Marathi
comment

बॉलिवूडच्या आवडत्या अ‍ॅक्शन हिरोच्या घरात- अक्षय कुमार

बॉलिवूडचा सुपरस्टार, निर्माता आणि खिलाडी नं.1, त्याला खरोखरच कोणत्याही परिचयाची गरज नाही. स्वनिर्मित व्यक्ती, अक्षय कुमार हा एका नम्र घरातून आला आहे. समर्पण आणि उत्कृष्ट प्रतिभा,ह्यामुळे आज तो भारतातील सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनला आहे.

Inside the home of Bollywood’s favorite action hero- Akshay Kumar

Things we covered for you

+

1990 च्या दशकाच्या सुरुवातीला, राजीव हरी ओम भाटिया याने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, त्यानंतर आब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘खिलाडी’ या मालिकेतून ऍक्शन हिरो म्हणून भूमिका साकारल्या. चित्रपटात पाऊल टाकण्यापूर्वी त्याने अक्षय कुमार,असे व्यावसायिक नाव स्वीकारले. त्याच्या मोहक स्मितहास्य आणि दुबळ्या शरीराने त्याला एक महिलांचा नायक बनविले. आज 52 व्या वर्षीही तो बॉलिवूडमधील फिट आणि सेक्सी अभिनेत्यांपैकी एक आहे.

व्यावसायिक सुपरस्टार असूनही, अक्षय कुमार याने अलिकडच्या काळात बरेचशे सामग्री-समृद्ध असे चित्रपट साकारले आहेत, परंतु रुस्तम, पॅडमॅन, केसरी असे काही विलक्षण चित्रपट आहेत ज्यामुळे त्याला नवीन लोकप्रियता मिळाली. तो त्याच्या शिस्त आणि वक्तशीरपणासाठी, तसेच सेट्सवर ‘प्रांकस्टर’ म्हणून प्रसिद्ध आहे. तो पारटयांमध्ये सहभाग घेत नाही, दारू किंवा अंमली पदार्थांचे व्यसन करत नाही, मग तो आपला पैसा कशावर खर्च करतो?

समुद्रकिनाऱ्यावरचा जुहू बंगला, मॉरिशसमधील एक आलिशान घर, कॅनडामधील एक घर आणि अंधेरीमधील आणखी चार फ्लॅट्स, त्याने गेल्या काही वर्षांत स्मार्टपणे रीअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. अक्षयने जागतिक स्तरावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि जगातील काही सर्वात महागड्या घरांच्या मालकीही त्याच्याकडे आहे.
Read: 2024 मध्ये नवी दिल्लीत राहण्यासाठीचे सर्वात स्वस्त ठिकाणे


Book Best Packers & Movers with Best Price, Free Cancellation, Dedicated Move Manager

Get Rental Agreement With Doorstep Delivery, Super Quick & Easy

This is third

This is third

This is fourth

This is fourth

This is fifth

This is fifth

This is six

This is six

This is seven

This is seven

This is eight

This is eight



akshay kumar house

स्वयंपाकीपासून सुपरस्टारपर्यंत

राजीव भाटियाने बँगकॉकच्या एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकीचे काम केले. त्याने मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आणि त्याची शिस्त शिकण्यात अनेक वर्षे घालविली, आज तो बहुतेक स्टंट्स स्वतः करतो आणि ऍक्शन डायरेक्टरांद्वारे त्याला उच्च सन्मान मिळतो. फर्निचर स्टोअरसाठीच्या एका छोट्या मॉडेलिंग गिगसह अक्षयने आपला प्रवास सुरू केला, आणि लवकरच त्याला समजले की संपूर्ण महिन्यापेक्षा, दोन दिवसात तो जास्त पैसे कमवू शकेल. अक्षय कुमारची आज एकूण 150 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे, परंतु तो नेहमीच या स्टारडमचा आनंद घेत नाही.

अनेक फ्लॉप चित्रपटांच्या मालिकेनंतर, तो कॅनडाला गेला होता, त्याला याची खात्री झाली की मुंबईतली त्याची कारकीर्द संपली आहे. त्याने तेथे एका मित्रासाठी काम केले आणि तेथील नागरिकतेसाठी अर्ज केला. बर्‍याच लोकांना माहिती नसेल, पण अक्षय कुमार हा कॅनडाचा नागरिक असून तो भारतासाठी एक एनआरआय बनतो. त्याची एनआरआय स्थिती कायम वादविवादाचा विषय बनला आहे, आणि त्याने नुकतेच ‘गुड न्यूझ’ ह्या चित्रपटाच्या प्रमोशन वेळेसच्या मुलाखती दरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली.

