make Life Easier   आपल्या नोकरीचा विचार करा आपल्याकडे एखादी नोकरी असल्यास,ती कोणत्या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला किती पैसे देतात,ते पहा.राहण्यासाठी आपल्या ऑफिसच्या सभोवतालच्या क्षेत्राकडे पाहणी करा, व कामाच्या जवळ राहणे आणि भाड्यावर अधिक खर्च करणे किंवा,एखाद्या चांगल्या शेजारमध्ये राहणे आणि प्रवासासाठी खर्च करणे,यातून कोणता पर्याय योग्य राहील ते पहा.तसेच बचत करण्यासाठीही आपल्याकडे पैसे शिल्लक असणे आवश्यक आहे, हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. जर आपल्याकडे नोकरी नसेल तर, स्वस्त घराचा पर्याय शोधा; आपल्याला शक्य तितक्या काळासाठी आपले पैसे टिकवणे आवश्यक आहे. Moving to A New City? Here’s What You Need to Do to Make Life Easier आपल्याला किती लवकर घर शोधण्याची गरज आहे? जेव्हा आपल्याला नवीन कंपनीत नवीन शहरात कामावर घेतले जाते, तेव्हा ते आपल्याला काही दिवस, आठवडे किंवा महिन्यासाठीसुद्धा राहण्यासाठी घर देतात.कंपनीचे धोरण काय आहे ते शोधा.आपण मित्र आणि नातेवाईकांकडे देखील तपासू शकता,त्यांच्याकडे आपल्यासाठी एखादी खोली असल्यास त्यांना विचारू शकता. हा एक चांगला पर्याय आहे,कारण ह्यामुळे आपल्याला आपले आवडीचं घर निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.आपण नवीन ठिकाणी जाताच,तिथे नवीन घरात जाणे कदाचित,थकवणारं आणि त्रासदायक वाटू शकेल.सोयी,सुख- सुविधा, शेजार इत्यादी गोष्टी तपासण्यासाठी तुम्हाला एकदा तरी नवीन जागेवरील घराला भेट द्यावी लागेल. Moving to A New City? Here’s What You Need to Do to Make Life Easier आपण घर शोधण्यास कोठे सुरूवात करता? नवीन शहराबद्दल, आपली नोकरी कोठे आहे आणि शहरात कोठे राहायचे आहे, याबद्दल आपल्याला चांगली कल्पना असल्यास घर शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 'ऑनलाइन पोर्टल' किंवा 'रिअल इस्टेट रेंटल' अ‍ॅपद्वारे.आपल्यासाठी,दिल्ली- एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, पुणे आणि हैदराबादमधून निवडण्यासाठी नोब्रोकरकडे 1000 पेक्षा जास्त पर्याय आहेत. नोब्रोकरकडे रिलेशनशिप मॅनेजर देखील आहेत, जे तुम्हाला घराच्या संपूर्ण शोधासाठी मदत करतील.ते तुमची आवश्यकता लक्षात घेतील, तुम्हाला आवडीच्या घरांचे पर्याय पाठवतील, तुम्ही आल्यावर घराच्या भेटीचे वेळापत्रक ठरवतील, तुम्हाला तज्ज्ञ लोकल-आधारित माहिती देतील आणि तुमच्या वतीने भाडे ठरवण्यासाठीसुद्धा चर्चा करतील. आपल्याला घरात काय शोधण्याची आवश्यकता आहे? जर घर शोधण्याची ही आपली पहिलीच वेळ असेल,तर आपण भाड्याने घर घेण्यापूर्वी आपल्याला घरात नेमकं काय पाहिजेल ते ठरविणे आवश्यक आहे.आपण अविवाहित असल्यास आणि आपल्या कुटुंबासह असल्यास, आपल्या गरजा बदलू शकतात.आपल्याला आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी घराची आवश्यकता असल्यास,हा लेख आपल्याला नक्कीच मदत करेल. आपल्याला फक्त आपल्यासाठी घराची आवश्यकता असल्यास, नंतर आपल्याला घरात काय हवे आहे याबद्दल कल्पना करण्याचा प्रयत्न करा, जसे की -
  • फर्निचर (पूर्ण सुसज्ज, अर्ध-सुसज्ज किंवा फर्निचर नसलेले)
  • पार्किंगची जागा (आपल्याला गाडी किंवा बाईक पार्किंगची आवश्यकता आहे का, आपण वाहन खरेदी करीत असाल किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहणार)
  • सुरक्षितता (आपल्याला नोब्रोकरहुड सारख्या सुरक्षितता कॅमेरे आणि स्मार्ट सुरक्षा अॅप्स किंवा फक्त एक सुरक्षा रक्षक आवश्यक आहे)
  • आपल्याला 24/7 वीज आणि वाय-फाय ची आवश्यकता आहे (आपण घरातून काम करत असल्यास, हे महत्वाचे आहे)
  • आपल्याला किती जागा हवी आहे
  • परिसरामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात आणि असे बरेचकाही.
