आपले घर, जलदरीतीने भाडोत्री देण्यासाठी किंवा विकण्यासाठी छायाचित्र कसे घ्याल?

 

कल्पना करा, कि तुम्ही ऑनलाइन कपडे खरेदी करत आहात ,त्यासाठी तुम्ही अगोदर एक स्टाईल बघता आणि मग तुमच्या मापानुसार/आकारानुसार कपडा निवडता.प्रत्येक गोष्टीचा तपशील तिथे दिलेला असतो,कापडाच्या प्रकारापासून ते कलर पर्यंत.तथापि,त्या वस्तूचा फोटो तिथे दिलेला नसतो! तर मग?ऐकायला विचित्र वाटतं नाहीका? फ्लॅट किंवा एखादी ऑनलाइन मालमत्ता खरेदी करताना देखील छायाचित्र नसेल तर अशीच अडचण अनुभवायला मिळते.

AirBnB ह्या संकेतस्थळानुसार सुंदर छायाचित्र असलेल्या मालमत्तेला 24% जास्त नोंदणी मिळते,26 % जास्त एक रात्रीची किंमत,म्हणजे जवळपास 40 % पर्यंत मिळकत वाढते.आम्ही,नोब्रोकेर.कॉम वर हे बघितलेलंच आहे कि छायाचित्र असलेल्या घरांना,मालमत्तेची, 5 पट जास्त दखल घेतली गेली,त्या लवकर भाड्याने किंवा विकल्या गेल्या.

मोबाईल फोन्समध्ये आलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला मिळतो. त्यामुळे छायाचित्र घेण्यासाठी व्यायसायिक कॅमेराच पाहिजे असं नाही.तथापि, काही विशेष टिप्स आहेत,ज्यामुळे तुम्हाला मदत होईल व तुमचे छायाचित्र इतरांपेक्षा वेगळे ठरतील.आपण त्यासंबंधी टिप्सवर नजर फिरवुयात.

 

घर स्वच्छ करून घ्या

छायाचित्रे घेण्याअगोदर ते ठिकाण स्वच्छ करून घेणे महत्वाचे आहे. फर्निश्ड,अनफर्निश्ड दोन्हीही प्रकारच्या घरांसाठी.स्वच्छ व सुंदर दिसणारे ठिकाण हे ,अस्वच्छ ठिकाणापेक्षा जास्त लवकर नजरेत भरतात.शिवाय स्वच्छ ठिकाणामुळे तिची उपलब्धता आणि वापरात येणारी जागा हे उठून दिसतं, आणि लगेच लक्षात येतं.

READ  आपल्याला विजेचा धक्का बसू देऊ नका! सदोष इलेक्ट्रिकल वायरिंग शोधण्याचे आणि ठीक करण्याचे सोपे मार्ग

 

प्रकाशाचा उपयोग करा

चांगला प्रकाश, हा छायाचित्र काढण्यासाठीचा,फार मुख्य घटक आहे.प्रकाश हा एकतर छायाचित्र अप्रतिम बनवू शकतो ,नाहीतर त्याला बिघडूही शकतो.

जरी व्यावसायिक लोक फ्लॅश गन,फ्लॅश डिफ्युसर,फ्लॅश अंब्रेला ई. सारखे उच्च तंत्रज्ञान वापरत असले, तरीहि मोबाईल फोनने छायाचित्र काढणे सोपे जाते.मोबाईल फोनने छायाचित्र काढताना खात्री करा, कि दिवसाच्या, लक्ख प्रकाशामधेच ते काढा, जेणेकरून घराचा पूर्ण तपशील त्यातून कळेल.

 

प्रत्येक तपशील महत्वाचा आहे

Every Detail Matters

भाडेकरू/ग्राहक ह्याला सगळी कल्पना पाहिजे ,कि त्याच्यासाठी आपण काय देतोय,हे फार महत्वाचं आहे.घराच्या बाहेरीलबाजूचे छायाचित्र तितकेच महत्वाचे आहेत, जितकेकी आतमधील खोल्यांचे.ते छायाचित्र, इमारतीचं वय आणि स्थिती दोन्हीची कल्पना देतं.ह्याव्यतिरिक्त, छायाचित्र काढताना हे लक्षात असुद्या कि, प्रत्येक खोलीचे छायाचित्र काढा,समोरची बैठक खोलीे,शयनगृह, स्वयंपाक घर,पार्किंग ई. ज्यामुळे घेणारा पूर्ण माहितीत राहील.

 

चांगला कोण/अँगल शोधा

Find The Perfect Angle

प्रकाशाव्यतिरिक्त,कोणत्या कोणातून/अँगलमधून छायाचित्र काढलेले आहे, हे एका चांगल्या छायाचित्राला सामान्य छायाचित्रा पासून वेगळं करतो.कोणत्या विषयाचं छायाचित्र काढतोय ,ह्यावर कोण/अँगल अवलंबून असतो. आपल्या बाबतीत,घराच्या आतमधील छायाचित्र काढताना हे महत्त्वाचं आहे की,आपण खोलीचे जास्तीत जास्त क्षेत्र अंतर्भूत करावे. हे प्राप्त करण्यासाठी एक मार्ग म्हणजे, वाईड अँगल लेन्स वापरणे. पण जसेकी आपण फोन कॅमेरा वापरणार आहोत, तर एका कोपऱ्या मधून लँडस्केप मोड मधून छायाचित्र घेऊ शकतो,ज्याने खोलीचं संपूर्ण क्षेत्र दिसून येईल.

READ  जीएफआरजी पॅनेल्स - इमारत बांधकामातील एक नवीन तंत्रज्ञान

 

साठवणूक जागा व फर्निचर

Storage & Furnishing

वेगवेगळ्या शहरानुसार,फर्निचरबाबतची लोकांची जाण बदलते. एखाद्या शहरांमध्ये जर एक फ्लॅट सेमी फर्निश्ड म्हटला जातो ,तर तोच फ्लॅट दुसऱ्या शहरामध्ये अन फर्निश्डही म्हटला जाऊ शकतो. म्हणून हा गोंधळ टाळण्यासाठी हे महत्त्वाचं आहे की ,छायाचित्र काढताना त्यात आहे तेच फर्निचर  दाखवावं.

दुसरा एक घटक जो दृष्टिक्षेपात आणला जाऊ शकतो, तो म्हणजे घराची साठवणूक जागा. बरेच लोक कमी वापरात असलेल्या गोष्टी,सामान, साठवणूक खोलीमध्ये ठेवण्यास पसंती देतात.त्याबाबतची संपूर्ण माहिती भाडेकरू/खरेदीदार ह्यांना कल्पना देऊ शकतं,सामान ठेवण्यासंबंधी त्यांना काहीही हरकत नसेल आणि तसा योग्य तो निर्णय ते घेतील.

 

तर मग ह्या टिप्सचा लवकरात लवकर उपयोग करा आणि भाडेकरू/खरेदीदार जलदगतीने मिळवा,कोणतेही ब्रोकरेज न देता,फक्त नोब्रोकेर.कॉम वर.

Found Interesting Please Share