आपल्या नोकरीचा विचार करा
आपल्याकडे एखादी नोकरी असल्यास,ती कोणत्या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला किती पैसे देतात,ते पहा.राहण्यासाठी आपल्या ऑफिसच्या सभोवतालच्या क्षेत्राकडे पाहणी करा, व कामाच्या जवळ राहणे आणि भाड्यावर अधिक खर्च करणे किंवा,एखाद्या चांगल्या शेजारमध्ये राहणे आणि प्रवासासाठी खर्च करणे,यातून कोणता पर्याय योग्य राहील ते पहा.तसेच बचत करण्यासाठीही आपल्याकडे पैसे शिल्लक असणे आवश्यक आहे, हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे.
जर आपल्याकडे नोकरी नसेल तर, स्वस्त घराचा पर्याय शोधा; आपल्याला शक्य तितक्या काळासाठी आपले पैसे टिकवणे आवश्यक आहे.
आपल्याला किती लवकर घर शोधण्याची गरज आहे?
जेव्हा आपल्याला नवीन कंपनीत नवीन शहरात कामावर घेतले जाते, तेव्हा ते आपल्याला काही दिवस, आठवडे किंवा महिन्यासाठीसुद्धा राहण्यासाठी घर देतात.कंपनीचे धोरण काय आहे ते शोधा.आपण मित्र आणि नातेवाईकांकडे देखील तपासू शकता,त्यांच्याकडे आपल्यासाठी एखादी खोली असल्यास त्यांना विचारू शकता.
हा एक चांगला पर्याय आहे,कारण ह्यामुळे आपल्याला आपले आवडीचं घर निवडण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.आपण नवीन ठिकाणी जाताच,तिथे नवीन घरात जाणे कदाचित,थकवणारं आणि त्रासदायक वाटू शकेल.सोयी,सुख- सुविधा, शेजार इत्यादी गोष्टी तपासण्यासाठी तुम्हाला एकदा तरी नवीन जागेवरील घराला भेट द्यावी लागेल.
आपण घर शोधण्यास कोठे सुरूवात करता?
नवीन शहराबद्दल, आपली नोकरी कोठे आहे आणि शहरात कोठे राहायचे आहे, याबद्दल आपल्याला चांगली कल्पना असल्यास घर शोधण्याचा उत्तम मार्ग म्हणजे 'ऑनलाइन पोर्टल' किंवा 'रिअल इस्टेट रेंटल' अॅपद्वारे.आपल्यासाठी,दिल्ली- एनसीआर, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, पुणे आणि हैदराबादमधून निवडण्यासाठी नोब्रोकरकडे 1000 पेक्षा जास्त पर्याय आहेत.
नोब्रोकरकडे रिलेशनशिप मॅनेजर देखील आहेत, जे तुम्हाला घराच्या संपूर्ण शोधासाठी मदत करतील.ते तुमची आवश्यकता लक्षात घेतील, तुम्हाला आवडीच्या घरांचे पर्याय पाठवतील, तुम्ही आल्यावर घराच्या भेटीचे वेळापत्रक ठरवतील, तुम्हाला तज्ज्ञ लोकल-आधारित माहिती देतील आणि तुमच्या वतीने भाडे ठरवण्यासाठीसुद्धा चर्चा करतील.
आपल्याला घरात काय शोधण्याची आवश्यकता आहे?
जर घर शोधण्याची ही आपली पहिलीच वेळ असेल,तर आपण भाड्याने घर घेण्यापूर्वी आपल्याला घरात नेमकं काय पाहिजेल ते ठरविणे आवश्यक आहे.आपण अविवाहित असल्यास आणि आपल्या कुटुंबासह असल्यास, आपल्या गरजा बदलू शकतात.आपल्याला आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी घराची आवश्यकता असल्यास,हा लेख आपल्याला नक्कीच मदत करेल.
आपल्याला फक्त आपल्यासाठी घराची आवश्यकता असल्यास, नंतर आपल्याला घरात काय हवे आहे याबद्दल कल्पना करण्याचा प्रयत्न करा, जसे की -
- फर्निचर (पूर्ण सुसज्ज, अर्ध-सुसज्ज किंवा फर्निचर नसलेले)
- पार्किंगची जागा (आपल्याला गाडी किंवा बाईक पार्किंगची आवश्यकता आहे का, आपण वाहन खरेदी करीत असाल किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहणार)
- सुरक्षितता (आपल्याला नोब्रोकरहुड सारख्या सुरक्षितता कॅमेरे आणि स्मार्ट सुरक्षा अॅप्स किंवा फक्त एक सुरक्षा रक्षक आवश्यक आहे)
- आपल्याला 24/7 वीज आणि वाय-फाय ची आवश्यकता आहे (आपण घरातून काम करत असल्यास, हे महत्वाचे आहे)
- आपल्याला किती जागा हवी आहे
- परिसरामध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात आणि असे बरेचकाही.
निराश होऊ नका
करण्यासारख्या बर्याच गोष्टी आणि बर्याच योजना असल्यामुळे, आम्हाला खात्री आहे की आपण दबून जाल.खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबरोबर वेळ घालवणे, आपण मागे सोडून चाललेल्या मित्र आणि कुटूंबासमवेत वेळ घालवणे, चांगल्या आठवणीं जोडणे महत्वाचे आहे.
घराचे सामान हलवताना, साफसफाई करताना,आणि जिथे जिथे शक्य असेल तिथे व्यावसायिकांची मदत मिळवा, यामुळे आपणास अधिक मोकळा वेळ मिळेल आणि तुम्हाला जाणवणारा तणाव आणि चिंता कमी होईल.
आपल्याला अधिक मदतीची आवश्यकता असल्यास किंवा आमच्यासाठी काही प्रश्न असल्यास, फक्त नोब्रोकर वेबसाइटला भेट द्या किंवा अॅप डाउनलोड करा.