  आपले घर साफ करण्यास प्रारंभ करा बऱ्याच वर्षांपासून आपण गोळा करीत असलेल्या सर्व अनावश्यक गोष्टींपासून मुक्त होण्याची वेळ आता आली आहे.आपल्याला केवळ आवश्यक असलेल्याच वस्तू ठेवणं,आणि अनावश्यक वस्तू देऊन टाकणे/ विक्री करणे गरजेचं आहे.आपण दुसर्‍या शहरात जात असल्यास, कमी सामानाने प्रवास करणे चांगले आहे.आपण जितके अधिक सामान घेता तेवढी जास्त किंमत आपल्याला मोजावी लागेल.आपल्याला सामानासाठी एक मोठी गाडी, नवीन घरात अधिक जागा, आपल्याला मदत करण्यासाठी अधिक सहाय्य इ. ची आवश्यकता असेल.म्हणूनच, जर आपण कमी सामनासह जाल तर आपण अधिक बचत कराल. आपल्या सामानासाठी सर्वोत्कृष्ट पॅकर्स आणि मूवर्स मिळवा एकदा आपण काय घ्यायचे हे ठरविल्यानंतर, आपण ते कसे नेणार आहात ते ठरविणे आवश्यक आहे.बर्‍याच लोकांना असे वाटते की सामान पॅक करणे आणि हलविणे हे एक सोपे कार्य आहे आणि ते स्वतःच हे करू शकतात. हे करून आपण जे थोडेसे पैसे वाचवाल पण त्यामुळे होणार त्रास आणि परिश्रम अजिबात फायद्याचे नाही. विश्वासार्ह, प्रशिक्षित आणि व्यावसायिक नोब्रोकर पॅकर्स आणि मूवर्स बुक करणे, सोपे आहे.ते वेळेतच काम पूर्ण करतील, योग्य पॅकिंग साहित्य आणतील आणि वस्तू पॅक करण्यासाठी त्यांचे कौशल्य वापरतील जेणेकरून कोणतेही नुकसान होणार नाही.आपणास एक समर्पित मूव्ह मॅनेजर देखील मिळेल,जो हे पाहिल की वेळापत्रकानुसार सर्व काही घडते आहे,जेणेकरून आपल्याला काळजी करण्याची किंवा कॉल करण्याची आणि काय घडले आहे याचा मागोवा घ्यायची आवश्यकता नाही. व्यावसायिक क्लीनर भाड्याने मिळवा आपण आपल्या जुन्या घरातून आणि जुन्या शहराच्या बाहेर जाण्यापूर्वी आपण राहात असलेली जागा,शक्य तितकी स्वच्छ ठेवणे चांगले आहे.हे पुढील भाडेकरूंना किंवा आपणास देखील मदत करेल, जेव्हा आपण पुढच्या वेळी परत जाता तेव्हा घर चांगल्या स्थितीत असेल. आपल्याला नवीन शहरात व्यावसायिक क्लीनर मिळवणे देखील आवश्यक आहे, ते नवीन घर स्वच्छ करतील जेणेकरून आपण आत प्रवेश करता तेव्हा सर्वकाही साफ आणि स्वच्छ केलेले असेल.नोब्रोकर मधील व्यावसायिक क्लीनर वेगवान आणि कार्यक्षमतेने कार्य करतात आणि आपल्याला उत्कृष्ट परिणाम देण्यासाठी त्यांच्याकडे योग्य साधने आणि साफसफाईची सामग्री आहे. आपले घर सेट करण्यासाठी चेकलिस्ट वापरा आपल्याला अगदी सुरवातीपासून आपले नवीन घर सेट करणे आवश्यक असल्यास, आपले जीवन आरामदायक बनविण्यासाठी आपल्याला बर्‍याच गोष्टींची खरेदी / व्यवस्था करण्याची आवश्यकता असेल. एक बादली मिळवण्यापासून ते गॅस कनेक्शनची व्यवस्था करण्यापर्यंत, आपल्या घराच्या प्रत्येक खोलीसाठी आपल्याला अशा गोष्टी व्यवस्थित सेट करणे आवश्यक आहे.आपल्यास आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची आम्ही एक नोंद तयार केली आहे, जेणेकरून आपण काहीही विसरणार नाहीत.मदतीसाठी आपण हा लेख तपासू शकता. तेथून चेकलिस्ट डाउनलोड करा आणि आपण,आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी ऑर्डर किंवा खरेदी करण्यास सक्षम असाल. Moving to A New City? Here’s What You Need to Do to Make Life Easier निराश होऊ नका करण्यासारख्या बर्‍याच गोष्टी आणि बर्‍याच योजना असल्यामुळे, आम्हाला खात्री आहे की आपण दबून जाल.खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबरोबर वेळ घालवणे, आपण मागे सोडून चाललेल्या मित्र आणि कुटूंबासमवेत वेळ घालवणे, चांगल्या आठवणीं जोडणे महत्वाचे आहे. घराचे सामान हलवताना, साफसफाई करताना,आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे व्यावसायिकांची मदत मिळवा, यामुळे आपणास अधिक मोकळा वेळ मिळेल आणि तुम्हाला जाणवणारा तणाव आणि चिंता कमी होईल. आपल्याला अधिक मदतीची आवश्यकता असल्यास किंवा आमच्यासाठी काही प्रश्न असल्यास, फक्त नोब्रोकर वेबसाइटला भेट द्या किंवा अ‍ॅप डाउनलोड करा.

About the Author

Nithin

Senior Editor

Nithin is a jack of all trades, and for a long time he worked with Packers and Movers from many companies as part of his many roles. He spent time in getting to know the ins and outs of the business. It also helps that he has moved homes over 15 times! If you need a guide to help you move seamlessly, then follow him.

Subscribe to our Newsletter

Get latest news delivered straight to your inbox