“मी आता पासपोर्टसाठी अर्ज केला आहे. मी एक भारतीय आहे, आणि मला दुःख होते की प्रत्येकवेळी मला ते सिद्ध करण्यास सांगितले जाते. माझी पत्नी आणि मुलं भारतीय आहेत. मी येथे माझे कर भरतो, आणि माझे आयुष्य येथे आहे. ”- अक्षय कुमार

akshay kumar house

खिलाडी नंबर 1 कोठे राहतो?

 

  • प्राइम बीच, जुहू

 

अक्षय कुमार जुहू किनारपट्टीवरील अतिशय विलासी अशा प्राइम बीच इमारतीच्या तळ मजल्यावर,पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. त्याच्या आई आणि बहिणीचेही त्याच इमारतीत अपार्टमेंट्स आहेत आणि हृतिक रोशन याने नुकतीच प्राइम बीचच्या अपार्टमेंटमध्ये गुंतवणूकही केली आहे. जुहू हे मुंबईतील ‘बेव्हरली हिल्स’ म्हणून ओळखले जाते. 20 कोटी पेक्षा जास्त किंमतीच्या अपार्टमेंटसह, आपण येथे केवळ गर्भश्रीमंत लोकं राहत असल्याचे पहाल. जुहू यालाच आम्ही मुंबईकर एक ‘शहर’ म्हणतो आणि इथे उत्कृष्ट पायाभूत सुविधा, चांगल्या शाळा, रुग्णालये आणि शॉपिंग सेंटर्सचा आनंद घेता येतो.
Read: कोविड -19 लॉकडाऊन दरम्यान मानसिक ताणतणाव कमी करणे आणि चिंता कमी करण्याचे मार्ग

अक्षय आणि पत्नी ट्विंकल यांचे प्राइम बीच जुहूमध्ये, डुप्लेक्सचे घर आहे आणि आज या घराची किंमत तब्बल 80 कोटी इतकी आहे. विनोदी टिप्पण्या आणि भयंकर स्त्रीत्व यासाठी प्रसिद्ध असलेल्या ट्विंकल खन्नाने स्वत: ला त्यांच्या घरात ओतुन घेतले आहे. मुंबईतील सर्वात सुंदर घरं बनवण्यासाठी तिने त्याचा आराखडा तयार करण्यापासून ते इंटिरियरपर्यंत सर्व काही केले आहे. दिवाणखान्यातल्या खोलीत एक भव्य असा तलाव आहे. हे प्रभावी स्त्रीवादी कला आणि स्मार्ट सजावटसह सजविले गेले आहे.

आतील बर्याच भागात निसर्गाचा स्पर्श जाणवतो, ज्यामुळे घरास एक सेंद्रिय अनुभूती मिळते. ट्विंकलने तिच्या प्रसिद्ध वडिल,अभिनेता राजेश खन्नाची आठवण करुन देण्यासाठी आंब्याचे झाडही लावले आहे. तळ मजल्यामध्ये अक्षयचा वॉक-इन वार्डरोब, किचन तसेच होम थिएटर आहे. वरच्या मजल्यावर परिष्कृत आंतरिक क्षेत्रासह राखाडी वर्चस्व असलेले विचित्र चमक आहे.

“गोंधळ ही वाईट गोष्ट नाही. परंतु आपण आपला गोंधळ आयोजित करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल: थीम किंवा रंगानुसार ते तयार करा किंवा आपल्या बुकशेल्फमध्ये विखरून द्या. ”- ट्विंकल कुमार खन्ना

akshay kumar house

अक्षय आणि ट्विंकल यांनी आपल्या मुलांना वांद्रेहून जुहू येथे राहायला आणलं,हे सर्व कुटुंब आणि मित्रांच्या जवळ राहण्यासाठी. ते बहुतेक वेळेस जुहू बीचवर फिरतात आणि मेरियट हॉटेल येथे रात्रीच्या जेवणासाठी जातात.अक्षयचं ऑफिस आणि जिम देखील जवळच आहे. त्यांचे घर त्यांच्या नात्याइतकेच सुंदर आहे, जगभरातील खजिनांनी भरलेले, मोहक अद्याप इतके जमिनीवरच आहे.
Read: वास्तु अनुरूप पूजा कक्ष स्थापन करण्यासाठी एक सोपे मार्गदर्शन

