जेव्हा आपण चेन्नईमध्ये असतो,तेव्हा,तेथील चित्रपट, खाद्यसंस्कृती,संगीत, मरिना बीच, रंगीत उत्सव यांचा विचार करू शकतो. पण, चेन्नई ह्याहीपेेक्षा काही अजून वेगळे आहे. जर आपण चेन्नईमध्ये थांबून तिथल्या इमारतींकडे एकदा नजर फिरवू, तेव्हा आपल्याला  तेथील उत्तम ,जुन्या युरोपियन डिझाईनने प्रेरित अशा स्थापत्यकलेचा नमुना दिसेल. प्राचीन काळापासूनचे द्रविड मंदिरे,पल्लावसने बांधलेल्या संरचना, ते सध्याच्या युरोपियन इमारती,हे स्थापत्यकलेतील सर्व परिवर्तन,बदल,चेन्नईने बघितलेले आहेत.

चेन्नई,हे भारतातील असं पहिलं शहर आहे जिथे विक्टोरियन स्थापत्यकलेचा परिचय झाला. इतिहासात, वेगवेगळ्या काळानुसार स्थापत्य कला, ही बदलत गेलेली दिसते,त्यामुळे विशिष्ट अशी बांधकामे त्या काळानुरूप घडली गेलीत.

चेन्नईला श्रीमंत अशा स्थापत्य शैलीचा वसा आहे त्यांपैकी खाली काही नमुद करत आहोत.

 

1 ) युरोपियन शैलीच्या इमारती

St.Mary’s Church

St.Mary’s Church

इंग्रजांनी जेव्हा भारतात पाऊल ठेवले तेव्हा पहिल्यांदा ते चेन्नईमध्ये स्थायी झाले. यामुळे आदर्श अशा युरोपियन डिझाईन्स शहरांमध्ये दिसू लागल्या ,खासकरून अशा इमारती ,ज्या दैनंदिन कामासाठी उपयुक्त होत्या.यामध्ये गोदामे, तोडगा काढण्यासाठीच्या चौक्या ई.अशा इमारतींचा समावेश होता. चुना आणि विटा हे या इमारती बांधण्यासाठी म्हणून ,मुख्य कच्चामाल होता. विटांच्या भिंती बांधून त्यावर जाड चुन्याचं प्लास्टर केले जायचं. बाहेरून हे दगडी बांधकाम दिसावं अशा पद्धतीने ते बांधले जायचं. बऱ्याचशा इमारती या लंडनमधील ,मोठं मोठ्या कारागिरांनी बांधलेल्या इमारतींसारख्या दिसाव्यात ह्या पद्धतीने बनवल्या गेल्या. रोमन गॉथिक, न्यूओ क्लासिकल ई. या साधारण युरोपियन डिझाईन्स असायच्या.मूघलांव्यतिरिक्त,फक्त युरोपियन शैलीचा प्रभाव हा चेन्नईच्या स्थापत्यकलेवर आणि इथल्या इमारतींवर दिसून येतो .चेन्नईमधील चर्च, हे लंडनमधील चर्चच्या डीसाईनमध्ये थोडेफार बदल करून  केलेले अनुकूलन आहे .युरोपियन शैलीचं उत्तम उदाहरण म्हणजे ,फोर्ट सेंट जॉर्ज स्थित सेंट मेरीस् चर्च.

 

2 ) इंडो-सारासेनिक शैली

Chennai Central Railway Station

Chennai Central Railway Station

एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीला इंग्रजांनी, सिमेंट काँक्रीट ,काच ,लोखंड ई. नवीन कच्चामाल वापरून बांधकामांच्या शैलीमध्ये काही बदल करण्यास सुरुवात केली. यामुळे नवीन शक्यता उघड्या झाल्या. ह्यात ताकतवान कच्च्या मालाचा वापर करून, नवीन, रेल्वे स्टेशन सारख्या सुविधा तयार करण्यासाठी ,विविध उपाययोजना लागू करण्यास सुरुवात केली. इंडो-सारासेनिक शैली ,ही भारतीय आणि युरोपीयन स्थापत्यशैलीचा एकत्रीकरण आहे ,तसेच इस्लामिक (मुगल आणि अफगान) डिझाईन्सचा देखील प्रोत्साहित प्रभाव या कलेवर दिसून येतो. चेपॉसचा राजमहल,ही इंडो-सारासेनिक शैलीची पहिली इमारत मानली जाते .इंडो-सारासेनिक शैलीच्या अजून काही इमारतींचे उदाहरणे म्हणजे,मद्रास उच्च न्यायालय ,सिनेट हाऊस, विक्टोरिया मेमोरियल ई.त्यामुळे गॉथिक शैलीचे कमान,गुंबद आणि मिनारे ह्यांच संयोजन इथे चेन्नईत पहायला मिळणे ,यात काही आश्चर्य नाही. हिंदू आणि इस्लामिक डिझाइन्सचं एकत्रीकरण आणि त्यावर विक्टोरियन शैलीचा प्रभाव, याचा परिणाम म्हणून इतक्या सुंदर इमारती इथे उभारल्या गेल्या.