ट्विंकल तिच्या इंटिरिअर डिझायनिंग कौशल्यांसाठी आणि सौंदर्यशास्त्र ह्यासाठी बॉलिवूडमधील लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, ती सुप्रसिद्ध लेखक आणि स्त्रीवादाची वकिल ही आहे. दोन सुंदर मुलं, एक मोठा मुलगा आणि एक लहान मुलगी यांच्यासह,15 वर्षांहून अधिक काळ लग्न झालेले, अक्षय आणि ट्विंकल खरोखरच आदर्शवत असे जोडीदार आहेत.

अक्षयच्या घराविषयी आणखी एक मनोरंजक सत्य म्हणजे, सुपरस्टार राजेंद्र कुमारच्या संपत्तीपासून दूर असलेल्या एका तरुण अक्षयची कहाणी. तो पोर्टफोलिओसाठी त्याच बंगल्याच्या बाहेर काही छायाचित्र काढण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा त्याला तेथून जाण्यास सांगितले गेले. दोन दशकांनंतर खिलाडी आपल्या कुटूंबियांसह स्वप्ने सत्यात उतरवत आहे.

कोणती गोष्ट त्यांच्या घरास खास बनवते?

व्होग इंडियाने अभिनेत्याच्या घराचे वर्णन, ‘शहरी अनागोंदीच्या पार्श्वभूमीवर एक रमणीय अभयारण्य’ म्हणून केले आहे, जुन्या बंगल्याला कलात्मकतेच्या जिवंत जागी बदलण्याचे काम ट्विंकलने केले आहे. पॉवर कपल कौटुंबिक वेळेवर विश्वास ठेवतो आणि आपल्या लहान मुलांसाठी आणि त्यांच्या प्रिय पाळीव कुत्र्यासाठी, अधिक चांगले घर बनविण्यासाठी त्यांनी आपल्या राहत्या भागात निसर्गाची भर घातली आहे. अरबी समुद्राच्या दृश्यासह हे अपार्टमेंट प्रशस्त, अति आरामदायक आहे. क्लोव्ह स्टुडिओ, संदीप खोसला आणि अबू जानी यांची रचना, रेखा रॉडविटिया आणि शिप्रा भट्टाचार्य यांच्यासारख्या अविश्वसनीय कलाकारांनी केलेली स्त्रीवादी चित्रे, ट्विंकल यांनी आपल्या घरासाठी गोळा केलेली काही अतुलनीय नमुने आहेत.
Read: लहान घरांमधील जागेचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 टिप्स

शेजार

प्रत्येक मुंबईकर आयकॉनिक अशा जुहू बीचवर त्यांच्या आयुष्यात एकदा तरी जातात,तिथे अक्कीचे घर आहे. त्याच्या कुटुंबीयांना त्यांच्या भव्य अपार्टमेंटमधून समुद्रकिनाऱ्याचे एक प्रतिबंधित दृश्य प्राप्त होते. ट्विंकल आणि अक्षय हे डेट रात्रीसाठी हॉटेल मेरिअटकडे चालत जाताना व बीचच्या भोवती फिरताना अनेकवेळा दिसले आहेत. या परिसरात प्रख्यात पृथ्वी थिएटरही आहे. हे मुंबईचे आर्ट हब म्हणून ओळखले जाते,आणि शहरातील प्रत्येकाने इथे भेट देणे आवश्यक आहे. वांद्रे-वरळी सीलिंक ही या परिसराजवळची आणखी एक महत्त्वाची ओळख असून, ते एक अनोखे वास्तुशिल्प आहे आणि जुहूपासून अवघ्या दहा मिनिटांवर आहे.

जुहूच्या प्रसिद्ध बॉलिवूड रहिवाशांमध्ये शक्ती कपूर, सनी देओल, अनिल कपूर आणि गोविंदा यांचा समावेश आहे. जुहू तारा रोडवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी तसेच अति-श्रीमंत व्यावसायिक कुटुंबे आहेत.

हा परिसर,द पार्क मुंबई, हॉटेल सी प्रिन्सेस आणि द लीला सारख्या आलिशान पंचतारांकित हॉटेल्ससाठी देखील प्रसिद्ध आहे.

सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सांताक्रूझ मेट्रो आहे, जे ह्या ठिकाणाला सहजपणे सुलभ करते. पायाभूत सुविधांपर्यंतचा विचार केल्यास, जुहू परिसर हे मुंबईतील एक उत्तम ठिकाण आहे. जमनाबाई नर्सी आणि सी.पी. गोयंका सारख्या शाळा इथे आहेत,जिथे अनेक अभिनेत्यांची मुले शिकतात.

जुहू तारा रस्त्यावर सेलिब्रिटींच्या घरांसह, चालना देण्यासाठी अनेक उच्चभ्रू आणि विलासी निवासी इमारती आहेत. रुस्तॉमजी एलिता, पाम बीच प्रॉपर्टी, अश्रीवाड बंगला, 402 रीना, संगीता अपार्टमेंट्स आणि प्रितिक्षा,हे काही या परिसरातील प्रमुख ठिकाणं आहेत. या क्षेत्रातील घरे प्रशस्त आहेत ज्यात तीन किंवा चार बेडरूम, दोन बाथरूम आणि अगदी गॅरेजदेखील आहेत. मुंबईच्या भू संपत्तीच्या किंमती बर्‍याच वर्षांत गगनाला भिडल्या आहेत आणि जुहूसारख्या भागात 10 ते 80 कोटीच्या घरात ह्या घरांची किंमती गेलेल्या आहेत.

प्राइम बीच प्रॉपर्टी

प्राइम प्रॉपर्टी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विकसित

मुंबई शहराच्या मध्यभागी आणि अरबी समुद्राच्या प्रसन्न सौंदर्याने वेढलेले,जुहू येथील प्राइम बीचची मालमत्ता ही खरोखर एक विलासी निवासस्थान आहे. तलाटी आणि पँथाकी असोसिएट्स यांनी आर्किटेक्चरमध्ये बीचफ्रंटसह प्रशस्त 2 बीएचके अपार्टमेंटची ऑफर आणलेली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी अभिनेता हृतिक रोशनने प्राइम बीच इमारतीत 3,600 चौरस फूट अपार्टमेंट भाड्याने घेतलेले आहे. जुहूला सेलिब्रिटींकडून खूप आधीची पसंती दिली जाते आणि जुहू तारा रोडच्या आसपास काही अतिशय उच्चभ्रू इमारती तसेच बंगले आहेत. या इमारतीत भाड्याने देण्यासाठी काही भव्य अपार्टमेंट्स आहेत, आणि मुख्य रिअल इस्टेट साइटवर हे सर्व सूचीबद्ध आहेत.

akshay kumar house

प्रसिद्ध शेजारी

हृतिक रोशन, साजिद नाडियाडवाला, अभिषेक बच्चन

पत्ता

11, जुहू तारा, जुहू, मुंबई, महाराष्ट्र, 400049

जवळपासच्या गोष्टी

हरे कृष्णा मंदिर, जुहू बीच, मेरीयट हॉटेल

 

 

  • गोव्यात लक्झरी नंदनवन

 

अक्षयकडे बरीच रिअल इस्टेट मालमत्ता आहे, आणि त्याचे आणखी एक सुंदर असे घर गोव्यात आहे. गोवा स्वतःच एक सुंदर स्थान आहे, आणि बहुतेक मुंबईकर तिकडे वळतात कारण तेथे असंख्य समुद्रकिनारे आहेत आणि अर्थातच अधिक स्वस्त अल्कोहोल. गोवा फक्त एक पार्टी करण्यासाठीचे शहर नाही, तर इथे भारतातील उत्तम मालमत्ता देखील आहेत. अक्षय कुमार आणि कुटुंबीयांकडे गोव्यामध्ये एक आलिशान 5 कोटींचे घर आहे, जे त्यांनी एका दशकापूर्वी खरेदी केले होते.

“मला गोव्याला जायला आवडते. मला ते आवडते. हे खूप मजेशीर आणि मस्त असे ठिकाण आहे. तिथे सर्वजण मला ओळखतात आणि ते फक्त हाय म्हणतात, परंतु कोणीही मला तसे त्रास देत नाही. हे देशातील एकमेव ठिकाण आहे जिथे मी फिरू शकतो आणि माझा आनंद घेऊ शकतो. ”- अक्षय कुमार.