 

3 ) आर्ट डेको शैली

Madras University

Madras University

ही जागतिक दर्जा असलेली स्थापत्यकलेची शैली, 1930 ते 1940 यादरम्यान उदयास आली. ही शैली, इंडो-सारासेनिक आणि निओ-क्लासिकल यांचे एकत्रीकरण आहे .त्यावेळेस अशा अनेक आधुनिक इमारती जसेकी,बँका, मेडिया घरे ,शैक्षणिक संस्था ई.आर्ट डेको शैलीने बांधण्यात आल्या. दक्षिण चेन्नईच्या बऱ्याचशा उच्चभ्रू वसाहतींमध्ये, आर्ट डेको शैलीचे अनेक मोठ मोठे बंगले आपल्याला बघायला मिळतील. मद्रास व्यतिरिक्त त्या काळात मुंबईमध्येही आपल्याला या शैलीचा प्रभाव असल्याचा दिसतो. आर्ट डेको शैलीच्या इमारतींमध्ये वैशिष्ट्यपूर्वक असे, कँटीलेवर पोर्च ,स्वीपिंग वक्रआकार, तसेच उभ्या खिडक्या यांचा कलात्मक देखावा बघायला मिळतो. ह्या शैलीने निवासी इमारतींमध्येही प्रभाव टाकलेला दिसतो .विविध निवासी कॉलनींमध्ये ,रो हाऊसेसचा नमुना स्वीकार केलेला दिसतो आणि मुख्य वसाहतींमध्ये पॉश असे बंगले बांधले गेलेले आहेत. या घरांमध्ये आणि इमारतींमध्ये बाहेरील वरांडा दिसून येत नाही. डेअर हाऊस,हे,आर्ट डेको शैलीचे एक उदाहरण आहे.

 

4 ) अग्रहराम स्थापत्यकला

 

अग्रहराम  स्थापत्य कलेचे वर्चस्व अशा ठिकाणी जास्त दिसून येते ,ज्या ठिकाणी ब्राह्मणांचं वर्चस्व होतं ,खासकरून ट्रिपलीकेन आणि  मैलापोर या ब्राह्मणांच्या निवासी वसाहतींमध्ये .दोन्ही बाजूच्या सरळ रेषेतील रस्त्यांच्या कडेला रो हाऊसेस उभारलेले असत, तेही मंदिराच्या भोवती.तमिळ शैलीत बांधलेल्या या रो हाऊसेसमधे, मुख्य अंगण आणि उतार असलेले छप्पर दिसतात, जे,या समुदायाचे इतिहास आणि संस्कृती दर्शवतात.सध्या अगहराम शैली, फक्त काही मंदिरांमध्ये आणि मोजक्या ब्राह्मण घरांमध्ये दिसून येते.

 

स्वातंत्र्यनंतरच्या काळामध्ये सामान्य माणसाच्या उत्पन्नात वाढ झालेली असल्याकारणाने ,आधुनिक स्थापत्य कलेने शहरांमध्ये मार्गक्रमण केले.

1990च्या पूर्वार्धापासून विविध बदल ,प्रयोग करून नवीन आणि धीट स्थापत्यकला ,इमारतींमध्ये दिसू लागली. आधुनिकीकरण आणि अर्थव्यवस्थेतील वाढ यामुळे ,जुनी स्थापत्य शैली विलुप्त होत चाललेली आहे आणि फक्त सार्वजनिक ठिकाणच्या इमारतींमध्ये हा वारसा जपून राहिलेला आहे.

 

जर तुम्ही अशा ऐतिहासिक शहरामध्ये घर शोधत आहात, तर आम्ही तुमच्या मदतीला आहोत.

नोब्रोकर.कॉम ला भेट द्या आणि तुमचा गरजांप्रमाणे आम्ही तुम्हाला तुमचे घर उपलब्ध करून देऊ.