पोर्तुगीज शैलीतील व्हिला गोव्यातील पांढर्‍या वालुकामय किनार्यांकडे पाहात आहे आणि खरंच तो एक अद्भुत आश्रयस्थान आहे. जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा आपल्या सुट्टीच्या घरी निघून जाणे ह्या अभिनेत्याला आवडते.

akshay kumar house

अक्षय हा एक बोनाफाईड स्टार आणि एक बुद्धिमान गुंतवणूकदार आहे,ज्याला स्टाईलमध्ये राहणे आवडते. मुंबईत बऱ्याच सेलिब्रिटींची भव्य घरे आहेत, अक्किकडे बॉलिवूड अभिनेत्याच्या मालकीचे असलेले सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. मस्त अशा ड्युप्लेक्स बीचकडे तोंड असलेल्या अपार्टमेंटचे सध्याचे मूल्य हे 80 कोटी इतके आहे. अक्की आपले पैसे लक्झरी कार आणि भव्य कौटुंबिक सुट्टीवर खर्च करतो. अशा छोट्याश्या सुरुवातीपासून माणसाने आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरविली हे पाहून खरोखर आनंद होतो.केवळ त्याची बॉलिवूड कारकीर्दच नाही तर त्याची पत्नी ट्विंकल बरोबरचे त्याचे प्रेमळ नाते केवळ स्वप्नव्रत असे आहे. गंमतीदारपणे एमआरएस. एका मजेदार चॅट शोवर ह्या फनीबॉन्सने एकदा सांगितले होते की तिचा चित्रपट मेला फ्लॉप झाला तरच ती अक्कीशी लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. तिला नक्कीच खात्री होती की हा चित्रपट खूप यशस्वी होणार आहे पण तो झाला नव्हता आणि बाकीचा इतिहास आहे.

अक्षय कुमार हा फिटनेस, स्टाईल आणि त्याच्या अविश्वसनीय स्वभावासाठीही परिचित आहे. त्याने नुकत्याच सुरू असलेल्या कोरोना साथीच्या आजारात पंतप्रधानांच्या साहाय्यता निधीसाठी 25 कोटी दान केले.

अक्षय कुमार हा फॅन फेव्हरेट, आपल्या स्वभावामुळे आणि त्याच्या प्रेक्षकांवर असलेल्या प्रेमासाठी ओळखला जातो. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिनेत्याची झलक पाहण्यासाठी शेकडो चाहते त्याच्या घराजवळ जमतात, यात काही आश्चर्य नाही.

पुढच्या वेळी तुम्ही जुहूमध्ये असाल, तर कुमार कुटूंबाचे हे विलक्षण अपार्टमेंट नक्की पहा.

Contact Us


Subscribe

NoBroker.com

NoBroker.com is a disruptive real-estate platform that makes it possible to buy/sell/rent a house without paying any brokerage. Following are service along with Rent / Sell / Buy of Properties - Rental Agreement - Packers And Movers - Click And Earn - Life Score - Rent Receipts - NoBroker for NRIs

Related Post

मुंबईमधील सर्वात उंच अशा 7 इमारती
2024 साठी फरीदाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
लॉकडाऊन दरम्यान करून बघण्यासाठीच्या,अद्वितीय आणि अफाट अशा 6 घर सजावट कल्पना
2024 साठी गाझियाबादमध्ये राहण्यासाठीचे स्वस्त ठिकाणे
भारतातील गृहनिर्माण खर्च समजून घेणे
भारतातील भाडेकरु कायदा – दहा कोटीचे घर 40 रुपयांना भाड्याने?
आपल्या बेडरूमच्या भिंतींसाठी 20 सर्वोत्कृष्ट दोन-रंग संयोजने
आपले घर सजवण्यासाठी उत्कृष्ट अशा 25 ‘आउट-ऑफ-वेस्ट’ कल्पना
आपल्या लिव्हिंग रूमला प्रकाशित करण्यासाठी शीर्ष असे 15 अप्रतिम हँगिंग लाइट्स
2024 मध्ये मुलांसाठी घरामधील 15 सुरक्षा नियम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

People Also Ask